चालू घडामोडी - ०१ ऑक्टोबर २०१७

Date : 1 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण :
  • शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले.

  • यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते, शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे. 

  • आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे लोकार्पण केले असून आता राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 

पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

  • सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

  • तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात कायमस्वरूपी राज्यपालांची मागणी होत होती.

  • पुरोहित यांच्या नियुक्तीमुळे तामिळनाडूला पूर्णवेळ राज्यपाल मिळाले असून बनवारीलाल पुरोहित हे विदर्भातील नेते आहेत १९७७ मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले.

  • १९७८ मध्ये ते नागपूर पूर्वमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.

कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप : सुषमा स्वराज
  • कुवेतमधील १५ भारतीयांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करवून घेण्यात भारताला यश आले असून त्यांना आता जन्मठेप भोगावी लागणार आहे.

  • कुवेतचे राजे सबाह अल सबाह यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची विनंती मान्य करून, १५ भारतीयांची शिक्षा बदलली.

  • याखेरीज कुवेतच्या तुरुंगात सध्या ११९ भारतीय नागरिक विविध प्रकारची शिक्षा भोगत असून त्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णयही कुवेतच्या राजाने घेतला आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितले.

  • त्यांनीच १५ जणांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केल्याचे नमूद केले असून सुषमा स्वराज यांनी या निर्णयाबद्दल राजांचे आभार मानले आहेत.

  • कुवेतमधील भारतीय दुतावास या सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून, त्यांची सुटका होताच, त्यांना सर्व सुविधा दुतावासामार्फत पुरविण्यात येतील, असे स्वराज यांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांनी नवीन अध्यायाची सुरुवात करावी : भारत-चीन
  • डोकलाम वादानंतर चीनने पूर्णपणे मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत असून सध्याच्या घडीला भारत आणि चीनने जुनी पाने उलटून नवीन अध्यायाला सुरुवात करायला हवी, असे चीनचे दूत लुओ झाओहुई म्हणाले.

  • पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त लुओ बोलत होते, या महिन्याच्या सुरुवातीलाच ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती.

  • त्यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती त्यात या दोन्ही नेत्यांनी एकत्रित आणि सहकार्याने काम करण्याचे संकेत दिले होते, असे लुओ म्हणाले.

  • आपल्याला ‘एक और एक ग्यारह’ या पद्धतीने काम करायला हवे, असेही लुओ यांनी सांगितले असून चीन आणि भारत हे दोन्ही देश मोठे व्यापारी भागीदार आहेत. द्विपक्षीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर खूपच चांगली प्रगती केली आहे, असेही ते म्हणाले.

मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया उत्सुक :
  • या वर्षांतला पहिला एकदिवसीय सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या वाटेवर परतला असून दुसरीकडे भारताच्या सलग विजयांची मालिका खंडित झाली आहे.

  • तिन्ही सामने जिंकत भारताने ही मालिका खिशात टाकली असून त्यामुळेच हा अखेरचा सामना जिंकत शेवट गोड करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

  • हार्दिक पंडय़ाच्या रूपात भारताला भरवशाचा अष्टपैलू खेळाडू या मालिकेत मिळाल्याचे म्हटले जात आहे, आतापर्यंत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

  • अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनाही सूर गवसला असून केदार जाधवही आता फॉर्मात आल्याचे दिसत आहे, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

  • महेंद्रसिंग धोनीनेही टीकाकारांची तोंडे बंद केली असून घरच्या मैदानात वेगवान गोलंदाज उमेश यादव कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • त्यामुळे भारताचा सध्याचा फॉर्म चांगला आहे. गेल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी या सामन्यात ते त्वेषाने उतरतील, अशीच चिन्हे आहेत.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक वृद्ध दिवस

जन्म /वाढदिवस

  • संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म : ०१ ऑक्टोबर १९०६

  • कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म : ०१ ऑक्टोबर १९३०

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • भारतातील प्रसिध्द उद्योगपती आदित्य बिर्ला यांचे निधन : ०१ ऑक्टोबर १९९५

  • नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन : ०१ ऑक्टोबर १९३१

  • जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन : ०१ ऑक्टोबर १९९७

ठळक घटना.

  • भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले : ०१ ऑक्टोबर १८३७

  • भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली : ०१ ऑक्टोबर १९५८

  • सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले : ०१ ऑक्टोबर १९८२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.