श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने रविवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलिंगाने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला.
२०११मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा मलिंगा जुलै महिन्यात कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने पहिल्याच षटकात कॉलिन मुन्रोचा त्रिफळा उडवून आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मग कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाची, देशातल्या जनतेची क्षमा मागितली आहे. ही गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित अचंबा वाटला असेल मात्र ही गोष्ट घडली आहे. मात्र दिल्लीमधील एका कार्यक्रमात ‘मिच्छामी दुक्कडम’ चा जैन धर्मातील परंपरेचा उल्लेख करत त्यांनी देशाची क्षमा मागितली आहे.
मिच्छमी दुक्कडम याचा अर्थ क्षमायाचना! जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व सुरु आहे. या पर्युषण काळात क्षमायाचना मागण्याची प्रथा आहे आणि त्याचे महत्त्वही आहे याच प्रथेला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेची, देशाची क्षमा मागितली आहे.
‘मिच्छामी दुक्कडम’ याच शब्दाचा प्रयोग आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केला. त्याआधी पंतप्रधानांनी सगळ्या देशाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर ते म्हटले की “जैन धर्मीयांचे पर्युषण सुरु आहे. जैन परंपरेतला ‘मिच्छामी दुक्कडम हा एक उत्तम संस्कार आहे. मनातून, वचनातून, कर्मातून जर कुणाला दुःखी केलं असेल, वेदना दिल्या असतील तर मिच्छामी दुक्कडम अर्थात क्षमा याचना मागितली जाते.
आज मी देखील गुजरातच्या जनतेची, देशाच्या जनतेची आणि जगाचीही क्षमायाचना करतो” असे त्यांनी सांगितले. हे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली येथील गर्वी गुजरात भवन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी जैन धर्मातील परंपरेनुसार देशाची क्षमा मागितली.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. मग आगमनाला काही दिवस उरले की घराघरांत बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होते. देशभरात अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम असते.
मात्र अनेक घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.
प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची. पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जसजशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला.
अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे.
कुठल्याही करदात्याने आधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास त्याला आपोआप कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन क्रमांक देण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने आता दिली आहे. ती १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, त्यामुळे पॅन क्रमांकासाठी आता वेगळी खटपट करावी लागणार नाही.
पॅन व आधार या दोन माहिती संचांची जोडणी केली असल्याने जेव्हा एखादी व्यक्ती आधार क्रमांक टाकून विवरण पत्र भरेल तेव्हा आपोआप आधारमधील माहिती घेऊन त्या व्यक्तीचा पॅन क्रमांक तयार होईल. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ३० ऑगस्ट रोजी जारी केली आहे.
पॅन क्रमांकासाठी कुठलीही वेगळी कागदपत्रे करदात्याला सादर करावी लागणार नाहीत. हा नियम १ सप्टेंबरपासून अमलात आला आहे. कर विभागाने आधार म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती घेतली असून त्याआधारे पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी.सी मोदी यांनी सांगितले की, आधार क्रमांक देऊन कर विवरण पत्रे भरणाऱ्या सर्वच व्यक्तींना त्यांच्याकडे पॅन नसल्यास तो आपोआप मिळणार आहे. कर निर्धारण अधिकारी हे स्वत:हून पॅन क्रमांक जारी करू शकतात असा कायदा आहे, त्यामुळे त्याचा वापर करून ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही पण ते विवरणपत्र आधार क्रमांकाने भरू इच्छितात त्यांना आपोआप पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.
‘चांद्रयान-२’ मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. यानातील ‘विक्रम’ हे लँडर (चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाणारा भाग) ऑर्बिटरपासून सोमवारी यशस्वीपणे विलग झाले. यामुळे आता सर्वाचे लक्ष ७ सप्टेंबरकडे लागले आहे.
सुमारे एक तासाच्या उत्कंठावर्धक प्रयत्नानंतर ‘विक्रम’ हे लँडर सोमवारी दुपारी सव्वा वाजता मूळ यान म्हणजे ऑर्बिटरपासून वेगळे झाले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी दिली. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी दोन प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी आधी त्याचा वेग कमी करत न्यावा लागेल, नंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडरला भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला रात्री १.५५ वाजता उतरणार आहे. ते उतरवण्याआधीचा पंधरा मिनिटांचा थरार महत्त्वाचा आहे. त्यातून लँडर अलगदपणे चांद्रभूमीवर उतरले तर ती भारताची मोठी कामगिरी असेल. त्यानंतर त्यातून प्रज्ञान हे रोव्हर बाहेर येईल, त्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल.
रोव्हर बाहेर आल्यानंतर त्यावरील वैज्ञानिक उपकरणे कार्यान्वित होणार असून, ती चंद्रावरील माती आणि अन्य बाबींचे परीक्षण करतील. लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास अशी मोहीम साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
महत्वाच्या घटना
३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
१७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
१९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
१९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
१९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
जन्म
१८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)
१८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)
१९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.
१९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)
१९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)
१९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.
१९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)
१९३१: नाटककार श्याम फडके यांचा जन्म.
१९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.
१९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.
१९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)
१९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.
१९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.
१९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.
१९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.
मृत्यू
१६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.
१९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.
१९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.
१९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)
१९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)
१९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.
२०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.