चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ जुलै २०१९

Date : 5 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अर्थसंकल्पात आयकराबाबत दिलासा मिळणार :
  • नवी दिल्ली : मोदी सरकार 2 आज आपला पहिला अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. या बजेटमध्ये रोजगार, ग्रामीण भारत, सिंचन आणि एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं जाईल अशी अपेक्षा आहे. सामान्यांनी या बजेटमध्ये खूप जास्त सूट आणि थेट फायद्याची अपेक्षा न केलेलीच बरी. याशिवाय सरकारचं लक्ष्य या बजेटमध्ये पायभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर असेल. तसंच सरकार आर्थिक तूटही 3.4 टक्क्यांच्या जवळपास ठेवण्याचा प्रयत्न करेल.

अर्थसंकल्पात आयकराबाबत दिलासा मिळणार?

  • आयकर # 80 सी मध्ये जास्त सूट : सध्या 80 सीमध्ये 1.5 लाख रुपयांची सूट आहे. ही मर्यादा 30 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. याद्वारे पीपीएफ आणि एनपीएसमध्ये जास्त गुंतवणुकीसाठी लोक प्रेरित होतील. तर सरकारकडे खर्च करण्यासाठी जास्त फंड असेल.

  • # 80 डी मध्ये ज्यादा सूट : 80 डीमध्ये करबचतीची कक्षा वाढवली जाऊ शकते. सध्या आरोग्य क्षेत्रातील उपकरणांमधील गुंतवणुकीवर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25 हजार रुपयांपर्यंत करात सूट मिळते. हे काही हजारांनी वाढवलं जाऊ शकतं, ज्यामुळे आरोग्य क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

  • # गृहकर्ज : सेक्शन 24बी अंतर्गत सध्या गृहकर्जावर 2 लाख रुपये सूट मिळते. रियल इस्टेट सेक्टरची अवस्था वाईट आहे, त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सेक्शन 24बी मध्ये मिळणारी सूट वाढवली जाऊ शकते.

  • # टॅक्स फ्री बॉण्ड : या बजेटमध्ये पुन्हा एकदा टॅक्स फ्री बॉण्डचं पुनरागमन होतं. या अर्थसंकल्पात लॉग टर्म टॅक्स फ्री बॉण्डची घोषणा होऊ शकते. या बॉण्डचा कालावधी 10 ते 15 वर्ष असू शकतो. याद्वारे सरकारला रस्त्याच्या निर्मितीसाठी पैसे मिळवणं शक्य होईल. तर दुसरीकडे गुंतवणूक करणाऱ्यांना कमावलेल्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

  • # एनपीएसला प्रोत्साहन : न्यू पेंशन स्कीमला प्रोत्साहन देणअयासाठी बजेटमध्ये काही पावलं उचलली जाऊ शकतात. एनपीएस स्कीमला बजेटमध्ये ईईई चा दर्जा दिला जाऊ शकतो. याद्वारे ग्राहकांना क्लिअरन्सवर कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील मुख्य मुद्दे :

1. हा अहवाल म्हणजे गुंतवणुकीवर आधारित विकासाची ब्लू प्रिंट
2. पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थ व्यवस्था बनण्यासाठी गुंतवणूक वाढवणे हा कळीचा मुद्दा
3. 2018-19 या वर्षात विदेश व्यापार वाढला. आयात 15.4 टक्क्यांनी तर निर्यात 12.5 टक्क्यांनी वाढली.
4. 2018-19 या वर्षात अन्नधान्य उत्पादन 28.34 कोटी टन राहण्याचा अंदाज
5. गुंतवणूक-बचत-निर्यात या चक्राला चालना देण्याचे प्रयत्न
6. स्वच्छ भारत अभियान आणि बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजनांचा जनमानसावर झालेला प्रभाव बघता धोरण ठरवताना त्याची मदत घेणे
7. छोट्या, मध्यम उद्योगांना बळ देणे, रोजगार निर्मिती, नेट व्हॅल्यू वाढवणे
8. नागरिकांच्या डेटाचा लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्याच भल्यासाठी कार्यक्षमपणे वापर करणे
9. कोर्टातील साडेतीन कोटी केसेसचा निपटारा करणे, न्यायाधीशांची रिक्त पदं भरणे, कार्यक्षमता वाढवणे
10. गेल्या पाच वर्षात देशातील आर्थिक धोरणातील अस्थिरता जगाच्या तुलनेत कमी झाली आहे, यात स्थैर्य राखत गुंतवणुकीवर परिणाम होऊ न देणे.
11. मनरेगासारख्या योजनांमध्ये योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवलं तर चांगले परिणाम मिळतात, त्यावर भर देणे
12. असंघटित क्षेत्रातील कामगारांना/मजुरांना/रोजंदारीवर काम करणाऱ्यांना संपूर्ण देशात समान किमान वेतन (minimum wage) असावं, यासाठी धोरण
13. तरुणांचा देश असला तरी येत्या 20 वर्षात काही राज्यांचं सरासरी वय वाढणार, त्यासाठी योग्य ती पावलं उचलणे
14. या आर्थिक वर्षात कच्च्या तेलाचे दर कमी राहण्याचा अंदाज

अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज, शुक्रवारी संसदेत मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत.

  • कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

  • तब्बल ४९ वर्षानंतर महिला अर्थमंत्री बजेट सादर करणार आहेत. ५ जुलै शुक्रवारी निर्मला सितारमन संसदेत बजेट सादर करणार आहेत. ४९ वर्षापूर्वी २८ फेब्रुवारी १९७० मध्ये प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तब्बल ४९ वर्षानंतर एखादी महिला अर्थसंकल्प सादर करणार आहे ही आर्श्चयाची बाब आहे.

  • दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला देशाच्या आर्थिक स्थितीचे वास्तवदर्शी चित्र स्पष्ट व्हावे यासाठी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१८-१९चा हा आर्थिक पाहणी अहवाल उभय सभागृहात मांडताना आर्थिक विकासाची गती वाढण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच गेल्या पाच वर्षांत देशाने सरासरी ७.५ टक्क्यांनी विकास साधल्याचा दावाही त्यांनी केला.

  • निर्मला सीतारामन यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि भाजपमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर २ वर्षांतच त्या भाजपच्या प्रवक्त्या बनल्या. २६ मे २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. त्या पुन्हा ३ डिसेंबर २०१७ रोजी कॅबिनेटच्या फेरबदलात संरक्षण मंत्री झाल्या.

जातीय तणावामुळे जयपूरमध्ये इंटरनेटवर र्निबध :
  • जयपूरमध्ये सात वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या घटनेनंतर जातीय तणाव निर्माण झाल्याने राज्य सरकारने गुरुवारी शहरातील काही भागांमध्ये इंटरनेटवर घातलेल्या र्निबधांना २४ तासांसाठी मुदतवाढ देण्यात आली. या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

  • मात्र, चौकशी सुरू असल्याने यापैकी कोणालाही अटक केलेली नाही, असे जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले. या चिमुरडीला सोमवारी अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरून तिच्या घराजवळूनच पळविले.

  • दोन तासांनी या मुलीला तेथेच सोडण्यापूर्वी त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर जातीय तणाव वाढला आणि जमावाने आरोपीच्या अटकेची मागणी करीत अनेक घरांना लक्ष्य केले. यात ६० हून अधिक वाहनांची मोडतोड झाली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

  • १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

  • १८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

  • १८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

  • १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

  • १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

  • १९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

  • १९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

  • १९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.

  • १९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

  • १९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.

  • १९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अ‍ॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.

  • १९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.

  • १९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.

  • १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

  • १९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.

  • २००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

  • २०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.

जन्म 

  • १८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)

  • १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

  • १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)

  • १९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)

  • १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

  • १९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)

  • १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.

  • १९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१)

  • १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)

  • १९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.

  • १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)

  • १९९६: रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.

  • २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

  • २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.