मुंबई - माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सलिल एस पारेख यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते येत्या 2 जानेवारीपासून पदभार संभाळतील.
इन्फोसिसने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाचवर्षांसाठी सलिल पारेख यांची सीईओ आणि एमडी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पारेख सध्या फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीच्या बोर्डावर आहेत. कॉम्प्युटर सायन्य या विषयात मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग तसेच कॉर्नेल विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय आयआयटी मुंबईमधून त्यांनी एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.
नंदन नीलकेणी नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदावर कायम राहतील. हंगामी सीईओ प्रविण राव यांच्या पदामध्ये बदल करण्यात आला आहे. पारेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रविण राव कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असतील.(source :lokmat)
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ४ डिसेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. दुसरा अर्ज दाखल झाला नाही तर, पक्षाचे निवडणूक प्राधिकरण ५ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करू शकेल.
राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरा अर्ज दाखल होण्याची शक्यता जवळपास नाही. त्यामुळे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी दुपारनंतरच चित्र स्पष्ट होईल.
अर्ज दाखल केल्याच्या दुसºयाच दिवशी राहुल गांधी गुजरातकडे रवाना होतील. कारण, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
प्रचाराची मुदत संपेपर्यंत ते गुुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. ते ५ ते ७ डिसेंबरपर्यंत ते पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाºया मतदारसंघात सभा, रोड शोद्वारे प्रचार करणार आहेत.(source :lokmat)
मुंबई- आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे.
बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे.
काही ठिकाणी आधारा कार्ड लिंक करण्याची तारीख 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे.
आधारकार्ड पॅनकार्डशी करा लिंक (शेवटची तारीख 31 डिसेंबर) : आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आधार-पॅन लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत आधार-पॅनकार्ड लिंक करा. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.(source :lokmat)
भुवनेश्वर : सामनावीर सॅम्युअल वॉर्डच्या दोन गोलमुळे इंग्लंडने शनिवारी विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीतील सामन्यात ब गटात भारतावर ३-२ गोलने विजय नोंदविला. काल पहिल्या सामन्यात जर्मनीकडून ०-२ असा पराभव पत्करणा-या इंग्लिश खेळाडूंनी भारतावर वर्चस्व गाजविले. इंग्लंडचा हा पहिला विजय होता. भारताने काल आॅस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडविरुद्ध विजयाची आशा होती.
तथापि, सामन्यात अनेक चुका करीत गोल नोंदविण्याची संधी भारतीय खेळाडूंच्या तुलनेत इंग्लंडने सरस खेळ केला. २५ व्या मिनिटाला डेव्हिड गुडफिल्ड याने गोल नोंदवित इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. सूरज करकेराच्या पायाला लागून मागे आलेला चेंडू डेव्हिडने अलगद गोलजाळीत ढकलला.
४३ व्या मिनिटाला भारतीय कर्णधार हरमनप्रितसिंग याने केलेल्या चुकीचा लाभ घेत इंग्लंडने आघाडी दुप्पट केली होती. डीच्या आत उसळी घेणाºया चेंडूवर नियंत्रण मिळविण्यात हरमनप्रित अपयशी ठरताच वॉर्डने त्यावर गोल केला. दोन मिनिटांनंतर आकाशदीपने भारतासाठी पहिला गोल केला.
५० व्या मिनिटाला रुपिंदरपालसिंग याने गोल नोंदवित सामन्यात २-२ अशी बरोबरी साधून दिली होती. तथापि, ५६ व्या मिनिटाला सॅम्युअल वॉर्ड याने स्वत:चा दुसरा गोल नोंदविताच इंग्लंडच्या गोटात आनंद साजरा झाला.
तत्पूर्वी बेल्जियम आणि स्पेन संघाने अ गटाच्या सामन्यात सनसनाटी विजय नोंदविले. बेल्जियमने रिओ आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला ३-२ ने आणि स्पेनने विश्वचषकाचा रौप्यविजेता नेदरलँडचा ३-२ ने पराभव केला.(source :lokmat)
भारतासाठी कमी वजनाच्या २०० कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मिती चार टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले. भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे उत्पादन केले जाणार असून त्यात कामोव २२६ टी प्रकारची ६० हेलिकॉप्टर्स भारताला तयार स्वरूपात दिली जातील, याशिवाय दीडशे हेलिकॉप्टर्स भारतात तयार केली जाणार असून त्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा करार २०१५ मध्ये करण्यात आला होता.
आंतर सरकारी कराराच्या अनुसार या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन होणार आहे. यात रशियाकडून तंत्रज्ञान हस्तांतराचे आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती कामोव २२६ टी प्रकल्पाचे संचालक दिमित्री श्वेटस यांनी सांगितले. एकूण चार टप्प्यांत हेलिकॉप्टर्सचे उत्पादन केले जाणार असून त्यांचे भाग व तंत्रज्ञान यांच्या हस्तांतराचा एक टप्पा यात आहे.
पहिल्या टप्प्यात जुळणी केलेली हेलिकॉप्टर्स रशिया देणार आहे. नंतर तंत्रज्ञान हस्तांतर व तांत्रिक मदत या टप्प्यांचा समावेश आहे. यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व दुरुस्ती केंद्र यांचीही पूर्तता केली जाईल. रशियन व भारतीय सुटय़ा भागांचे प्रमाण किती राहील असे विचारले असता त्यांनी सांगितले की, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतराचे आश्वासन दिले आहे त्याचे पालन केले जाईल. यात देशातील कायद्यानुसार काही अटींचे पालन करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. (source :loksatta)
जागतिक दिवस
जागतिक अपंग दिन
महत्वाच्या घटना
१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.
१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.
जन्म
१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११)
१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)
१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)
१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)
१८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)
१८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९७५)
१९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.
मृत्य
१५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)
१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)
१८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)
१९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे१९०८)
२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.