चालू घडामोडी - ०५ जानेवारी २०१८

Date : 5 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सावधान! ५०० रुपयांत चोरली जातेय आधार कार्डची माहिती :
  • तुमचे आधार कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यातील माहिती चोरणे अशक्य असल्याचा दावा एकीकडे केंद्र सरकारने केला होता. पण, हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे . कारण ५०० रुपयांत देशातल्या कोट्यवधी लोकांच्या आधार कार्डची माहिती अगदी सहज उपलब्ध होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • ‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत होता. या मेसेजच्या माध्यामातून ५०० रुपयांत १०० कोटी आधार कार्डचा अॅक्सेस आपल्याला मिळाला असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

  • या प्रकरणाच्या अधिक खोलावर जात तपास केला असता यात मोठे रॅकेट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात अनेक एजंट गुंतले असल्याची भीतीही त्यांनी व्यक्ती केली आहे. ५०० रुपये दिल्यानंतर आधार कार्डच्या अॅक्सेसचा गेटवे आणि लॉग इन पासवर्ड १० मिनिटांसाठी दिला जातो.

  • त्याद्वारे आधार कार्डचा नंबर टाकल्यावर कोणत्याही व्यक्तिची माहिती मिळू शकते असा धक्कादायक खुलासा या वृत्तपत्राने केला आहे. तसेच अतिरिक्त ३०० रुपये दिल्यास उपलब्ध माहितीची प्रिंट काढण्याचा अॅक्सेसही मिळतो अशी आणखी एक धक्कादायक बाब त्यांनी उजेडात आणली. (source : loksatta)

बेंजामीन नेतान्याहू भारत भेटीदरम्यान मोदींना देणार खास गिफ्ट :
  • जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खास गिफ्ट देणार आहेत. बेंजामीन नेत्यानाहू 14 जानेवारीला भारत दौ-यावर येत असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाणी शुद्धीकरण करणारी मशिन भेट स्वरूपात देणार आहेत. पाण्यातील क्षार काढून ते पिण्यास शुद्ध करणारी फिरती मशिन (जीप) भेट देणार आहेत.

  • गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी इस्रायल दौ-यावर असताना मेडिटेरियन समुद्रात नेतान्याहू व मोदी गेले होते व त्यांनी किना-यावर बग्गी जीपमधून फेरफटकाही मारला होता. आता तीच जीप नेतान्याहू मोदी यांना देणार आहेत. नेत्यानाहू हे चार दिवस भारताच्या दौ-यावर राहणार आहेत. या भेटीदरम्यानच नेत्यानाहू मोदींना बग्गी जीप गिफ्ट म्हणून देणार आहेत.

  • या बग्गी जीपची किंमत 390,000 शेकेल इतकी आहे. मोदी इस्राएलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांनी नेत्यानाहू यांचे आभारही व्यक्त केले होते. मी नेत्यानाहू यांचा आभारी आहे. ती जीप मी आज पाहिली. त्या मशिनच्या माध्यमातून समुद्राचं क्षारयुक्त खारं पाणीही शुद्ध करता येऊ शकतं.

  • या मशिनचा उपयोग नैसर्गिक आपत्ती भूकंप, पूर अशा वेळी होऊ शकतो. तसेच लष्करालाही या जीपचा वापर करता येऊ शकतो. ही जीपयुक्त मशिन दिवसाला समुद्राचं 20 हजार लिटर पाणी शुद्ध करू शकते. तर नदीचं 80 हजार लिटर पाणी शुद्ध करण्याची या मशिनमध्ये क्षमता आहे, असंही मोदी म्हणाले होते. अखेर नेत्यानाहू हीच जीप पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात देणार आहेत. (source : lokmat)

तीन तलाक विधेयकाचे भवितव्य अधांतरी, सरकारकडे नाही बहुमत; अधिवेशन आज संपणार :
  • नवी दिल्ली - तीन तलाक विधेयक (मुस्लीम महिला विवाह संरक्षण विधेयक २0१७) दुसºया दिवशीही राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. त्यासाठी लागणारे बहुमत सत्ताधारी पक्षाकडे राज्यसभेत नाही. विरोधी बाकांवरील १७ पक्षांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा आग्रह धरला आहे.

  • हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपणार आहे. विधेयकाचे भवितव्य आज तरी अधांतरीच आहे. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, विधेयकात अनेक त्रुटी असल्याने आमचा विरोध आहे.

  • अनेक तरतुदी मुस्लीम महिलांनाच संपवणाºया आहेत. पतीला तुरुंगात घालण्याच्या तरतुदीमुळे पत्नी व मुलांच्या पोषणाचा खर्च कोण करणार? याचा उपाय विधेयकात नाही. तलाक प्रथा आम्हालाही मान्य नाही. मात्र कायदा विचारपूर्वकच केला पाहिजे.

  • चिकित्सा समितीत विधेयक पाठवल्यास त्यावर सविस्तर विचार करता येईल. सपाचे नेते नरेश अग्रवाल यांनीही हीच मागणी केली. तांत्रिक बाबींचा आधार घेत सभागृह नेते अरुण जेटली यांनी, विरोधकांनी विधेयकाबाबत २४ तास आधी प्रस्ताव दिले नसल्याने ते वैध नाहीत, असा दावा केला. (source : lokmat)

जगाला वेठीस धरणा-या उत्तर कोरियाचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक :
  • तिरुवनंतपुरम- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे संपूर्ण जगावर चिंतेचे सावट आहे पण केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन  मात्र उत्तर कोरियाच्या प्रेमात आहेत. अमेरिकेच्या दबावापुढे न झुकल्याबद्दल मंगळवारी पिनरायी विजयन यांनी उत्तर कोरियाचे कौतुक केले. उत्तर कोरिया अत्यंत कठोरपणे अमेरिकाविरोधी अजेंडा राबवत आहे. 

  • उत्तर कोरियाने आतापर्यंत यशस्वीपणे अमेरिकेच्या दबावाचा सामना केला आहे असे विजयन म्हणाले. कोझीकोडो येथील जिल्हा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

  • उत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अमेरिकेचा प्रखर विरोध असतानाही डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून उत्तर कोरियाने आतापर्यंत 20 वेळा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.  

  • किम संपूर्ण जगामध्ये खलनायक असला तरी केरळमध्ये डाव्या आघाडीचे कार्यकर्ते त्याचे समर्थन करतात. काही दिवसांपूर्वी किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले होते. केरळमधील नेडुमकांडम येथे होणाऱ्या माकपाच्या बैठकीसाठी लावलेल्या पोस्टरवर थेट किम जोंग उन झळकल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. (source :lokmat)

घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न, कचºयातून खतनिर्मिती :
  • नवी मुंबई - घनकचरा व्यवस्थापनाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर पथदर्शी ठरू लागला आहे. कच-यातून खतनिर्मिती, फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिकचाही पुनर्वापर सुरू आहे. वृक्षांच्या फांद्यांपासून गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून २५ किलोवॅट क्षमतेचा विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. डेब्रिजपासूनही बांधकाम साहित्य तयार करण्यात येणार आहे.

  • स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम व प्रकल्प राबविले जात आहेत. कचरामुक्त शहरासाठी घनकचºयाची अत्याधुनिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातून ७०० मेट्रिक टन कचरा रोज संकलित होत आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच कचºयाचे वर्गीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

  • सद्यस्थितीमध्ये ८५ टक्के कचºयाचे वर्गीकरण होत आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी व्यापक जनजागृती सुरू केली आहे. रामनगरसारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये कचºयाचे वर्गीकरण ९० टक्क्यापर्यंत पोहचले आहे. तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर कचºयातून खतनिर्मिती होत आहे.

  • कचºयापासून प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स व उद्योग समूहांमध्ये बॉयलरमध्ये इंधन म्हणून वापर केला जात आहे. फ्युएल पॅलेट्सची निर्मिती केली जात असून उरलेला कचराच प्रत्यक्ष डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.

  • डम्पिंग ग्राउंडमधून निर्माण झालेल्या कचºयाचा वापर शहरातील २०० उद्यानांमध्ये केला जात आहे. याशिवाय पालघर, ठाणे, डहाणू, वसई, शहापूर, रायगड जिल्ह्यातील माणगाव, पेणपासून पुणे जिल्ह्यातील तळेगावपर्यंत शेतकरी हे खत घेवून जात आहेत.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

  • १६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.

  • १८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

  • १९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.

  • १९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

  • १९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

  • १९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

  • १९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.

  • १९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.

  • १९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

  • १९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

जन्म 

  • १५९२: ५वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

  • १८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)

  • १८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

  • १८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

  • १८८३: अरब कवी, तत्त्वज्ञानी आणि चित्रकार खलील जिब्रान यांचा जन्म.

  • १८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून१९६४ – मुंबई)

  • १९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)

  • १९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

  • १९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

  • १९२८: मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.

  • १९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी  यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

  • १९४८: भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)

  • १९४८: अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.

  • १९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.

  • १९८६: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.

मृत्यू

  • १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

  • १९३३: अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)

  • १९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

  • १९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

  • १९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)

  • १९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.

  • १९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)

  • २००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.