‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार असून वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे.
जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील १०८ व्या नोबेल पुरस्काराची कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून सोमवारी घोषणा करण्यात आली.
या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.
सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो, यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरुन गेल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचा दाखला दिला आहे.
कॅनेडातील तिसऱ्या क्रमांकाच्या ‘न्यू डेमोक्रेटिक पार्टी’ने २०१९ मधील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कॅनडामध्ये दरवर्षी अनेक भारतीय नोकरीच्या निमित्ताने जाऊन तिथेच स्थाईक होतात, पण आता यातील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला कॅनेडाच्या पंतप्रधान पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
कॅनडामध्ये २०१९ मध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी लिबरल पार्टीच्या जस्टिन ट्रूडो यांच्याविरोधात ‘न्यू डेमोक्रेटिक पक्षा’ने भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चिती करण्यासाठी पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत जगमीत सिंह यांना ५४ टक्के मतं मिळाली.
त्यांना पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर, पक्षाचं नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय ठरले आहेत.
पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, जगमीत यांनी ट्वीट करुन सर्वांचे आभार मानले असून पंतप्रधान पदासाठीची स्पर्धा आजपासून सुरु झाली असल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
देशवासीयांच्या सहभागाशिवाय स्वच्छता अभियान पूर्णत्वास जाऊच शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले ‘स्वच्छता अभियानात देशवासीयांचे योगदान महत्त्वाचे आहे.
अन्यथा हजार महात्मा गांधी आणि लाख नरेंद्र मोदी आले, तरी स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही,’ असे मोदींनी म्हटले असून स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारे एकत्र आली, तरीही स्वच्छ भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही.
मात्र सव्वाशे कोटी देशवासी एकत्र आल्यास बघता बघता हे स्वप्न पूर्ण होईल,’ असे मोदींनी म्हटले. यावेळी मोदींनी विरोधकांनाही टोला लगावला ‘मोदींवर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत.
मात्र समाजाला जागृत करण्याच्या कामात राजकारण नको,’ असे ते म्हणाले समाजात बदल घडवणाऱ्या मुद्यांची थट्टा केली जाऊ, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
सोशल मिडीयाच्या नकारात्मक परिणामांबद्दल फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली असून फेसबुकचा वापर समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडण्याचे काम होत असल्याने आपल्याला क्षमा करण्यात यावी, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकेरबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त कोणत्याही घटनेचा उल्लेख केला नाही.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठीच फेसबुकचा वापर करण्यात आला असून यासाठी रशियातील नागरिकांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी फेसबुकचा उपयोग केल्याचे बोलले जात आहे.
रशियन नागरिकांनी फेसबुकचा वापर गेल्या दशकभरापासून असत्य पसरवण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत असून त्याच संदर्भात झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवरून ही दिलगिरी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.
रशियाच्या ४७० बनावट कंपन्यांनी जून २०१५ ते मे २०१७ दरम्यान फेसबुकवर केलेल्या जाहिराती अमेरिकेच्या संसदेला सादर केल्या जातील, असे फेसबुकने अलिकडेच म्हटले होते.
या जाहिरातींमधून राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी थेट प्रचार करण्यात आला नव्हता मात्र गे हक्क, वंश, शरणार्थी आणि शस्त्र बाळगण्याच्या हक्कासारख्या महत्वाच्या विषयांचाच प्रचार केला गेला होता.
उत्तर प्रदेश सरकारने ताजमहाल या वास्तूला आपल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवलं असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेली ताजमहाल ही वास्तू भारताचा ऐतिहासिक वारसा आहे.
पण आता योगी आदित्यनाथ सरकारने ऐतिहासिक वारसा असलेल्या या वास्तूला आपल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवलं असून योगी सरकारने उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांची नवी यादी जाहीर केली आहे.
यामध्ये ताजमहालचा समावेश करण्यात आलेला नसून रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल ही वास्तू आपली सांस्कृतिक वारसा असल्याचं सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
गंगा आरतीच्या भव्य दृश्याबरोबरच दुसऱ्या पानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पर्यटनमंत्री बहुगुणा यांचे फोटोही छापण्यात आले आहेत.
त्यानंतर पर्यटन विकास योजनांबाबत माहितीही यात देण्यात आली असून या पुस्तिकेतील पहिल्या पानाबरोबरच सहावे आणि सातवे पानही गंगा आरतीला समर्पित करण्यात आली आहेत.
योगी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) ताजमहाल या वास्तूला आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले नव्हते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानण्यास नकार दिला होता.
जागतिक दिवस
जर्मन एकता दिन - जर्मनी
जन्म /वाढदिवस
हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म : ०३ ऑक्टोबर १९०३
चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म : ०३ ऑक्टोबर १९४९
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन : ०३ ऑक्टोबर २००७
सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन : ०३ ऑक्टोबर २०१२
ठळक घटना
इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले : ०३ ऑक्टोबर १९३२
युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले : ०३ ऑक्टोबर १९५२
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.