महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनासोबतच गुजरातचा स्थापना दिवसही असल्याने पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे, असं ट्विट मराठी भाषेत मोदींनी केलं.
तर गुजरातचे लोक हे नेहमी त्यांच्या साधेपणासाठी व व्यापारी कौशल्यासाठी ओळखले जातात. स्वातंत्र्य चळवळीत आणि देशाच्या वाटचालीत गुजरातने मोलाची कामगिरी बजावली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे भारताच्या विकासात हातभार लावावा असे ट्विटरद्वारे मोदींनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन : ‘नासा’ने गेल्या दहा दिवसातील भारताचे काही फोटो प्रसिद्ध केले असून, या फोटोंमध्ये देशातील अनेक भागात आगीचे लोण पसरल्याचं दिसत आहे. ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह दक्षिण भारतातील अनेक राज्यात आगीचे लोण पसरलेल्याचे दिसत आहे.
या आगींमुळे वातावरणात ब्लॅक कार्बनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण वाढीत भर पडली आहे. विशेष म्हणजे, आगीच्या भक्षस्थानी पडलेला सर्वाधिक भागात जंगल असल्याचं सांगितलं जात आहे.
पण ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी हा दावा फेटाळला आहे. वैज्ञानिकांच्या मते, ज्या भागात आगीचे लोण दिसत आहेत. त्यापैकी सर्वाधिक भागात शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. जंगलात पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवणं अशक्य असतं. तसेच, या आगीमुळे वातावरणात सर्वत्र धुराचे लोळ आणि धुकं पसरतं, असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे कृषी तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षात शेतमजुरांची मजुरी वाढल्याने, हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.त्यामुळे पिकांच्या कापणीनंतर पिकांचा खालचा भाग मुळासकट काढून टाकण्यासाठी आग लावली जाते.
'नासा'ने जे फोटो प्रसिद्ध केले आहेत, त्या भागात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
सिडनी : डेव्हिड गूडाल हे १०४ वर्षांचे आॅस्ट्रेलियातील वयोवृद्ध वैज्ञानिक पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण घेणार आहेत. ते पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. दोन वर्षांपूर्वी पथच्याा एडिथ कोवान विद्यापीठाने, कॅम्पसमध्ये राहण्यास अपात्र ठरवून, त्यांना सामानसुमानासह सक्तीने घराबाहेर काढले, तेव्हा जगातील वैज्ञानिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
आॅस्ट्रेलियात इच्छामरणास बंदी असून, व्हिक्टोरिया राज्याने अपवादात्मक परिस्थितीत इच्छामरणाची अनुमती देणारा
कायदा केला. तो जून २०१९ मध्ये अंमलात येईल. तोे मरणासन्न अवस्थेत असलेल्या व सहा महिने जगण्याची शक्यता असलेल्यांनाच लागू होईल.
गूडाल गलितगात्र आहेत, पण ते मरणासन्न नाहीत. त्यामुळे आॅस्ट्रेलियात इच्छामरण घेणे शक्य नसल्याने त्यांनी स्वित्झर्लंडमधील बेसेल येथील दयामरण देणाऱ्या संस्थेत मृत्यूला कवटाळण्याचे ठरविले आहे.
गेल्या महिन्यात १०४ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी ‘एबीसी’ वृत्तवाहिनीला सांगितले की, इतकी वर्षे जगल्याचा मला पश्चात्ताप होतोय. मी बिलकूल आनंदी नाही, मला मृत्यू हवाय! नैसर्गिक मृत्यू येत नसल्याचे दु:ख नाही..
मुंबई : जेईई मेन 2018 या परीक्षेच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर झाला आहे. दुसऱ्या पेपरचा निकाल उद्या जाहीर होईल. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे राहणाऱ्या सुरज कृष्णा या विद्यार्थ्याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. तर नांदेडचा पार्थ लटुरिया देशात तिसरा आला आहे.
पार्थचं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण नांदेडमध्ये झालं आहे. त्याचे आई-वडील नांदेडमध्ये डॉक्टर आहेत. अकरावी आणि बारावीसाठी तो राजस्थानमधील कोट्याला गेला होता. या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवलं आहे.
परीक्षा दिलेले विद्यार्थी jeemain.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
JEE Main ची ऑफलाईन परीक्षा 8 एप्रिल रोजी, तर ऑनलाईन परीक्षा 15 एप्रिल रोजी झाली होती. देशभरातील 11 लाख 35 हजार 84 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 8 लाख 57 हजार 564 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन, तर दोन लाख 16 हजार 755 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.
या परीक्षेत एकूण 2 लाख 31 हजार 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सामान्य प्रवर्गात एक लाख 11 हजार 275 (कटऑफ 74), ओबीसी-एनसीएल प्रवर्गात 65 हजार 313 (कटऑफ 45), अनुसूचित जाती 34 हजार 425 (कटऑफ 29), अनुसूचित जमाती 17 हजार 256 (कटऑफ 24) आणि दिव्यांग श्रेणीतील 2 हजार 755 (कटऑफ -35) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात महाश्रमदानाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून एक लाखाहून अधिक जण गावखेड्यांकडे श्रमदानासाठी जाणार आहेत.
महाश्रमदानामध्ये राज्यभरातील राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी होणार आहेत. उद्योग जगतातील मोठी मंडळीही श्रमदानासाठी हातभार लावणार आहेत. श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे.
लातूरमध्ये आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्टी कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानात सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले आहेत.
याशिवाय सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अमेय वाघ, अलोक राजवाडे-पर्ण पेठे हे कलाकारही विविध ठिकाणी महाश्रमदान करत आहेत.
सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले आहेत. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकावा, यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र असे बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी आंतरराष्ट्रीय शाळांबाबत माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमधूनच आंतरराष्ट्रीय शाळांची निवड करण्यात येणार आहे. या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या इंग्रजी माध्यमाच्या नसतील. इंग्रजी हा महत्त्वाचा विषय निश्चित असेल, पण इतर पूर्ण शिक्षण हे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलगू, कानडी माध्यमांच्या शाळांची निवड केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय शाळा बोर्डास पूर्णत: स्वायत्तता दिली जाईल आणि गुणवत्तेसाठीचे सगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. या शाळांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती लवकरच नियुक्त करण्यात येईल.
मुंबई विद्यापीठाच्या नव्याने नियुक्त झालेल्या कुलगुरूंनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या वेळी मुंबई विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनीही कुलगुरूंच्या अभिनंदन करत, त्यांना ‘यू कॅन विन’, ‘तुकाराम दर्शन’ ही पुस्तके भेट दिली. प्रलंबित निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी प्राधान्य देणार असून नॅक, अॅक्रिडेशनची पूर्तता करणे, विद्यापीठातील रिक्त जागा भरणे, कामाची विभागणी करणे आदी कामांचा निपटारा करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलं आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून यावेळी भारतीय संघ सर्वात प्रथम टी-२० सामने खेळणार आहे. अंदाजे २ महिने भारताचा संघ कांगारुंच्या भुमीत तळ ठोकून असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली टी-२० – २१ नोव्हेंबर (गॅबा)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी टी-२० – २३ नोव्हेंबर (मेलबर्न)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी टी-२० – २५ नोव्हेंबर (सिडनी)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी – ६ ते १० डिसेंबर (अॅडीलेड)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर (पर्थ)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी (सिडनी)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली वन-डे – १२ जानेवारी (सिडनी)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी वन-डे – १५ जानेवारी (अॅडीलेड ओव्हल)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी वन-डे – १८ जानेवारी (मेलबर्न)
जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
महत्वाच्या घटना
१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
१९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
जन्म
१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)
१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)
१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)
१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)
१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.
१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.
१९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.
मृत्यू
१९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)
१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
१९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून १९०७)
२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.