टोकियो- जपानचे राजे अखिहितो यांनी 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात जुने राजघराणे समजले जाणाऱ्या या कुटुंबात राजाने असे निवृत्त होण्याची वेळ 200 वर्षांनंतर येत आहे.
तब्येतीच्या कारणामुळे 83 वर्षिय अखिहितो यांनी हा निर्णय घेतला असून त्यापुर्वी त्यांनी इम्पिरियल कौन्सीलशी चर्चाही केली आहे.
आता हा निवृत्तीचा समारोह आणि नव्या राजाचे आगमन हे दोन्ही सोहळे जपानी जनता अत्यंत आनंदात साजरे करतील असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्पष्ट केले आहे. अखिहितो यांचे ज्येष्ठ पुत्र राजपुत्र नारुहितो आता राजगादीवर बसतील असे सांगण्यात येत आहे.
नारुहितो हे 57 वर्षांचे आहेत. सुमारे 30 वर्षे राजसत्तेवरुन काम केल्यावर अखिहितो यांनी गेल्या वर्षी तब्येतीचे व वाढत्या वयाचे कारण सांगून निवृत्तीचे संकेत दिले होते, तेव्हाच जपानी जनतेला मोठा धक्का बसला होता.
माले- श्रीलंकेपाठोपाठ चीनने आता मालदिवमध्येही आपले हितसंबंध वाढवले आहेत. मालदिवने अत्यंत घाई-गडबडीत चीनबरोबर मुक्त व्यापार करुन संपुर्ण जगाला आश्चर्यचकीत केले आहे.
अर्थात या कराराला मालदिवच्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष नाशिद यांनी विरोध केला असून या करारामुळे देशात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चीनने मालदिवशी असा करार केल्यामुळे भारत व मालदिव यांच्या संबंधांमध्ये नव्याने समस्या निर्माण होणार आहेत.
29 नोव्हेंबर रोजी मालदिवची संसद मजलिसच्या सभापतींनी अचानक बैठक बोलावून हा करार संमत करुन घेतला. बैठक सुरु झाल्यावर केवळ तीन मिनिटांमध्ये त्यांनी कराराचा प्रस्ताव राष्ट्रीय संरक्षणावरील संसदीय समितीकडे हा प्रस्ताव पाठवला आणि कमिटीने दहा मिनिटांच्या आत त्याला होकार देऊनही टाकला.
यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संसदीय नियमांचे, कायद्यांचे किंवा कार्यपद्धती नियमावलीचे पालन केले नाही. या कराराच्या कागदपत्रांचा एकदा अभ्यास केला जावा अशी विरोधकांनी मागणी करुनही त्यांचे सभापतींनी ऐकून घेतले नाही.
1000 पानांहून जास्त पाने असणाऱ्या या कराराला एका तासाच्या आत संमती दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष यामिन अब्दुल गयूम यांच्यावर टीका होत आहे. त्याचप्रमाणे या करारातील तरतुदींबद्दल कोणतीही माहिती जाहीर न केल्याबद्दलही विरोध केला जात आहे.
जुबा- संयुक्त राष्ट्राने सुरु केलेल्या प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या रस्ते बांधकाम प्रकल्पाचे काम दक्षिण सुदानमध्ये सुरु झाले आहे. भारतीय अभियंते या कामासाठी मदत करत आहेत. या रस्त्यामुळे दक्षिण सुदानमधील दोन शहरे जोडली जाणार आहेत. हा रस्ता 205 किमी लांबीचा आहे.
मालकल आणि मेलूत यांच्यामधील रस्त्याची दुरुस्ती आणि बांधकाम झाल्यामुळे मोटरचालक, स्थानिक व्यापारी यांसह संयुक्त राष्ट्राने मदतीसाठी पाठवलेल्या वाहनांना फायदा होणार असल्याचे स्थानिक गव्हर्नर जेम्स टॉर मुनीबनी यांनी या कामाचा शुभारंभ झाल्यावर सांगितले.
युनायटेड नेशन मिशन्सचे दक्षिण सुदानमधील सुरु असणारे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहेत. या मोहिमेत भारताचे 2400 लोक काम करत आहेत.
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती तथा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, येत्या सात वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढून ५ लाख कोटी डॉलर होईल, तसेच २0३0 पर्यंत ते १0 लाख कोटी डॉलरवर जाईल. २१ व्या शतकाच्या मध्यास भारत चीनला मागे टाकील.
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानी यांनी येथे आयोजित एका नेतृत्व शिखर परिषदेत सांगितले की, २00४ मध्ये आपण भारताची अर्थव्यवस्था २0 वर्षांत ५00 अब्ज डॉलरची होईल, असे भाकीत केले होते.
आज आपले हे भाकीत खरे ठरत आहे. २0२४ पूर्वीच भारत ही कामगिरी करील. आगामी १0 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ७ लाख कोटी डॉलरची होईल. त्याबरोबर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मानही भारताला मिळेल. २0२0 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १0 लाख कोटी डॉलरचा मैलाचा दगड पार करील.
अंबानी म्हणाले की, या शतकात भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक भरभराट असलेली अर्थव्यवस्था बनेल. २१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारताचा वृद्धीदर चीनपेक्षा जास्त असेल, तसेच तो जगातील सर्वाधिक आकर्षक दरही असेल.
भारत जगाला सर्वांत चांगले आणि सर्वथा वेगळे विकास प्रतिमान (डेव्हलपमेंट मॉडेल) देईल. तंत्रज्ञान, लोकशाही, उत्तम अभिशासन आणि सामाजिक सांस्कृतिक समानाभूतीवर आधारित असलेले हे प्रतिमान समन्याय आणि समावेशी वृद्धी निर्माण करील.
नवी दिल्ली - विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.
तिसऱ्या आणि निर्णयाक लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नागपूर कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि के. एल राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी मोहम्मद शामी आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालं आहे. घरगुती कारणामुळे दुसऱ्या कसोटीतून शिखर धवन याने माघार घेतली होती.
दरम्यान, विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.
जागतिक दिवस
जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
महत्वाच्या घटना
१४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
१९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.
१९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.
१९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.
१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.
१९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्या त्या पहिल्या महिला आहेत.
१९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
२००१: एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
जन्म
१८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)
१८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.
१८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)
१९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.
१९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.
१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.
१९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)
१९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.
१९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.
१९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.
मृत्य
१५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)
१९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.
१९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)
१९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)
२०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.