परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रकल्पात तीन अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाले आहेत, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे.
स्टीफन हॉकिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काम करणाऱ्या विशाल गज्जर यांनी दी टेलीग्राफला सांगितले की, हे संदेश नेमके कोठून आले आहेत याची आम्हाला कल्पना नाही.
संदेशांचे स्रोत पाहिले तर त्यापेक्षा जास्त शक्यता किंवा सिद्धांत या परग्रहावरील जीवसृष्टीबाबत आहेत. आतापर्यंत तरी उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक आहेत.
ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व रशियाचे अब्जाधीश युरी मिलनर यांनी सुरू केला असून त्यात विश्वाचे सत्य जाणून घेणे व प्रगत जीवसृष्टीचा शोध घेणे हे उद्देश आहेत.
आताचे संदेश जिथून आले आहेत ते रेडिओ लहरींच्या स्फोटांचे असून आमची यंत्रणा ठोसपणे काम करीत आहे एवढाच आताच्या संशोधनाचा अर्थ असून संदेश सौरमाला २ अब्ज वर्षांची असताना संबंधित दीर्घिकेतून सुटले व त्यावेळी पृथ्वीवर जीवन नुकतेच आकार घेत होते.
सुरुवातीला हा सुपरनोव्हाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले होते पण २०१५ व २०१६ मध्ये पुन्हा ते संदेश आल्याने त्याचा स्रोत अजूनही टिकून आहे हे स्पष्ट होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.
भारताने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली असून, वन-डे मालिकादेखील ५-० ने जिंकण्याचा संघाला विश्वास वाटतो, नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध ५ सामन्यांची मालिका गमावली होती.
आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ रविवारी श्रीलंकेविरुद्ध पाचवा आणि अखेरचा वन-डे सामना खेळणार असून, विजयासह यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देण्याचा टीम इंडियाचा इरादा असेल.
भारताकडून मागच्या वन-डे मालिकेत पराभूत झाल्यापासून लंकेने झिम्बाब्वेला दोनदा हरविले. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडला २०१० मध्ये आणि इंग्लंडला २०१२ मध्ये ५-० ने पराभूत केले होते.
त्यानंतर दुसऱ्यांदा क्लीन स्वीप होण्याचे संकट यजमानांवर घोंगावत आहे असून लंकेच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असल्याने, या संघाने २०१९ च्या विश्वषकात थेट पात्रतेची संधीदेखील गमावली आहे.
भारताविरुद्ध दोनदा ५-० ने मालिका गमावणारा इंग्लंड एकमेव संघ आहे. भारताने उद्या लंकेला नमविल्यास या पंक्तीत श्रीलंकेचादेखील समावेश होईल, लंकेतील उकाडा आणि उष्णता यांवर मात करून भारताने पाठोपाठ मिळविलेले विजय संस्मरणीय ठरले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ८३ वे वर्ष असून मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते लालाबागच्या राजाच्या दर्शनाचे.
लालबागच्या राजाची भव्य मूर्ती डोळ्यात साठवण्याची त्याच्या चरणावर डोक ठेवण्याची भक्तांची इच्छा असते, राजावर श्रद्धा असणारे त्याचे भक्त मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतात.
१९३४ साली लालबागमधल्या स्थानिक व्यापा-यांच्या बाजारपेठेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता, लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हटले जाते. कारण लालबागच्या राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे.
आज लालबागमध्येच नाही तर, देश-विदेशात लालबागच्या राजाचे लाखो भक्त असून, राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो.
लोकमत प्रस्तुत या सहाभागांच्या वेबसीरीजमध्ये लालबागच्या राजाचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो, स्मृतिचिन्हे आणि कधीही न ऐकलेले किस्से, अनुभव तुम्हाला पाहता येतील.
२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान रोज सकाळी ९ वाजता आणि ४ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता वेब सीरीजचा एक एपिसोड प्रसारीत होईल.
नव्या चेहऱ्यांमध्ये एक आयएएस, एक आयपीएस आणि एका आयएफएस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
आज सकाळी साडे दहा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे, तर ३ राज्यमंत्र्यांचं प्रमोशन नक्की झालं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, जेडीयूच्या वशिष्ठ नारायण सिंह आणि आरसीपी सिंह यांचं स्पष्टीकरण
एकूण १३ जण शपथ घेणार, जेडीयू, शिवसेना आणि AIADMK च्या कुणालाही संधी नाही
९ नवे चेहरे, तर ४ राज्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेकडून कुणीही उपस्थित राहणार नाही
एकूण १३ जण शपथ घेतील, त्यामध्ये ९ नव्या चेहऱ्यांचा समावेश असेल, तर ४ राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळणार आहे, जेडीयू, शिवसेना आणि एआयएडीएमकेला संधी मिळणार नाही.
रिझ्रर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या निर्णयावर टीका करताना नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे ९९ टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे.
रघुराम राजन यांनी आपल्या पुढील आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात या संदर्भातील आपले मत मांडले असून त्यात ते म्हणतात, मी नोटाबंदीच्या दीर्घकालीन फायद्यांवर पुढील काळातील नुकसान भारी पडण्याची शक्यता असल्याचा इशारा सरकारला दिला होता.
" काळा पैसा व्यवस्थेत आणण्यासाठी सरकारला अन्य उपाय सूचवले होते, असेही त्यांनी सांगितले, फेब्रुवारी २०१६ मध्ये आपण सरकारला तोंडी सल्ला दिला होता.
त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सरकारला एक टाचण दिले होते ज्याता यासंदर्भात उचलण्यात येणारी आवश्यक पावले आणि त्याचा कार्यकाळ या संदर्भातील माहिती दिली होती.
०८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता, त्यावेळी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती.
जन्म /वाढदिवस
कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे, शाहीर, लोकनाट्यकार : ०३ सप्टेंबर १९२३
विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता : ०३ सप्टेंबर १९७६
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
लक्ष्मणराव पर्वतकर तथा खाप्रुमामा, संगीतक्षेत्रातील कलावंत, प्रसिद्ध तबला वादक : ०३ सप्टेंबर १९५३
अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक : ०३ सप्टेंबर १९६७
ठळक घटना
-
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.