चालू घडामोडी - ०५ मार्च २०१८

Date : 5 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानमध्ये कृष्णाकुमारी ठरल्या पहिल्या हिंदू महिला सिनेटर :
  • मुस्लीम बहुल पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथे राहणाऱ्या कृष्णाकुमारी कोहली सिनेटर होणाऱ्या पहिला हिंदू-दलित महिला ठरल्या आहेत. ३९ वर्षीय कोहली बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून (पीपीपी) निवडून आल्या आहेत.

  • पाकिस्तानच्या ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, कृष्णा यांनी तालिबानशी निगडीत एका मौलानाचा पराभव केला आहे. सिनेटवर कृष्णा यांचा विजय हा पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांसाठींचा अधिकार आणि महिलांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे.

  • कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कृष्णा यांचे वडील शेतकरी होते. १९७९ मध्ये कृष्णा यांचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच नववीत असताना त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवले आणि २०१३ मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

  • कृष्णा या आपल्या भावाबरोबर कार्यकर्ता म्हणून पीपीपीमध्ये सहभागी झाल्या होत्या. थारमधील लोकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. २००५ पासून त्यांनी समाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राइट्स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांनी निवड झाली होती.(source :loksatta)

ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरित :
  • कॅलिफोर्निया - 90 व्या ऑस्कर पुरस्कार 2018 सोहळ्याची कॅलिफोर्नियातील डोल्बी थिएटरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे.  प्रत्येक कलाकारासाठी अतिशय  महत्त्वपूर्ण असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थित दर्शवली आहे.

  • पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्याची परंपरा सुरू आहे.

  • गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किमेल करत आहेत. दरम्यान यंदा ऑस्कर सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्री डेनियला वेगा हिच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. अभिनेत्री मेरिल स्ट्रीपला यंदाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात नामांकन मिळाले आहे.  21 नामांकने मिळवत या अभिनेत्री यंदा वेगळाच रेकॉर्ड रचला आहे. शिवाय,यापूर्वी तीन वेळा तिनं ऑस्कर पुरस्कार मिळवलादेखील आहे. 

  • गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेता यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करतो, ही ऑस्कर सोहळ्याची परंपरा आहे. मात्र, जेनिफर लॉरेन्स आणि जे. फोस्टर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराची घोषणा करणार आहेत व जेन फोंडा आणि हेलेन मिरेन विजेत्याला पुरस्कार प्रदान करणार आहेत.(source :lokmat)

अखेर 'एनसीआरटी'च्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचे चित्र छापले :
  • नवी दिल्ली: राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (एनसीईआरटी) समितीने अखेर आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या मजकुरात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

  • यापूर्वीच्या पुस्तकात असणाऱ्या 'अवर पास्ट-2' या विभागात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याबद्दल अत्यंत त्रोटक माहिती होती. त्यामुळे शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने पाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • सातवी इयत्तेच्या या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी खर्ची घालण्यात आली आहेत, तर छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६ ओळींत मांडून संपवण्यात आला, असे शिवसेनेचे म्हणणे होते. याशिवाय, पुस्तकात जागा असूनही शिवरायांचे चित्र छापले नाही. याउलट बाबर आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र पुस्तकात छापण्यात आली होती. यावर शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने तीव्र आक्षेप घेतला होता. ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.

  • गोव्यात आंदोलन केल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडे गेली ८ वर्षे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले होते.

  • या पार्श्वभूमीवर 'एनसीआरटी'कडून पाठ्यपुस्तकात काही बदल करण्यात आले. त्यानुसार आता 'अवर पास्ट-2' या विभागातील तिसऱ्या आणि दहाव्या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या मजकुरात 100 शब्दांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे गनिमी पद्धतीचे युद्धतंत्र, लहान वयात त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि त्यांनी कशाप्रकारे भक्कम साम्राज्याची पायाभरणी केली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे चित्रही छापण्यात आले आहे.(source :lokmat)

८७ कोटी खात्यांना ‘आधार’, ८०% बँक खाते, ६०% मोबाइल कनेक्शनचे लिंकिंग :
  • नवी दिल्ली - देशभरात ८० टक्के बँक खाते आणि ६० टक्के मोबाइल कनेक्शन आधार कार्डला जोडण्यात आले आहेत. यूआयडीएआयच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ही माहिती दिली. सरकारने यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत दिलेली आहे.

  • पॅन नंबरही आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सर्व मोबाइल सिम ३१ मार्चपर्यंत आधारशी जोडणे आवश्यक आहे, जेणेकरून मोबाइल फोनधारकांची ओळख निश्चित करता येईल. यूआयडीएआयच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, १०९.९ कोटी बँक खात्यातील जवळपास ८७ कोटी खाते आधारला जोडण्यात आले आहेत. यातील ५८ कोटी बँक खात्यांचे सत्यापन झाले आहे, तर उर्वरित बँक खात्यांच्या सत्यापनाचे काम सुरू आहे.

  • या अधिकाºयांनी सांगितले की, १४२.९ कोटी सक्रीय मोबाइल कनेक्शनपैकी ८५.७ कोटी यापूर्वीच आधारशी जोडले गेले आहेत. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, जवळपास ८० टक्के बँक खाते आधारला जोडले गेले आहेत. उर्वरित खातेही लवकरच जोडले जातील. देशातील १.२ कोटी नागरिकांना १२ अंकी आधार नंबर देण्यात आला आहे.

  • विविध सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांमध्ये ओळख म्हणून आधारची आता आवश्यकता आहे. तथापि, आधारच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान देण्यात आले असून, पाच सदस्यीय घटनापीठ याबाबत सुनावणी करत आहे.

  • सद्या पॅन, बँक खाते, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लॅन आणि सामाजिक लाभाच्या योजना यांच्यासाठी आधार नंबर असणे आवश्यक आहे. यूआयडीएआयने अलीकडेच व्हर्च्युअल आयडीची घोषणा केली आहे. आधारकार्डधारक वेबसाईटवरून हा आयडी जनरेट करू शकतात. प्रमाणीकरणाच्या वेळी याचा उपयोग करता येणार आहे. आधारने अलीकडेच ही घोषणा केली आहे की, फिंगरप्रिंटसोबत चेहºयावरूनही ओळख करता येणार आहे.(source :lokmat)

सर्वांत युवा अर्थमंत्री ते मेघालयचे मुख्यमंत्रीपद, कोनराड संगमा यांचा राजकीय प्रवास :
  • कोनराड संगमा मेघालयचे नवे मुख्यमंत्री होतील. त्यांनी मागील दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या मुकूल संगमा सरकारला सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपाने मित्रपक्षांची जमवाजमव करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

  • ४० वर्षीय कोनराड संगमा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. कोनराड यांचे वडील दिवंगत पी ए संगमा हे लोकसभेचे माजी अध्यक्ष होते. त्यांची बहीण अगाथा संगमा याही राजकारणात सक्रीय आहेत. कोनराड सध्या मेघालयमधील तुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व अगाथा करत असत.

  • कोनराड संगमा मेघालचे मुख्यमंत्री झाले तर घटनेप्रमाणे त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागेल. त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागेल. नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली मेघालयमध्ये पुढील सरकार स्थापन होईल.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोनराड हे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शपथ घेतील. विद्यमान सरकारचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपणार आहे. कोनराडा संगमा हे मेघालयचे बारावे मुख्यमंत्री होतील. यापूर्वी आठव्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. सन २००८ मध्ये मेघालयचे सर्वांत युवा अर्थमंत्री म्हणून कोनराड यांची ओळख आहे.

  • मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभाध्यक्ष राहिलेले पी ए संगमा यांचे कोनराड हे सुपूत्र. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ मध्ये वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यात झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रचाराची धुरा हातात घेत राजकारणात पहिले पाऊल टाकले.(source :Loksatta)

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांच्या वाहनांनाही यापुढे नंबर प्लेट :
  • भारतात सर्वोच्च घटनात्मक अधिकारी असलेले  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व नायब राज्यपाल यांच्या वाहनांना लवकरच नोंदणीकृत क्रमांक दिले जाणार असून ते प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

  • रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी.हरी शंकर यांच्यापुढे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात म्हटले आहे की, या सर्व उच्चपदस्थांना त्यांच्या वाहनांची नोंदणी करण्याबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत.  २ जानेवारी २०१८ च्या पत्रानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, नायब राज्यपाल तसेच त्यांच्या सचिवालयातील अधिकारी तसेच परराष्ट्र मंत्रालयातील सचिव व त्यांचे अधिकारी यांना वाहनांची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे.

  • सरकारी वकील राजेश गोगना यांनी सरकारच्या वतीने सांगितले की, वरील सर्व घटनात्मक अधिकारी व्यक्ती व संबंधितांना वाहनांची नोंदणी करण्यास सांगण्यातआले आहे. घटनात्मक अधिकाऱ्यांच्या मोटारीवर नोंदणी क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायभूमी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती.

  • नोंदणी क्रमांकाच्या ऐवजी चार सिंहांची प्रतिमा वाहनांवर असते त्यामुळे हे सर्वोच्च अधिकारी आहेत हे लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या मोटारी या वेगळ्या समजून येतात त्यामुळे त्यांच्यावर दहशतवादी हल्ला करणे सोपे जाऊ शकते. त्यामुळे या वाहनांना क्रमांक असण्याची मागमी केली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

  • १६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

  • १८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

  • १९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

  • १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

  • १९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

  • १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

  • १९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

  • १९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

  • २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

जन्म

  • १५१२: नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)

  • १८९८: चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)

  • १९०८: ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९९०)

  • १९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.

  • १९१३: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००९)

  • १९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल१९९७)

  • १९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.

मृत्यू

  • १५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

  • १६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

  • १८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

  • १९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.

  • १९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.

  • १९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.

  • १९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.

  • १९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.

  • १९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.

  • २०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.