नवी दिल्ली - पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारीया यांची पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा केली. अजय बिसारीया हे 1987 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते आता गौतम बंबावले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबावले यांची चीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
अजय बिसारीया लवकरच कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा आहे असं मंत्रालयाने एका अधिकृत विधानामध्ये म्हटलं.
कोण आहेत अजय बिसारीया - अजय बिसारिया 1988-91 मध्ये मॉस्को दूतावासमध्ये तैनात होते. त्यांनी 1999-2004 दरम्यान पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून देखील काम केलं आहे. जानेवारी, 2015 पासून ते पोलंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : रिअल इस्टेटमध्ये आलेल्या मंदीमुळे प्रचंड माघारलेल्या पोलाद उद्योगाला आता आॅटो आणि इन्फ्रा अर्थात पायाभृूत सुविधांच्या उभारणीने नवी रसद मिळाली आहे.
मागील वर्षभरात सात टक्क्यांची मोठी वाढ पोलादनिर्मितीत झाली आहे. केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा योजना पोलादनिर्मितीसाठी देवदूत ठरल्या आहेत.
पोलादाची सर्वाधिक मागणी रिअल इस्टेट व इन्फ्रा व त्यानंतर आॅटो क्षेत्रांकडून असते. रिअल इस्टेट क्षेत्र गेली तीन-चार वर्षे संकटात आहे. मागणीअभावी बांधकामे रेंगाळली आहेत.
यामुळे पोलाद उद्योगाच्या मागणीत व परिणामी उत्पादनात घट होऊन ते ९ कोटी (९० दशलक्ष) टनावर पोहोचले. कमी मागणी, त्यामुळे उत्पादनात घट यामुळे पोलाद कंपन्यांचा एनपीए ३ लाख
कोटी रुपयांच्या घरात गेला.(src:lokmat)
बिजिंग : भारतात राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यावरुन वाद सुरु असतानाच, तिकडे चीन मात्र राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याच्या विचारात आहे.
चीनच्या संसदेत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाच्या अवमानकर्त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
‘सिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल पिपल्स काँग्रेस (पीपीसी) च्या स्थायी समितीच्या द्वैमासिक सत्रात याबाबतचा एक प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये चिनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वाजाचा अवामानकरर्त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस आहे.
वास्तविक, सद्या राष्ट्रगीताचा अवमान केल्यास 15 दिवसांचा तुरुंगवास द्यावा. तसेच त्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले चालवावेत, अशी तरतूद करण्यात आली आहे.(src:abp)
मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याबद्दल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले.
यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व मोबाईल वापरकर्त्यांनी ई-केवायसी पडताळणी अंतर्गत त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करावा, असे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.
यासोबतच नवे बँक खाते उघडण्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य असेल.
मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड जोडण्याबद्दल केंद्र सरकारने ११३ पानांचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. वकील जोहेब हुसेन यांनी यावेळी सरकारची बाजू मांडली.(src:loksatta)
महत्वाच्या घटना
१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.
१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.
१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.
१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
जन्म
१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
१९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.
१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)
मृत्यू
१८१९: शाहीर अनंत फांदी यांचे निधन.१९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५)
१९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
१९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
१९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२०)
१९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
२०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.
२०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.