चालू घडामोडी - ०२ जून २०१७

Date : 2 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ग्‍लोबल वॉर्मिंगच्या मुद्यावर ट्रम्प यांनी जगाला दिला झटका :
  • जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे.

  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेची ही भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी काम करणा-या अनेक संघटनांसाठी एक धक्का आहे. 

  • अमेरिकन जनतेच्या हिताचे रक्षण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. पॅरिस क्लायमेट करारातून माघार घेत असलो तरी, नव्या तरतुदींसह पुन्हा करारामध्ये सहभागी होऊ किंवा नव्याने करार करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओबामा यांच्या राजवटीत झालेला पॅरिस क्लायमेट करार अमेरिकेवर अन्यायकारक होता. 

  • पॅरिस करार म्हणजे अमेरिकेसाठी एक प्रकारची शिक्षा होती. या करारामुळे ऊर्जा स्त्रोतांवर निर्बंध आले होते. अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग खुंटला होता.

 

सुधाकर शिंदे पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी :
  • जनतेने नगरसेवकाच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी पालिकेवर पाठविले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे काम आणखी सोपे होऊन ताण कमी होणार आहे.

  • प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

  • तसेच 1 जून रोजी शिंदे यांनी दुसऱ्यांदा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त पद स्वीकारले.

  • पनवेल पालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती.

सरिता सिंहचा नवीन राष्ट्रीय विक्रम :
  • २१व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सरिता सिंहने हातोडाफेक प्रकारात ६५.२५टरची कामगिरी करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले.

  • पूर्वीचा विक्रम २०१४ मध्ये मंजू बालाने ६२.७२ मीटरची कामगिरी करून नोंदविलेला होता. सरिता सिंह नंतर गुंजन सिंहने 61.९५ मी. व निधि कुमारने ५७.९९.. हातोडा फेकून अनुक्रमे रौप्य व कास्यपदक जिंकले.

  • तसेच महिलांच्या ४०० मी. अडथळ्याच्या (५७.३९ से.) शर्यतीत केरळच्या आर. अनुने सुवर्ण जिंकून नवा विक्रम नोंदविला.

लंडनमध्ये साजरा होणार मराठी संस्कृतीचा जागर :
  • लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ लंडनचा ८५वा वर्धापन सोहळा २, ३ आणि ४ जूनला साजरा होणार असून, तो महाराष्ट्रीय उद्योजकतेचा, संस्कृतीचा आणि चैतन्याचा एक मोठा उत्सव असणार आहे.

  • पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. लंडन मराठी संमेलनाचे प्रमुख पाहुणा होण्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल दाखवलेल्या दूरदृष्टीचादेखील उल्लेख केला आहे.

  • 'एलएमएस'मध्ये भारतातून येणाऱ्या आणि स्थानिक कलाकारांचा योग्य तो समन्वय असणार आहे.

  • भारत विकास ग्रुप (बिव्हीजी)चे एच.आर. गायकवाड हे संमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

कोहलीच्या मताला विरोध करीत गुहा यांचा राजीनामा :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा देत असल्याचे गुरुवारी प्रख्यात इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

  • गुहा यांनी २८ मे रोजी आपला राजीनामा प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे सादर केल्याचे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

  • ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार, गुहा यांनी बीबीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि अन्य समिती सदस्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीत कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडूंना मत मांडण्याचा अधिकार देण्याचे परिणाम काय होतील.

  • विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याच्या निवड प्रक्रियेबाबत गुहा यांनी २५ मे रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये भीती व्यक्त केली होती. प्रशिक्षकाची कारकीर्द उल्लेखनीय आहे, असे मतही गुहा यांनी व्यक्त केले होते.

  • कोहली आणि संघातील सदस्यांना अवाजवी महत्त्व देऊन बीसीसीआय नवी प्रथा पाडत असल्याची भीतीही गुहा यांनी व्यक्त केली होती.

रशियाचं भारतासोबत विश्वासाचं नातं, पाकशी लष्करी संबंध नाही : पुतीन
  • भारतासोबत रशियाचं विश्वासाचं नातं आहे. अनेक संवेदनशील क्षेत्रांमध्ये रशियाचा जगभरात भारतासारखा मित्र नाही. भारत सर्वात जवळच्या देशांपैकी एक आहे, असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे.

  • पाकिस्तान किंवा अन्य देशांसोबत आमचे संबंध असले तरी भारतासोबतच्या संबंधांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पाकिस्तानसोबत रशियाचे जवळचे लष्करी संबंध आहेत, हा मुद्दा खोडून काढत असं काहीही नसल्याचं पुतीन म्हणाले.

  • जगभरातील निवडक वृत्तसंस्थांच्या संपादकांच्या प्रश्नांना पुतीन यांनी उत्तरं दिले, मात्र काश्मीर प्रश्नावर थेट उत्तर देणं पुतीन यांनी टाळले असून काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला बळ देतं का नाही.

  • भारताचे रशियासोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे इतर देशांसोबतचे संबंध मर्यादित ठेवावेत असं म्हणणं हास्यास्पद आहे. पाकिस्तानसोबत रशियाचे जवळचे संबंध बिलकुल नाहीत. मात्र पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापारावर कसलाही परिणाम होणार नाही.

दिनविशेष : 

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • भारताची माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन : ०२ जून १९९६

  • लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.गुंथर यांचा मृय्यू झाला : ०२ जून १९९२

ठळक घटना

  • अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला : ०२ जून १८६२

  • भारताची फ़ाळणी करण्याची लॉर्ड मांऊटबॅटन यांची घोषणा : ०२ जून १९४७

  • शेतकरी कामगार पक्षाची स्थापना : ०२ जून १९४८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.