नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यांवर येत आहेत. आजपासून ४ मार्चपर्यंत ते भारतामध्ये असतील. आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि चीनचे वाढते दबावाचे राजकारण लक्षात घेता या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
या दौऱ्यामध्ये त्रान दाई क्वांग भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील तसेच ते भारतातील उद्योजकांचीही भेट घेतील.
क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही असतील. राष्ट्रपती क्वांग आपल्या भारतभेटीमध्ये बिहारमधील बोधगया या पवित्र तीर्थक्षेत्रालाही भेट देतील. चीनच्या वाढत्या कारवायांना ब्रुनेई, तैवान, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हीएतनामनेही विरोध केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६ साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते. २०१७ साली या दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली.
पुणे : भारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे. ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि महाराष्ट्रीयन साहित्यिक ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा त्यांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक यांची निवड झाली.
यू. आर. अनंतमूर्ती यांच्या अध्यक्षीय पदाच्या निवडीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी साहित्य अकादमीच्या इतिहासात दुसºयांदा ही निवडणूक झाली. अकादमीच्या जनरल कौन्सिलच्या ९९ सदस्यांनी पाच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली. या निवडणुकीत चंद्रशेखर कंबार यांनी ५६ मतांनी आपले स्थान बळकट केले, तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना २९ मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ ४ मते मिळाली.
विनायक कृष्णा गोकाक (१९८३) आणि यू. आर. अनंतमूर्ती (१९९३) यांच्यानंतर तिसºया कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी, लेखक, दिग्दर्शक असे प्रा. चंद्रशेखर कंबार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. अकादमीच्या नियामक मंडळाचे गेल्या दहा वर्षांपासून ते सदस्य आहेत. २०१३-२०१८ कालावधीत त्यांनी अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले. ‘पद्मश्री’ सन्मानाचे ते मानकरी ठरले असून, कबीर सन्मान, कालिदास सन्मानाचेही ते मानकरी ठरले आहेत.
मुंबई - हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे. मात्र ईशान्य भारतामध्ये आजवर म्हणावे तसे यश कधीही मिळाले नव्हते.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ओडिशा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात भाजपाची पाळेमुळे रोवण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही दिसून येतात.
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता आल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सप्रमाणे नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स २४ मे २०१६ रोजी स्थापन करण्यात आली. या आघाडीमध्ये नागा पिपल्स फ्रंट, सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, पीपल्स पार्टी ऑफ अरुणचल, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स पार्टी या भाजपाचे सहकारी पक्ष आहेत.
आसाममध्ये एकेकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असणारे हेमंत बिस्वा शर्मा भाजपामध्ये आल्यानंतर त्यांच्यामदतीने भाजपा आसाममध्ये सत्तेत येण्यास यशस्वी झाला. त्यांच्याकडेच या आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आसामच्या निवडणुकीनंतर ईशान्य भारतामध्ये भाजपाच्या बाजूने जनमत तयार व्हावे यासाठी राम माधव आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम हे या प्रदेशात अक्षरशः तळ ठोकून राहिले. या सर्व प्रयत्नांना यश आले तर भाजपासाठी हा आनंदाचा सर्वात मोठा क्षक्ष असेल.
पुणे : भारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे.
ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’ कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले तर उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले.
यू. आर अनंतमूर्ती यांच्या अध्यक्षीय पदाच्या निवडीनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी साहित्य अकादमीच्या इतिहासात दुस-यांदा ही निवडणूक झाली. अकादमीच्या जनरल कौन्सिलच्या 99 सदस्यांनी पाच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली. या निवडणूकीत चंद्रशेखर कंबार यांनी 56 मतांनी आपले स्थान बळकट केले तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना 29 मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ 4 च मते पडली.
विनायक कृष्णा गोकाक (1983) आणि यू.आर अनंतमूर्ती (1993) यांच्यानंतर तिस-या कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी, लेखक, दिग्दर्शक असे प्रा. चंद्रशेखर कंबार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. अकादमीच्या नियामक मंडळाचे गेल्या दहा वर्षांपासून सदस्य आहेत.
2013-2018 कालावधीत त्यांनी अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले. ’पद्मश्री’ सारख्या सन्मानाचे ते मानकरी ठरले असून, कबीर सन्मान,कालिदास सन्मानाचे ते मानकरी ठरले आहेत.
आंध्र प्रदेश : महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केला आहे. ते आंध्र प्रदेशातील रेनिगुंठा येथे बोलत होते.
आंध्र प्रदेशातील 'फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग'चे उद्घाटन सत्यपाल सिंग यांनी केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हे सेंटर उभारले आहे. यावेळी भाषणात ते बोलत होते.
सत्यपाल सिंग नेमकं काय म्हणाले - पीएचडीबद्दल संबंधित व्यक्तीला संपूर्ण माहिती असेल, असे सांगता येत नाही. बोगस पदव्यांच तर सुळसुळाट आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची पीएचडी अशीच बोगस आहे", असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी केला.
सत्यपाल सिंग पुढे म्हणाले, "त्या मंत्र्याने ज्या विद्यापीठातून पीएचडी मिळवली, तिथे मी चौकशी केली. संबंधित विभागप्रमुखांना फोन करुन, या विषयात पीएचडीस मान्यता कशी दिली, हे विचारले. तर ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवरुन संबंधित विषयाला मान्यता देण्यास, तसेच पदवी देण्यास दबाव असल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले."
सत्यपाल सिंग यांच्या भाषणानंतर पत्रकारांनी त्यांना ‘त्या’ मंत्र्याचं नाव विचारलं. त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र ते म्हणाले, “माझं नाव ‘सत्य’पाल आहे, त्यामुळे मी जे बोलतो ते खरंच असतं.”
महत्वाच्या घटना
१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
जन्म
१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे१९०४)
१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)
१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)
१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.
मृत्यू
१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)
१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)
१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.