नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात मंगळवारपासून (5 डिसेंबर) अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी विवाद प्रकरणावरील अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ याप्रकरणी नियमित सुनावणी करणार आहेत.
कागदोपत्री कार्यवाही पूर्ण न झाल्यानं या प्रकरणात मोठी अडचण निर्माण होत होती, मात्र आता ही कार्यवाही पूर्ण झाली आहे. हजारो पानांच्या न्यायालयीन दस्तऐवजांचे इंग्रजी भाषेत अनुवाद नसल्यानं सुप्रीम कोर्टानं राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी विवाद प्रकरणावर 5 डिसेंबरपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता.
कोर्टानं सर्व पक्षकारांना हिंदी, पाली, उर्दू, अरबी, फारसी, संस्कृत अन्य सात भाषांमधील न्यायालयीन दस्ताऐवजांना 12 आठवड्यांच्या आत इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचे निर्देश दिले होते.
उत्तर प्रदेश सरकारला विविध भाषांमधील तोंडी साक्षींचे इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.
शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
१९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
नवी दिल्ली : काँगे्रसच्या अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सर्वोच्च पदासाठी बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले आहे. राहुल यांच्याकडे १९ वर्षांनंतर आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसची धुरा येणार आहे. या निवडीची औपचारिक घोषणा उद्या, मंगळवारी होईल. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज केलेला नाही.
अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधी (४७) यांनी आई सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केला.
राहुल गांधी सकाळी २४, अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात गेले. येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित आणि मोहसिना किडवई यांची त्यांनी भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव देणाºया सोनिया गांधी या पहिल्या नेत्या आहेत.
भाजपामधून अपेक्षित टीका या निवडणुकीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सभेत हे तर ‘औरंगजेब राज’ असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचेच नेते शहजाद पूनावाला यांनी निवडणूक प्रक्रियेलाच विरोध दर्शवीत ही निवडणूक नाही तर निवड असल्याची टीका केली होती.
मुंबई- ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर सगळ्यात जास्त फॉलो करणारा भारतीय व्यक्ती बनल्याच्या एका वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता 37.5 कोटी युजर्स ट्विटरवर फॉलो करतात.
गेल्या एक वर्षात जीएसटी, मन की बात, राष्ट्रपती निवडणूक आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती असे हॅशटॅग टेंड्रिंग असतानाही मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2017मध्ये सगळ्यात जास्त चर्चेच्या विषयांवर विचारला असता, ट्विटर इंडियाचे तरनजीत सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची नंबर एकची जागा अजूनही कायम ठेवली आहे. मोदींबरोबर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे क्रिकेट स्टार टॉप 10 लिस्टमध्ये आहेत.
विशेष म्हणजे टॉप 10 च्या या यादीतून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि ए.आर रहमान हे कलाकार बाहेर गेले आहेत. अभिनेता अक्षय कुमारच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली असून त्याने 2017मध्ये आमिर खानला मागे टाकलं आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात सुषमा स्वराज यांना हे पत्र मिळालं आहे.
दोन्ही देशांकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करण्याची आता वेळ आली आहे. कारण यामध्ये निर्दोष लोकांचा बळी जातो, असं ख्वाजा आसिफ यांनी पत्रात म्हंटलं आहे. भारतीय जवाल सुरूवातीला गोळीबार करून उकसविण्याचा प्रयत्न करतात. त्या गोळीबाराला पाकिस्तानकडून उत्तर दिलं जातं, असाही आरोपही ख्वाजा आसिफ यांनी पत्रातून केला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अजून या पत्राचं पाकिस्तानला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. मंत्रालयातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून करण्यात आलेला हा आरोप स्विकारण्याजोगा अजिबात नाही. 2017मधील सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा सतरा सदस्यीय संघ काल (सोमवार) रात्री नवी दिल्लीत जाहीर करण्यात आला.
यावेळी संघात यष्टिरक्षक पार्थिव पटेल आणि हार्दिक पंड्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्तानं भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.
अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेलची निवड करण्यात आली आहे. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकलेलं नाही. तर अश्विन आणि जाडेजा हे संघात कायम आहेत., या कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 58 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर बुमराहची कसोटी संघात वर्णी लागली आहे.
दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध खराब फॉर्म असलेल्या अजिंक्य रहाणेचीही निवड झाली असून त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जागतिक दिवस
जागतिक माती दिन
महत्वाच्या घटना
१९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
१९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.
१९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
१९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
१९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
२०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
जन्म
१८६३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९३३)
१८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
१८९८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी१९८२)
१९०१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी१९७६)
१९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
१९४३: वर्हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
मृत्य
१७९१: ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी१७५६)
१९५०: योगी अरविद घोष यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१९५१: चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
१९५९: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
१९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)
१९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)
१९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.
१९९९: स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.
२००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
२०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
२०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.