भारतात रोजगार निर्मितीसंबंधी एक चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्मितीचे प्रमाण वाढले असून रोजगार निर्मिती सात वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
निक्की इंडिया सर्व्हीसेस बिझनेस अॅक्टीव्हीटीचा निर्देशांक मार्च महिन्यात ५०.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हाच निर्देशांक ४७.८ टक्क्यांवर होता. निर्देशांक ५० च्या पुढे असणे हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण आहे. फेब्रुवारीमध्ये निर्देशांकात झालेली घट ही क्षणिक ठरली आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे असे अर्थतज्ञ आशना दोधिया यांनी सांगितले.
हा सर्वेक्षण अहवाल राजकीय आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारी बाब आहे. कारण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष रोजगाच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. मोदींच्या राजवटीत बेरोजगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. निक्की इंडियाच्या मार्चच्या अहवालानुसार सेवा आणि उत्पादन या दोन्ही प्रमुख क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
मागणी वाढल्यामुळे सध्या जे स्त्रोत आहेत, व्यवस्था आहे त्यावर दबाव येत आहे. त्यामुळे सर्वा पुरवठादरांनी मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी संख्येमध्ये वेगाने वाढ केली आहे. जून २०११ नंतर ही आशादायक स्थिती आहे.(source :loksatta)
नागपूर : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण अनेकविध उपाय करीत असतो. त्यातल्यात्यात गोरे बनविण्याचा दावा करणारी भरपूर उत्पादने आज उपलब्ध आहेत, पण ती उत्पादने वापरणे योग्य आहेत का, त्यांच्या वापराने खरोखरच रंग गोरा होतो का, की त्याचे इतर काही दुष्परिणाम तर त्वचेवर होत नाहीत ना, अशा अनेक प्रश्नांना त्वचा तज्ज्ञांना सामोरे जावे लागते.
गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे.
सुंदर व निरोगी त्वचा म्हणजे गोरा रंग, असे समीकरण सध्या रूढ होत चालले आहे. यातच प्रतिष्ठित सिनेतारका जाहिरातींद्वारे कोणत्याही क्रीमचा प्रचार करतात तेव्हा या गैरसमजाला दुजोरा मिळत आहे. परिणामी, डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच स्टेरॉईडसारख्या क्रीमचा सर्रास वापर होत असल्याने दिवसेंदिवस त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे ‘आयएडीव्हीएल’चे म्हणणे आहे.(source :lokmat)
नवी दिल्ली: नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांचा शुक्रवारपासून सुरू होणारा तीन दिवसीय भारत दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे लक्षवेधक ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींकडून नेपाळमध्ये चिनी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या धरणांच्या कंत्राटाविषयी नाराजी व्यक्त केली जाऊ शकते. तुम्ही चीनकडून खुशाल हवी तितकी धरणे बांधून घ्या. मात्र, त्याद्वारे निर्माण होणारी वीज आमचा देश विकत घेणार नाही, असे स्पष्ट संकेत मोदींकडून दिले जाऊ शकतात.
या सगळ्या प्रकरणाला भारत आणि चीन यांच्यातील सुप्त स्पर्धेची पार्श्वभूमी आहे. भारत आणि चीन दोघांकडून शेजारी देश आपल्या बाजूने कसे राहतील, यासाठी कायम प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या नेपाळमध्ये धरणांचे बांधकाम करण्याचे कंत्राट आपल्या देशातील कंपन्यांना मिळावे, यासाठी दोन्ही देश इच्छूक आहेत.
नेपाळच्या बुधि गंडकी या नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे कंत्राट चीनच्या गेझोहुबा या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यात मोदी आणि के.पी. ओली यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी भारताकडून सर्व राजनैतिक संकेत पाळले जातील. परंतु, त्याचवेळी भारताची भूमिका ठोसपणे सांगायलाही पंतप्रधान मागेपुढे पाहणार नाहीत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
बुधी गंडकी हा २.५ अब्ज डॉलरचा प्रकल्प याच नदीवर उभारण्यात येत असून तोच भारत आणि नेपाळमधील संघर्षांचे प्रमुख कारण आहे. हा प्रकल्प गेल्या जून महिन्यांत चीनच्या गेझोहुबा समूहाला देण्यात आला होता.(source :lokmat)
पणजी : तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वें आरोग्य मंत्रालयाने अधिसूचित केली आहेत. तंबाखुच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रथमच पाकिटावर १८00-११-२३५६ हा हेल्पलाइनचा क्रमांक टाकावा लागेल. तंबाखुमुळे कर्करोग होतो तसेच वेदनादायक मृत्युलाही सामोरे जावे लागते, असे ठळक अक्षरात लिहिणे तसेच पाकिटावर तशी चित्रे असणे सक्तीचे आहे.
राष्ट्रीय तंबाखु निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्पलाइनचा क्रमांक काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सफेद रंगात लिहिणे तसेच वैधानिक इशा-याच्या ओळी लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर सफेद रंगात लिहाव्यात, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. अधिसूचनेनुसार वैधानिक इशा-याबरोबर दोन चित्रे असणे आवश्यक आहे.
साळकर पुढे असेही म्हणतात की, चित्र याआधीही सक्तीचे होते. सर्वेक्षणात ६२ टक्के सिगारेट व ५४ टक्के विडी धुम्रपान करणा-यांनी असे सांगितले की, चित्रांद्वारे वैधानिक इशारा देण्यात आल्याने सेवन सोडण्याचा विचार मनात आला.
डॉ. साळकर हे कर्करोगतज्ञ असून येथील मणिपाल इस्पितळात आॅन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा वैधानिक इशा-यामुळे लोकांमध्ये तंबाखु सेवनातून आरोग्याला असलेल्या धोक्याबाबत जागृती निर्माण होते. भारतात अनेक भाषा आणि बोली भाषा आहेत. त्यामुळे दोन चित्रांसह वैधानिक इशारा दिल्यास तो उपयुक्त ठरणार आहे.(source :lokmat)
नवी दिल्ली : यापुढे कुणालाही ई-वॉलेट, नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत आदेश जारी केले आहेत. तर आरबीआयने स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे.
बिटकॉईन खरेदीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले. सर्व ई-वॉलेट कंपन्या आणि बँकांना या व्यवहारासाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मदत होईल, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
आरबीआयची स्वतःचीच डिजीटल करन्सी - आरबीआयने एका समितीची नियुक्ती केली. ही समिती आरबीआयने स्वतःच डिजीटल करन्सी जारी करण्याबाबत सल्ला देणार आहे. आरबीआय जे डिजीटल नाणं जारी करणार आहे, त्यामुळे कागदी चलन छापण्याचा खर्च वाचणार आहे. मात्र ही व्हर्च्युअल करन्सी कधी येईल, याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही.
सरकारने यापूर्वीही बिटकॉईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. बिटकॉईन हे आरबीआयचं अधिकृत चलन नाही, त्यामुळे यापासून दूर रहावं, असं आरबीआयनेही म्हटलं होतं.(source :abpmajha)
परभणी : अवघ्या 20 व्या वर्षी भारतमातेसाठी बलिदान दिलेल्या शहीद शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडीतं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून हजारो नागरिक उपस्थित होते.
शहीद भुभमचं पार्थिव कोनेरवाडीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शुभमच्या जाण्यानं मुस्तापुरे परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
सकाळी 9 वाजता शुभमच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी ‘शुभम मुस्तापुरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. सकाळी 10 वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिह्यातील कृष्णाघाटीजवळच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सकाळी साडे सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले होते. तर शुभम मुस्तापूरे यांनाही वीरमरण आलं होतं.(source :abpmajha)
सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं. संजिता चानू ही मूळ मणिपूरची आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली.
संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक मिळवलं होतं. वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचललं.
वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करुन भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. त्यापाठोपाठ मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावून चार चांद लावले. त्यापाठोपाठ आता भारताने दुसरं सुवर्ण पदकही मिळवलं.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात झाली. सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवला. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.(source :abpmajha)
जयपूर: 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
कलम 51 अर्थात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सलमानला दोषी धरण्यात आलं असून, त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर सलमानला सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आलं. कोर्ट ते जेल या प्रवासादरम्यान पोलिसांनी रस्ता रिकामा केला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची मोठी गर्दी होती.
सलमानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. त्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी 10.30 वा. सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सलमानला शिक्षा सुनावताच, या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या बिष्णोई समाजाने एकच जल्लोष केला.(source :abpmajhaj)
महत्वाच्या घटना
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
जन्म
१७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून१८३६)
१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)
१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर१९६०)
१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९८१)
१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)
१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.
१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०००)
१९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.
१९३१: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)
१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.
मृत्यू
११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)
१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
१९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.
१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतो नाथ चौधरी यांचे निधन. (जन्म: १० जून १९०८)
१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
१९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९२०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.