मुंबई : भारतीय खेळाडू खेळासह, देशाप्रती त्यांच्या प्रेमामुळे ओळखले जातात. खेळाडू विविध पद्धतीने आपलं प्रेम दर्शवतात. क्रिकेटर्सबाबत बोलायचं झालं तर ते आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावतात.
हा ट्रेण्ड सचिन तेंडुलकरने सुरु केला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा ट्रेण्ड सुरु आहे. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली हे सगळेच आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावून खेळले आहेत. महेंद्रसिंह धोनीही तिरंगा लावून खेळत असे, पण अचानक त्याने तिरंगा लावणं बंद केलं.
अखेर धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद का केलं, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला आणि त्याचं उत्तरही मिळालं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कोरा'च्या माहितीनुसार, विकेटकीपिंगमुळे धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं.
खरंतर, विकेटकीपिंग करताना धोनीला सामन्यादरम्यान अधून मधून हेल्मेट घालणं आणि काढून जमिनीवर ठेवावं लागत असे. अशावेळी जर हेल्मेटवर तिरंगा असेल तर ही अपमानजनक बाब ठरेल. त्यामुळे धोनीने तिरंगा लावणंच सोडून दिलं.
जेव्हा धोनी हेल्मेटवर तिरंगा लावत असे तेव्हा सोशल मीडियावर एका व्यक्तीने याबाबत तक्रार केली होती. खेळाडू ज्या मैदानावर वारंवार थुंकतात तिथेच तिरंगा असलेलं हेल्मेट काढून ठेवतात, जे चुकीचं आहे. यानंतर धोनीने कथितरित्या हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं होतं. 2011 पर्यंत धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा लावलेला होता.
टोरँटो : खलिस्तानी दहशतवादी जसपाल अटवाल याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांच्या भारत दौ-यातील भोजन समारंभास दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. विरोधक भारताच्या ऐक्याचा आणि खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडणार आहेत.
त्रुदेऊ यांचा भारत दौरा उधळून लावण्यासाठी भारतातील काही हितशत्रुंनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचा आरोप त्रुदेऊ यांच्या राष्ट्रीय सल्लागाराने केल्यानंतर मंगळवारी कॅनडाच्या संसदेत अटवाल प्रकरण उपस्थित झाले. मात्र हा आरोप निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे.
कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते अॅन्ड्रु शीर त्रुदेऊ म्हणाले की, खलिस्तानी फुटीरवाद्यांचा निषेध करणारा आणि भारताच्या ऐक्याला पाठिंबा देणारा प्रस्ताव विरोधी पक्ष संसदेत मांडणार आहे.
प्रस्तावात म्हटले आहे की, हे सभागृह कॅनेडियन शिख आणि भारतीय वंशाच्या कॅनेडियन्सनी आमच्या राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवतो. आम्ही अखंड भारताच्या बाजुने उभे आहोत.
त्रुदेऊ यांनी मला अटवाल माहीत नसल्याचे म्हटले आहे तर अटवाल याने कॅनडातील वृत्तपत्रांना मी त्रुदेऊ यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली: तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांच्या कार्यक्रमांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांनी चार हात दूर राहावे, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. सध्या भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध नाजूक वळणावर असल्याने तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांच्यापासून सरकारने सुरक्षित अंतर राखणे पसंत केल्याचे सरकारी आदेशावरून दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तिबेट वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने नेहमीच दलाई लामा यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळेच गेल्यावर्षी एका कार्यक्रमात दलाई लामा यांनी स्वत:ला भारत सरकारचे ‘लाँगेस्ट गेस्ट’ म्हटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अचानक आपल्या भूमिकेत इतका मोठा बदल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दलाई लामा यंदा वयाची साठी पूर्ण करत आहेत. या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी भारतातील अनेक नेते दलाई लामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत. परंतु यंदा परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून यासंदर्भात मंत्री व अधिकाऱ्यांनी 'विशेष काळजी' घेण्याचे देण्यात आले आहेत.
22 फेब्रुवारी रोजी विजय गोखले यांच्याकडून कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा यांना सूचना करण्यात आली होती. यामध्ये दलाई लामा यांच्या कार्यक्रमांना कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळावे, असे म्हटले होते. याबाबतची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. सध्या भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध नाजूक वळणावर आहेत. त्यामुळे हा मुद्दा संवेदनशील असल्याचे गोखले यांनी सूचना पत्रात म्हटले होते.
नवी दिल्ली : रेशन कार्डसचे संपूर्ण डिजिटायझेशन करून त्यांना लाभार्थीच्या आधारच्या क्रमांकाशी जोडल्यामुळे २.७५ कोटी बोगस आणि डुप्लिकेट रेशन कार्डस व्यवहारातून बाहेर काढता आली आहेत. या मोठ्या संख्येतील बोगस कार्डसवर अनुदानीत अन्नधान्य उचलले जायचे.
अन्न मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, रेशन कार्डच्या संपूर्ण डिजिटायझेशनची प्रक्रिया जानेवारी २०१३ मध्ये सुरू झाली असली तरी गेल्या चार वर्षांत तिला मोठी गती मिळाली. यामुळे १७,५०० कोटी रूपयांच्या अनुदानाचा गहू, तांदूळ आणि भरड धान्याची वार्षिक गळती आम्ही रोखली.
अर्थात नवे लाभार्थीही तयार झाल्यामुळे ही थेट बचत झाली, असे नाही परंतु आता आम्ही खºयाखुºया लाभार्थींना धान्य उपलब्ध करून देत आहोत, असे अन्न आणि ग्राहक कामकाज मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली (एनएफएसए) लोकांना २३.१९ कोटी रेशन कार्डस दिली गेली व सगळी रेशन कार्डस डिजिटाईज्ड झाली असून रेशन कार्डस आधार क्रमांकाला जोडण्याच्या कामाची प्रक्रिया सुमारे ८२ टक्के झाली आहे. आधार क्रमांकाशी रेशन कार्डस जोडण्याचे काम १०० टक्के झाले की आणखी बोगस रेशन कार्डस व्यवस्थेतून बाहेर येतील, असे पासवान म्हणाले.
नवी दिल्ली - जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची सेवा चालू होणार आहे. चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यासाठी व्होडाफोन आणि नोकिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत.
व्होडाफोनच्या लंडन मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. बर्लिन स्थित एका खासगी स्पेस कंपनीची चंद्रावर लँडर आणि दोन रोव्हर पाठवण्याची योजना आहे. या मिशनसाठी चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यात येणार आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येतील.
चंद्रावरच्या 4 जी नेटवर्कसाठी नोकिया स्पेस ग्रेड अल्ट्रा कॉम्पॅक्ट नेटवर्कची निर्मिती करणार आहे. हे अत्यंत हलक्या वजनाचे उपकरण असेल. एक किलोच्या साखरेच्या पिशवी इतके या उपकरणाचे वजन असेल अशी कंपनीने माहिती दिली आहे.
या नेटवर्कमुळे लँडर चंद्राच्या पुष्ठभागावरुन लाईव्ह व्हिडिओ प्रसारीत करेल जो पृथ्वीवरच्या प्रेक्षकांना पाहता येईल तसेच लँडर आणि रोव्हरमध्ये संवाद (कम्युनिकेश) प्रस्थापित होईल. यापूर्वी चंद्रावर संशोधन करताना कम्युनिकेशनसाठी अॅनालोग्यु रेडिओचा वापर व्हायचा. त्यामध्ये मोठया प्रमाणावर ऊर्जा खर्च व्हायची.
नवी दिल्ली - आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाल्या. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सरकारी इतमामात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या. सोमवारी आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. दुबई पोलिसांनी कसून चौकशी केली.
या सर्व घटना घडत असताना श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी बोनी कपूर यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं होते. यावेळी त्यांना एका पाकिस्तान कलाकाराने मदत केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याला बंदी असतानाही त्या कलाकारांनी माणुसकी दाखवत मदत केली आहे. दुबईमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळं श्रीदेवींचे पार्थिव भारतात तीन दिवसांनंतर आले.
कपूर घराण्यातील प्रत्येक सदस्य आणि दुबईतील भारतीय दूतावासाचे प्रयत्न होते लवकरात लवकर श्रीदेवींचे पार्थिव भारतात जावे. या क्षणी श्रीदेवीचा मॉम चित्रपटातील सहकलाकर अदनान सिद्दीकी यांनी बोनी कपूर यांना मदत केली.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनूसार, ज्यावेळी श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी आली त्यावेळी अदनान लगेच त्या हॉटेलमध्ये पोहचले. अदनान त्यावेळी दुबईमध्येच उपस्थित होते. अदनान यांना श्रीदेवीच्या भाच्य्याच्या लग्नाचे आमंत्रण होते. आणि ते लग्नामध्ये उपस्थित होते. अदनान यांची दुबईत चांगली ओळख आहे.
महत्वाच्या घटना
१८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
१९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
१९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
१९५६: मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
१९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
१९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
जन्म
१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
१९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
१९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
१९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
१९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
मृत्यू
१५६८: मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.
१७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
१८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
१९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.
१९८६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
१९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.