मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी इस्रायलने लाल पायघड्या अंथरल्या असून, मोदींचे पाय तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाला लागण्यापूर्वीच, मध्य-पूर्वेतील या देशाने या भेटीला ‘यशस्वी व ऐतिहासिक’ असे संबोधले आहे.
यातील यशाचा भाग तीन दिवसांचा दौरा संपल्यानंतर स्पष्ट होईल, परंतु हा दौरा ऐतिहासिक आहे, हे मात्र नक्की.
७० वर्षांपूर्वी साधारणत: एकाच वेळी नवराष्ट्र म्हणून उदयास आलेल्या या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन २५ वर्षे होत आहेत.
भारताकडून मोदी व इस्रायलकडून बेंजामिन नेत्यानाहू या दोन्ही पंतप्रधानांनी समाजमाध्यमांतून या भावना व्यक्त केल्या आणि या भेटीने द्विपक्षीय संबंध अधिक बळकट आणि बहुआयामी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखाअध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली.
आचार्य अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रवीण दवणे यांची व स्वागताध्यक्षपदी दशरथ ऊर्फ बंडूकाका विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच या वर्षी अत्रे यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त २० वे संमेलन १३ व १४ ऑगस्ट रोजी सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा असून सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केले आहे.
०६ जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे.
वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिले असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे पहिल्या १५ महाविद्यालयांमध्ये राज्यातील केवळ तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.
देशातील एका अग्रणी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने १२ वे स्थान पटकाविले आहे.
तसेच या नियतकालिकेतर्फे दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर होते. यंदा म्हणजे २०१६-१७ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
यंदाच्या सर्वेक्षणानुसार मणिपालच्या 'मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस' या खासगी महाविद्यालयाने ५६३ गुणांच्या आधारे देशातून पहिले स्थान पटकावून, यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाने १३ स्थान पटकाविले होते. यंदा १२ वे स्थान मिळविले.
सर्वेक्षणातील १५ महाविद्यालयांच्या यादीमध्ये मुंबईतील दोन महाविद्यालयानंतर केवळ औरंगाबादतील महाविद्यालयाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी हे ०६ जुलै रोजी निवृत्त होत असल्याने निवडणूक आयुक्त ए.के. ज्योती हे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतील.
पण डॉ. झैदी यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या आयुक्तपदावर कोणाची निवड होणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कारण येणाऱ्या नव्या आयुक्ताकडेच २०१९ च्या लोकसभेची धुरा असेल! या शर्यतीमध्ये मावळते केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षि यांचे नाव 'अग्रेसर' आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरला.
पहिला सामना जरी पावसामुळे रद्द झाला असला, तरी चौथ्या सामन्याकडे पाहता भारत या मालिकेत निर्भेळ यश मिळवेल, अशीच शक्यता होती. पण या सामन्यातील पराभवाने सर्व गणित बदलले.
चौथ्या सामन्यात मोठे लक्ष्य नव्हते. १९० धावा बनवायचे होते तरी ११ धावांनी भारतीय अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांनी जी काही फलंदाजी केली, ते प्रश्न निर्माण करणारे होते.
खेळपट्टी संथ होती, यामुळे फटके मारणे सहज शक्य नव्हते. तसेच अशा खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे कठीण होते, अशी सर्व कारणे मान्य आहेत.
जन्म, वाढदिवस
गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान : ०४ जुलै १८९८
जॉर्ज एव्हरेस्ट, वेल्सचा सर्वेक्षक : ०४ जुलै १७९०
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ : ०४ जुलै १९०२
वीर दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचे निधन : ०४ जुलै १७२९
ठळक घटना
पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी यशस्वी झाली : ०४ जुलै १९९१
पाथ फ़ाइंडर हे यान मंगळावर उतरले : ०४ जुलै १९९७
मराठा प्रकाशक परिषदेची स्थापना झाली : ०४ जुलै १९७७
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.