बर्मिंगहॅम : उद्यापासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान अॅशेस मालिकेतली पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. पण या कसोटीला एक वेगळ महत्व असणार आहे. कारण या मालिकेपासून आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता कसोटी क्रिकेटलाही नवी संजीवनी देण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. यासाठीच टेस्ट चॅम्पियनशीप हे आयसीसीनं उचललेलं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमधल्या अॅशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीपासून या विजेतेपदाच्या संग्रामाला सुरुवात होत आहे. त्यात कसोटी मान्यता असलेले बारापैकी नऊ संघ सहभागी होणार आहेत. या नऊ संघांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.
1 ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान या सर्व संघांमध्ये एकूण 27 मालिका खेळवल्या जातील. प्रत्येक संघ सहा कसोटी मालिका खेळेल. त्यात 72 कसोटी सामन्यांचा समावेश असेल. त्यातून पहिल्या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठीचा सामना 10 ते 14 जून 2021 ला लंडनच्या लॉर्डसवर खेळवण्यात येईल.
मुंबई : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य दिले जाते, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
मंत्रालयात बोलताना देसाई म्हणाले, सध्या राज्यात 3 हजार 52 मोठे व विशाल प्रकल्प असून त्या माध्यमातून 9 लक्ष 69 हजार 495 रोजगारांची निर्मीती झाली आहे. यात पर्यवेक्षीय श्रेणीत 84 टक्के तर इतर श्रेणीत 90 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाली आहे. तर,10 लक्ष 26 हजार 992 सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमंच्या माध्यमातून सुमारे 60 लक्ष रोजगार निर्मीती झाली आहे. त्यातही पर्यवेक्षीय श्रेणीत 84 टक्के तर इतर श्रेणीत 90 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाली आहे.
भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये, यासाठी हे धोरण अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात उद्योग स्थापन करणाऱ्या कंपन्यांना वस्तु व सेवा कराच्या परताव्यातून दरवर्षी उद्योगाने केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर अनुदान दिले जाते. 2018-19 यावर्षी ही परताव्याची एकूण रक्कम (पीएसआय) रुपये 3035 कोटी रुपये होती. नव्या प्रस्तावानुसार जे उद्योग राज्य निर्णयाप्रमाणे स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्यांचे बंधन पाळणार नाहीत, त्यांच्या प्रोत्साहन रकमेचा परतावा रोखून धरण्यात येईल. या आर्थिक नाकेबंदीमुळे महाराष्ट्रात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये डावलण्याची हिम्मत कोणतीही कंपनी दाखवू शकणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांना उद्योगात नोकरीत प्राधान्य द्यावे या धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याला तर राज्य स्तरावर उद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. राज्यातील उद्योजकांनी या संदर्भातील माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापुढे कंत्राटी कामगारांचीही नोंद करुन त्यातही भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ४० जागा सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत. उर्वरित ४० हजार जागा खासगी महाविद्यालयात असून त्याचे शुल्क राज्य सरकारची समिती निश्चित करते. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या शुल्कावर कमाल मर्यादा आणता येईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गुरुवारी राज्यसभेत दिले.
देशभरातील वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाविरोधात डॉक्टरांनी संप पुकारला असताना, गुरुवारी मात्र हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.
लोकसभेतही विधेयकावर मोहोर लागलेली आहे. आयोगावर राज्यांचे प्रतिनिधी वाढवण्याच्या या विधेयकात केलेल्या दुरुस्तीला लोकसभेची मंजुरी घेतली जाईल. सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय वैद्यकीय समितीला (एमसीआय) नवा आयोग पर्याय असेल.
वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय आणि संस्था या तीनही बाबी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नियमन करेल. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर ६३ वर्षे जुना एमसीआय (१९५६)चा कायदा आपोआप रद्द होईल. मोदी सरकारच्या दृष्टीने वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी ‘सुधारणा’ मानली जात आहे.
वॉशिंग्टन : इराणकडून तेल खरेदी न करण्याच्या मुद्दय़ावर भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचे कौतुक केले आहे. भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.
इराण आणि भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, मात्र अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी भारताने इराणकडून तेल आयात मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लादून अमेरिकेने अन्य सहकारी देशांना इराणकडून तेलाची आयात बंद करण्यास सांगितले होते. सुरुवातीला अमेरिकेने भारतासह अन्य देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली होती. मात्र सहा महिन्यांनंतर ही सवलत बंद करण्यात आली होती.
इराणच्या आण्विक कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने २०१५च्या आण्विक करारातून माघार घेतली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे निर्बंध अमेरिकेने लादले आहेत. त्यामुळे उभय देशांत मोठा तणाव निर्माण झाला आहे.
राजस्थानमधील झुंडबळी (मॉब लिचिंग) आणि ऑनर किलिंगच्या (प्रतिष्ठाबळी) घटनांना आळा घालण्यासाठी अशोक गेहलोत यांचे सरकार कायदा लवकरच कायदे करणार आहे. या दोन्ही कायद्याचे प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आले आहेत. हे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी आवश्यक न्यायालय तयार करण्याची योजनाही विधेयकात प्रस्तावित आहे.
झुंडीपासून संरक्षण कायदा-२०१९ आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रथांच्या नावाखाली वैवाहिक स्वातंत्र्यामधील हस्तक्षेप प्रतिबंधक कायदा-२०१९ अशी दोन्ही विधेयके सरकारच्या वतीने विधानसभेत मांडण्यात आली आहेत. गेल्या काही काळात झुंडबळीच्या असंख्य घटना घडल्या आहेत. यात अनेकांना जिव गमवावा लागला, तर काही जखमी झाले आहेत. द्वेषाचे वातावरण कमी करून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी हा कायदा सरकारने आणला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सागितले.
यासाठी राज्य पातळीपासून जिल्हास्तरापर्यंत समन्वयक असणार आहे. राज्यस्तरावरील अधिकाऱ्याचे पद पोलीस महानिरीक्षकांच्या दर्जाचे असून त्याची नियुक्ती राज्याचे पोलीस महासंचालक करणार आहे. याचप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक अधिकारी समन्वयक असणार आहे. या कायद्यात झुंडबळीची व्याख्या सविस्तर करण्यात आलेली आहे. राजस्थान सरकारने ऑनर किलिंग प्रतिबंधक कायद्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतुद केली आहे.
महंतांच्या घटना
१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.
१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.
१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
जन्म
१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)
१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)
१८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)
१८६१: भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९४४)
१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३)
१८७७: भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५)
१८९२: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८)
१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी१९७८)
१९१८: आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.
१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुन २०१३)
१९३२: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर २०१६)
१९४१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.
१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.
१९५८: भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.
मृत्यू
१५८९: फ्रान्सचा राजा हेन्री (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)
१७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.
१९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४७)
१९३४: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)
१९७८: मोनॅको ग्रांप्री चे स्थापक अॅन्टोनी नोगेस यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८९०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.