तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देऊन आपला खर्च भागवावा लागत आहे तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजुरी मिळताच इच्छूक कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेज देऊन निवृत्त करण्यात येणार असल्याचे बीएसएनएलचे चेअरमन प्रवीणकुमार पूरवार यांनी सांगितले आहे.
पूरवार यांनी म्हटले की, “आम्ही स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावावर विचार करीत आहोत. त्यानुसार, सुमारे ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांना आम्हाला स्वेच्छेने निवृत्त द्यायची आहे. यासाठी त्यांना आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. यांपैकी ६० ते ७० हजार कर्मचाऱ्यांनी जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी कंपनीत १ लाख कर्मचारी शिल्लक राहतील. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना निवृत्ती दिल्यानतंर त्याजागी आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरण्यात येतील. तसेच महिन्याच्या करारावरही काही लोकांना घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
पूरवार पुढे म्हणाले, इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे बीएसएनएललाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल वाढवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. त्यानंतर कामकाजाचा खर्च दुसरी प्राथमिकता आहे. त्याचबरोबर इतरही असे अनेक खर्च आहेत जो मर्यादित ठेवण्यावर आम्ही विचार करीत आहोत. केवळ वीजेसाठी आमचा २७०० कोटी रुपयांचा खर्च होतो हा खर्च आम्ही १५ टक्क्यांनी कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात एखादी हिंदू महिला पोलीस अधिकारी झाल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पोलिसांनी पहिल्यांदाच आपल्या पथकात एखाद्या हिंदू महिलेचा समावेश करून घेतला आहे. पुष्पा कोल्ही नाव असलेल्या या महिलेने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ही कामगिरी केली आहे. बुधवारी माध्यमांकडून याबाबत माहिती देण्यात आली. पुष्पा यांना सहायक उपनिरीक्षक या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
ही बातमी सर्वात अगोदर मानवधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी ट्विटद्वारे मंगळवारी शेअर केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुष्पा कोल्ही हिंदू समाजातील पहिली महिला ठरली आहे, जी सिंध प्रांतातील नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन, सिंध पोलिसात सहायक उपनिरीक्षक झाली आहे. त्यांना आणखी बळ मिळो.”
पाकिस्तानातील हिंदू समाजाच्या सुमन पवन बोदानी यांना जानेवारीत दिवाणी व न्यायिक दंडाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले होते. बोदानी सिंध प्रांतातील शाहदादकोट येथील आहेत. त्यांनी बीबीसी उर्दूला मुलाखत देताना सांगितले होते की, त्या सिंधमधील अशा अविकसीत ग्रामीण भागातुन आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी गरिबीशी संघर्ष करणाऱ्या लोकांना अनेक संकटांना तोंड देताना पाहिले आहे. तसेच त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्या सर्व परिवाराने त्यांना साथ दिली व न्यायाधीश बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
व्लादिवोस्तोक, रशिया : भारत व रशिया हे कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याच्या विरोधात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेनंतर सांगितले. दोन्ही नेत्यांनी व्यापार व गुंतवणूक,तेल व वायू, अणुऊर्जा, संरक्षण, अवकाश, सागरी संपर्क या सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांच्या सहकार्यावर त्यांनी भर दिला.
मोदी यांचे दोन दिवसांच्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी रशियात आगमन झाले. पुतिन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले,की दोन्ही देश हे कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याच्या विरोधात आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यात कलम ३७० रद्द केल्यानंतर तणावाचे वातावरण असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. जम्मू काश्मीरच्या दर्जात भारताने केलेले बदल हे घटनात्मक चौकटीत असल्याचे सांगून रशियाने आधीच भारताला पाठिंबा दिला होता.
पुतिन व मोदी यांच्यात शिष्टमंडळ पातळीवर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी सांगितले,की चेन्नई ते व्लादिवोस्तोक दरम्यान सागरी मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, या दोन शहरादरम्यान सागरी संदेशवहन यंत्रणा सुरू करण्याबाबत प्राथमिक उद्देश करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
रशिया व भारत यांच्या दरम्यान अणुभट्टय़ा उभारण्यास प्राधान्य देण्यात येत असून दोन्ही देशातील मैत्री केवळ मॉस्को व दिल्लीपुरती मर्यादित नाही, तर लोक पातळीवर संपर्क वाढत आहे. गगनयान मोहिमेतील भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्याचे काम रशिया करीत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जे उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर रिझव्र्ह बँकेने आता सक्तीचा बडगा उगारला आहे.
यापूर्वी अनेकदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी केले नाहीत. स्टेट बँकेसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे. रिझव्र्ह बँकेने रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती. 1 एप्रिलपासून बँकांनी रेपो संलंग्न दर करण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. अखेर आता त्याबाबत सक्ती करण्यात आली आहे.
बँकांनी येत्या 1 ऑक्टोबरपासून त्यांचे नवे बदलते (फ्लोटिंग) गृहादी कर्ज व्याजदर हे रिझव्र्ह बँकेच्या रेपो दरांशी निगडित ठेवावेत, तसेच वाहन, लघू उद्योगांसाठीही अशी रेपो दर संलंग्न व्याजदर उत्पादने असावीत असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रिझव्र्ह बँकेच्या रेपो दर बदलाचा थेट व त्वरित लाभ कर्जदारांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ऑक्टोबर महिन्यातच दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार आहे. रेपो रेटशी व्याजदर संलग्न केल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांच्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी त्यांचे आगमन झाले. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र मोदींनी याची सुरुवात २००१ मध्ये झाली असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की, “त्यावेळी पुतिन अध्यक्ष होते आणि मी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने आलो होतो. त्यानंतर आमच्या मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली,”. नरेंद्र मोदींनी २००१ मधील शिखर परिषदेच्या आठवणी ताज्या करत काही फोटो ट्विट केले.
मोदींनी शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोत ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाजूला बसलेले दिसत असून दुसऱ्या बाजून पुतिन बसलेले आहेत. तर दुसऱ्या फोटोत अटलबिहारी वाजपेयी आणि पुतिन संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत असून नरेंद्र मोदी आणि जसवंत सिंह मागे उभे असल्याचं दिसत आहे. जसवंत सिंह त्यावेळी परराष्ट्र मंत्री होते.
मोदींनी फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “२० व्या भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होताना मला २००१ ची आठवण येत आहे जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि मला गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने प्रतिनिधी मंडळात सहभागी करुन घेतलं होतं,”.
राष्ट्रीय शिक्षक दिन / आंतरराष्ट्रीय दान दिन
महत्वाच्या घटना
१९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.
१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
जन्म
११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६)
१६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५)
१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)
१८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)
१८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)
१९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.
१९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)
१९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)
१९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.
१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.
१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.
१९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.
मृत्यू
१८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.
१९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)
१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)
१८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)
१९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.
१९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)
१९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.
१९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)
१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)
२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)
२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.