बीजिंग - अंतराळात भरकटत असलेले चीनचे स्पेस स्टेशन अखेर पॅसिफिक महासागरात कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. संपर्क तुटल्यानंतर गेली दोन वर्ष अंतराळात भरकट असलेले चीनचे स्पेस स्टेशन सोमवारी (2 एप्रिल) पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
यादरम्यान मुंबई किंवा महाराष्ट्रात हे स्पेस स्टेशन कोसळेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. हे स्पेस स्टेशन हे यान उत्तर व दक्षिण अमेरिका, चीन, मध्य पूर्व, आफ्रिका,ऑस्ट्रेलिया, युरोपचा काही भाग, पॅसिफिक व अॅटलांटिक महासागर परिसरात या कोसळू शकते, असेही म्हटले गेले होते.
मात्र, हे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळल्यानं सुटकेचा निश्वास सोडण्यात आला आहे. अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे स्पेस स्टेशन जळून खाक झालं व त्याचे तुकडे पॅसिफिक महासागरात पडल्याची माहिती समोर आली. टीयाँगाँग-1 असं या स्पेस स्टेशनचं नाव असून ते बसच्या आकाराचे होते. मार्च 2016 मध्ये या स्पेस स्टेशनचा चीनशी असलेला संपर्क खंडित झाला होता. तेव्हापासून ते स्पेस स्टेशन अंतराळात फिरत होते.
दरम्यान, हे स्पेस स्टेशन भारतात कोसळणार नाही, याबद्दलची भीती इस्त्रोनं दूर केली होती. तर या घटनेमुळे पृथ्वीवरील कोणालाही आणि हवाई वाहतुकीला फटका बसणार नाही, असे चायना मॅनड् स्पेश इंजिनिअरिंग ऑफिसनं वृत्तसंस्थेला सांगितले होते..(source :lokmat)
भारतात ४६.२१ कोटी इंटरनेट वापरकर्ते असून ही संख्या चीनच्या खालोखाल आहे, पण असे असले तरी माहिती सुरक्षेची कायदेशीर व्यवस्था मात्र अतिशय अपुरी आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
फेसबुक व केंब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणामुळे माहिती चोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावरून भाजप व काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. फेसबुकच्या ५ कोटी वापरकर्त्यांची माहिती केंब्रिज अॅनॅलिटिकाने घेतली होती. त्याचा वापर अमेरिकी निवडणुकीत तसेच ब्रिटनमधील ब्रेक्झिट जनमतात करण्यात आला होता.
सायबर सिक्युरिटी अर्नेस्ट अँड यंग या कंपनीचे भागीदार जसप्रीत सिंग यांनी सांगितले, की भारत हा इंटरनेट वापरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० लागू असून त्यात २००८ व २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली होती, पण या सुधारणा समाजमाध्यमांच्या माहिती चोरीशी मुकाबला करण्यात फारशा उपयोगाच्या नाहीत. जागतिक इंटरनेट वापराबाबत इंटरनेट वर्ल्ड स्टॅट या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये ७३.८५ कोटी वापरकर्ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर आहेत, अमेरिका २८.६९ कोटी वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात माहिती सुरक्षा व व्यक्तिगतता यावर कुठलाही कायदा नाही. त्यामुळे त्रयस्थांमार्फत माहिती हस्तांतरण व व्यक्तिगत माहितीचा गैरवापर यावर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कुठलीही कारवाई करता येत नाही.(source :loksatta)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावणारे महान क्रांतीकारक शहीद राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा संघाने केला आहे. संघ प्रचारक आणि अभाविपच्या हरयाणा शाखेचे संघटन मंत्री म्हणून काम पाहिलेल्या नरेंद्र सेहगल यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. राजगुरू हे संघाच्या मोहिते वाड्याचे स्वयंसेवक होते, असे या पुस्तकात म्हटले आहे.
राजगुरू यांचे संघ संस्थापक हेडगेवार यांच्याशी निकटचे संबंध होते. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हेही संघाच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
सेहगल यांच्या ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १४७ वर लिहिले आहे की, लाला लजपत राय यांच्या हौताम्याचा बदला घेण्यासाठी भगत सिंग आणि राजगुरू यांनी इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सवर लाहोर येथे गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर दोघांनी लाहोर सोडले. राजगुरू यांनी नागपूर येथे येऊन डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली. राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते. हेडगेवार यांनी आपले सहकारी भैयाजी दाणी यांच्या फार्म हाऊसवर राजगुरू यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.
स्वातंत्र्य लढ्यात संघाच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जाते. त्याला या पुस्तकातून उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या पुस्तकात याविषयी आपली भूमिका मांडली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचे महत्वपूर्ण योगदान असून स्वयंसेवकांनी प्रसिद्धीपासून दूर राहत देशाची सेवा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.(source :loksatta)
देहरादून: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व देहरादूनचे माजी खासदार रमेश पोखरियाल निशांक यांची कन्या श्रेयसी ही लष्करी सेवेत दाखल झाली आहे. लष्कराच्या वैद्यकीय विभागात तिची कॅप्टनपदी निवड झाली आहे. तिला सध्या हरिद्वारच्या रुरकी येथील लष्करी रुग्णालयात पोस्टिंग देण्यात आली आहे.
रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्विट करून आपल्या लेकीच्या अभिमानास्पद कामगिरीची माहिती सर्वांना दिली. या ट्विटसोबत त्यांनी श्रेयशीच्या गणवेशावर स्टार लावतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. श्रेयशीने ऋषिकेश येथून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मॉरिशस येथे गेली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रेयशीला मॉरीशस येथे मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर होती. पण तिने सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांकडून तिच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनीही लष्करात निवड झाल्याबद्दल श्रेयशीचे अभिनंदन केले.source :lokmat)
नवी दिल्ली - आधार कार्ड आणि पॅन एकमेकांना संलग्न केल्यानंतर आता हे आधार कार्ड भ्रष्ट अधिकाºयांचा घोटाळा बाहेर आणू शकेल. तसे विशेष सॉफ्टवेअर तयार होत असल्याची माहिती केंद्रिय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांनी दिली.
विविध वित्त व्यवहारांसाठी केंद्र सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्याआधारेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकाºयांच्या बेहिशेबी मालमत्ता हुडकून काढण्याची मोहिम केंद्रिय दक्षता आयुक्तालय हाती घेत आहे.
विभागाने यासंबंधीचा आराखडा तयार केला आहे. एक विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. एखाद्या अधिकाºयाची माहिती काढायची असल्यास सर्व विभागांकडून आवश्यक ती माहिती त्याआधारे तात्काळ मिळवता येईल. स्थावर मालमत्ता व शेअर्स खरेदीसारख्या वित्त व्यवहारांची माहिती ही प्राप्तीकर खाते, मालमत्ता नोंदणी विभाग, मुद्रांक शुल्क, सेबी यांच्याकडे असते. आता ‘आधार’ सर्वच ठिकाणी अनिवार्य केल्यास या सर्व विभागांकडून अशा वित्त व्यवहारांची माहिती विना विलंब मिळविता येईल, असे चौधरी यांनी सांगितले.
तपास होईल सोपा : सीबीआय आणि अन्य तपास विभागांकडे याआधी अशा प्रकारे थेट माहिती मिळविण्याची साधनेच नव्हती, पण घोटाळ्यांच्या तपासासाठी ही माहिती मौल्यवान असते. आता मात्र तशी प्रणाली विकसित केली जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून काही परवानग्याही घ्याव्या लागतील, असे चौधरी यांनी सांगितले.(source :lokmat)
नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रातील माजी आमदार आपल्या निवृत्तीवेतनात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करण्याची मागणी केली असताना, भारतरत्न आणि माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने आपलं सर्व वेतन आणि भत्ते पंतप्रधान मदतनिधीला दान केले आहेत.
राज्यसभेवर खासदार असताना आपल्या उपस्थितीवरुन सचिन अनेकांच्या टीकेचं लक्ष्य बनला. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर सचिनवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
गेल्या सहा वर्षात सचिनला जवळपास 90 लाख रुपये वेतन आणि अन्य मासिक भत्ते मिळाले होते. ते सर्व त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे दान केले आहेत.
सांसद आदर्श गाव योजनेत सचिनने दोन गावं दत्तक घेतली होती. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावाचा समावेश होता.(source :abpmajha)
जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरुकता दिन
महत्वाच्या घटना
१८७०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
१९८२: फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
१८९४: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
१९८९: ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.
१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
१९९८: कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
जन्म
१६१८: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी यांचा जन्म.
१८०५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचा जन्म.
१८७५: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०)
१८९८: हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९० – मुंबई, महाराष्ट्र)
१९०२: पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ – हैदराबाद, तेलंगण)
१९२६: कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९७९)
१९४२: भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
१९६९: हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
१९७२: भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
१९८१: भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
मृत्यू
१८७२: मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल१७९१)
१९३३: क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १७९१)
१९९२: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.
२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: १८ मे १९२०)
२००९: गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१७)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.