भारताने रविवारी सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली.
संकुल- ३ मधून मोबाइल ट्रकवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केली आहे. जलद प्रतिसाद देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे हे सुरक्षा क्षेपणास्त्र चालत्या ट्रकमध्ये एका मोठय़ा कुपीत ठेवण्यात आले होते.
त्यात घन इंधनाचा वापर केलेला असून त्याचा पल्ला २५-३० किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ४ जून २०१७ रोजी झाली होती. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याच्या दोन चाचण्या एकाच दिवशी घेण्यात आल्या व त्या यशस्वी झाल्या. रविवारी दोन क्षेपणास्त्रांची वेगवेगळ्या उंचीवर चाचणी घेण्यात आली. त्यात त्याची वायुगती, इंधन क्षमता, रचनात्मक स्थिती हे घटक योग्य काम करीत असल्याचे दिसून आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. तसेच मध्यरात्रीपासून श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय आज सकाळी ६ वाजल्यापासून जम्मूतमध्येही कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता काश्मीर खोऱ्या अचानक एवढी कुमक मागवण्याबरोबरच वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे स्थानिकांमध्ये तसेच प्रसारमाध्यमांमध्ये कलम ‘३५ अ’ संदर्भात केंद्र महत्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काय आहे कलम ‘३५ अ’ यावर टाकलेली नजर…
हे कलम तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १४ मे १९५४ रोजी राजी केलेल्या आदेशाद्वारेलागू करण्यात आले. भारत सरकार व जम्मू व काश्मीर यांच्यामध्ये झालेल्या दिल्ली करार १९५२ अन्वये राष्ट्रपतींचा आदेश जारी करण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या या आदेशाच्या आधारे भारताच्या संविधानात एक नवीन कलम ३५ (अ) जोडण्यात आले. कलम ३५ अ, कलम ३७० चाच हिस्सा आहे.
कलम ३५ अ नुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिक तेव्हाच राज्याचा हिस्सा मानला जाईल जेव्हा त्याचा जन्म त्या राज्यातच होईल. इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकत नाही किंवा तेथील नागरिक बनू शकत नाही.
श्रीनगर - काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींमुळे काश्मीरबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचा विशेष दर्जा वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय एकजूट दिसून आली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बिघडेल, असे पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन फारुख अब्दुल्ला यांनी या बैठकीनंतर केले.
नँशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांच्यासह शाह फैसल आणि सज्जाद लोन उपस्थित होते. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की,"काश्मीरमध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. काश्मीरसाठी हा सर्वात वाईट काळ आहे. यापूर्वी अमरनाथ यात्रा कधीच थांबवली गेली नाही. काश्मीर खोऱ्यात तणाव वाढेल, असे कुठलेही पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन मी करू इच्छितो."
"काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. जम्मू काश्मीरमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती झालेली नाही. खोऱ्यातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की धीर धरा, खोऱ्यातील शांततेचा भंग होईल, असे कुठलेही पाऊल उचलू नका", असेही ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
फ्लोरिडा : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने फ्लोरिडातल्या पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा चार विकेट्सनी पराभव करून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी अवघं 96 धावांचं लक्ष्य होतं. परंतु विंडीजच्या शेल्डन कॉट्रेल, सुनील नारायण आणि किमो पॉलने टीम इंडियाचे प्रत्येकी दोन शिलेदार बाद करुन भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करायला लावला. रोहित शर्माने 24, विराट कोहलीने 19, मनीष पांडेने 19 धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून विंडीजला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नवोदित गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर विंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलला माघारी धाडल. तर सामन्यातील दुसरे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वर कुमारनेदेखील विंडीजचा दुसरा सलामीवर एव्हिन लुईसला माघारी धाडलं.
टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणानं वेस्ट इंडिजला पहिल्या टी20 सामन्यात नऊ बाद 95 धावांत रोखलं. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला 96 धावांचं माफक आव्हान मिळालं होतं. विंडीजकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 49 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. तर निकोलस पूरनने 20 धावांचं योगदान दिलं.
महत्वाच्या घटना
१८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
१९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.
१९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.
१९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
१९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
१९९४: इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
१९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
१९९७: फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
जन्म
१८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९२४)
१८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९)
१९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)
१९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म.
१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)
१९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचा जन्म.
१९७२: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज अकिब जावेद यांचा जन्म.
१९७४: भारतीय अभिनेत्री काजोल यांचा जन्म.
१९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा जन्म.
मृत्यू
१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)
१९८४: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)
१९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)
१९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)
१९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन यांचे निधन.
२०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज यांचे निधन.
२००१: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१४)
२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.