भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शाह मातोश्रीवर जाऊन संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी अमित शाह २०१९ निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे. बैठकीबद्दल सध्या गुप्तता पाळली जात आहे.
मुंबईत आल्यावर मातोश्रीवर जाण्यास नेहमी टाळाटाळ करणारे अमित शाह मातोश्रीवर जात असल्या कारणाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते.
पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. उद्धव ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरु होती, मात्र तसं काही झालं नाही. भाजपा मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून स्वत: अमित शाह उद्धव ठाकरेंसोबत युती कायम ठेवण्याबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र शिवसेना काही झालं तरी एकला चलो रे ही भूमिका सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. जर पालघर पोटनिवडणुकीमुळे भाजपा युती करण्याचा विचार करत असेल तर हे फारच दुर्देवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली: देशातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकार 4 सरकारी बँकांचं विलीनीकरण करणार आहे. या विलीनीकरणातून देशात स्टेट बँक ऑफ इंडियानंतरची दुसरी मोठी बँक तयार होईल. सध्या देशातील सरकारी बँकांवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे. या बँकांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं विलीनीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
काही महिन्यांपूर्वीच स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं. यानंतर आता मोदी सरकारनं आयडीबीआय, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा आणि ओरिएंटल बँकेचं विलीनीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.
या सर्व बँका एकत्र आल्यावर त्यांच्या संपत्तीचं एकूण मूल्य 16.58 लाख कोटी रुपये इतकं असेल. 2018 मध्ये या बँकांचा तोटा जवळपास 22 हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बँकांचं विलीनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांना नवसंजीवनी देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या चारही बँकांना नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे. विलीनीकरणानंतर या बँकांना त्यांच्याकडे असणारी संपत्ती सहज विकता येईल आणि त्यातून त्यांचं नुकसान भरुन काढता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंगच्या नियमांमध्येही लवकरच मोठे बदल होणार आहेत.
नवी दिल्ली : समाजातील वंचितांचे जीवनमान सुधारणे तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. सर्व राज्यपाल व नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद सोमवारपासून राष्ट्रपती भवनात सुरू झाली.
परिषदेच्या उद््घाटनाच्या कोविंद म्हणाले की, राज्यपाल हा राज्य सरकारचा मार्गदर्शक व संघराज्यपद्धतीतील महत्त्वाचा दुवा असतो. राज्यपाल व राजभवन यांच्याकडे त्या राज्यातील जनता आदर्श व मूल्यांचा स्रोत म्हणूनही पाहत असते.
देशातील एकूण विद्यापीठांपैकी ६९ टक्के राज्य सरकारच्या अख्यत्यारित येतात. ९४ टक्के विद्यार्थी विद्यापीठांत उच्च शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी या विद्यापीठांना कुलपती या नात्याने राज्यपालांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गांधीजींचे १५० वे जयंती वर्ष - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचा प्रारंभ २ आॅक्टोबरपासून होत असून त्यानंतरच्या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. यानिमित्त कोणते उत्तम कार्यक्रम करता येतील याबद्दलच्या सूचना राज्यपालांनी पाठवाव्यात असेही आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
मुंबई : डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या फसवणुकींबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सतर्क केलं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास कसलीही चिंता न करता तीन कार्यालयीन दिवसांच्या आत बँकेत तक्रार करा, त्यानंतर जबाबदारी बँकेची असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.
सरकारकडून ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. बँका अनेकदा हात वर करतात, ज्यामुळे ग्राहक हतबल असतात. मात्र आरबीआयने आता ग्राहकांना सतर्क करत तीन दिवसांच्या आत तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.
आरबीआयने आजपासून देशभरात वित्तीय साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे. एटीएमचे अयशस्वी व्यवहार, ग्राहकांना पूर्वसूचना न देताच खात्यावर शुल्क आकारणं याबाबतीत ग्राहक आपल्या शाखेत तक्रार करु शकतात, असं आरबीआयने सांगितलं.
एका महिन्याच्या आत तक्रारीचं निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालच्या समक्ष तक्रार करता येईल. चार ते आठ जून दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात बँक आणि ग्राहक यांच्यात आर्थिक सेवा, डिजिटल माध्यमांचा उपयोग यासह विविध गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
भारत जगातला एकमेव देश आहे, जिथे अशा प्रकारची सेवा दिली जात आहे, असं आरबीआयने सांगितलं. वित्तिय साक्षरतेअंतर्गत बँक शाखांमध्ये बॅनर, पोस्टर यांच्या माध्यमातून सुरक्षित इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि डिजिटल बँकेच्या अनुभवासाठी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेच्या हमीवरही भर देण्यात येणार आहे.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात प्रभावी समाजमाध्यमांपैकी असलेल्या फेसबुकने मोबाइल बनविणाऱ्या ६० कंपन्यांशी डेटाच्या देवाणघेवाणीचे करार केले आहेत. त्यात अॅपल व मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे. या कंपन्यांनी फेसबुकच्या माहिती मुक्तहस्ते वापर केल्याची बाब अमेरिकेतील एका वृत्तपत्राने उजेडात आणली आहे.
फेसबुकवरील लाखो लोकांची माहिती चोरून केंब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी वापरली होती. हे उघडकीस आल्याने फेसबुकची धोक्यात आली. फेसबुककडून विविध कंपन्यांना माहितीची देवाणघेवाण कशी होत होती, याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
लोकांची माहिती अन्य कोणालाही वापरू देणार नाही असे फेसबुकने जाहीर केले होते. परंतु फेसबुकने हे पाळले नाही. करार केलेल्या ६० कंपन्यांना फेसबुकने आपल्या खातेदारांची माहिती मुक्त हस्ते वापरू दिली, असे न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
मुंबई : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून जाहीर करण्यात आला आहे. कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली असून, तिला 720 पैकी 691 गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे.
कृष्णाचे वडील आशिष अग्रवाल हे बालरोगतज्ज्ञ आहेत, तर आई डेंटिस्ट आहेत. यंदाचा नीट परीक्षेचा कट ऑफ घसरला असून, जनरल कॅटेगरीसाठी यावर्षी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 119 मार्क्स आहेत. मागच्या वर्षी हा कट ऑफ 131 होता. तर ओबीसी, एससी, एसटीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 96 मार्क्स असणार आहे, जो मागच्या वर्षी 107 होता. यंदा 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत.
जागतिक पर्यावरण दिन.
महत्वाच्या घटना
१९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
जन्म
१८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९५५)
१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)
१९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.
१९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ यांचा जन्म.
मृत्यू
१९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर २०११)
१९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९३३)
१९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.