चालू घडामोडी - ०१ जून २०१७

Date : 1 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जाणून घ्या, आजपासून एसबीआयच्या व्यवहारांवरील शुल्क आकारणीत झालेले बदल :
  • स्टेट बँक ऑफ इंडिया आपले मोबाईल अॅप स्टेट बँक बडीच्या माध्यमातून काढल्या जाणाऱ्या पैशांवरील सेवा शुल्कात बदल करणार आहे. यासोबतच बँकेने अन्य व्यवहारांचे नियम आणि त्यावर आकारले जाणारे शुल्क यामध्येही बदल केले आहेत. हे नवे नियम आजपासून (१ जून) लागू झाले आहेत.

  • मात्र मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून एटीएममधून रोख रक्कम काढल्यावरच २५ रुपये आकारण्यात येईल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. एसबीआयच्या बडी अॅपमधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • बचत खाते असलेल्या खातेधारकांना एटीएमच्या माध्यमातून ८ मोफत व्यवहार (५ एसबीआयच्या एटीएममधून आणि ३ इतर बँकांच्या एटीएममधून) करता येणार आहेत.

  • महानगरांमध्ये एटीएमच्या माध्यमातून ८ व्यवहार मोफत करता येणार आहेत. तर निमशहरी भागांमध्ये १० मोफत व्यवहार करण्याची परवानगी असणार आहे. याआधी एटीएममधून केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये शुल्क आकारले जाणार असल्याची चर्चा होती.

राजीव गांधींनंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी पहिले पंतप्रधान : 
  • चार देशांच्या युरोप दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झाले. सहा दिवसांच्या दौ-यातील हा दुसरा टप्पा आहे. मोदींनी सर्वप्रथम जर्मनीला भेट देऊन चॅन्सलेर अँजेला मर्केल यांच्यासोबत चर्चा केली.

  • स्पेन दौ-यात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करणे तसेच स्पेनबरोबरचे आर्थिक संबंध विकसित करण्याचा उद्देश आहे. स्पेनबरोबरच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी आपण इथे आलो आहोत असे मोदींनी माद्रिदमध्ये दाखल होताच इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत टि्वट करुन सांगितले. 

  • मोदींचा हा स्पेन दौरा एका अर्थाने ऐतिहासिकच आहे. कारण ३० वर्षांनी १९८८ तर स्पेनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता. स्पेनच्या अर्थमंत्र्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी दिली. 

  • भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या स्पॅनिश उद्योगपतींबरोबरही मोदी चर्चा करणार आहेत. स्पेनचा दौरा आटोपून मोदी०१ जूनला रशियाला जातील. मोदी १८ व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेला उपस्थित असतील. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर त्यांची चर्चा होईल.

यूपीएससी परीक्षेमध्ये कर्नाटकच्या नंदिनी के. आर. देशात प्रथम :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) जाहीर झालेल्या निकालामध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर. हिने देशात अव्वल स्थान पटकावले.

  • भारतीय प्रशासकीय अधिकारी बनण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती, असे नंदिनीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

  • अनमोल शेर सिंग बेदी अणि जी. रोनान्की यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले.

  • आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय विदेश सेवा), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवांच्या नियुक्तीसाठी एकूण 1099 उमेदवारांची निवड करण्यात आली.

  • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ही नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा :
  • मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होणाऱ्या सुधारणेनंतर महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे.

  • महापालिकेच्या जमिनीवर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना त्यांच्या धारणक्षेत्रानुसार आता वैयक्तिक स्वरूपात जमिनीचे पट्टेवाटप करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

  • महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ७९ (ग) नुसार यापूर्वी केवळ झोपडीधारक सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थांनाच जमिनी देता येत होत्या. मात्र, यामुळे त्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येऊन प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हते.

  • महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील कलम ७९ (ग) मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दुसऱ्या परंतुकानुसार पात्र झोपडीधारकांना पट्टेवाटप करताना लागू करावयाच्या अटी व शर्ती त्याचप्रमाणे आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम शासन निश्‍चित करणार आहे. त्यानुसारच पात्र झोपडीधारकांना जमिनीचे पट्टे दिले जाणार आहेत.

शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेराव्या क्रमांकावर :
  • जगातील सर्वाधिक 'डायनॅमिक सिटी' म्हणजे वेगाने बदलणारी शहरे असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. या बाबतीत आपल्या देशाने चीनला मागे टाकले आहे.

  • सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुण्याने तेरावे स्थान पटकावले आहे. पुण्याप्रमाणेच हैदराबाद पाचव्या स्थानावर, तर बंगळूर पहिल्या स्थानावर आहे.

  • जगभरातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हे मूल्यांकन 'जेएलएल' या अमेरिकी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने केले आहे.

  • देशांतर्गत शहरांमध्ये बंगळूर शहराने प्रथम क्रमांक, तर हैदराबादने दुसरा आणि पुण्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ चेन्नई, दिल्ली व मुंबईचा क्रमांक लागतो.

डॉ. खोचीकर 'सर्जरी'च्या जागतिक संदर्भग्रंथाचे लेखक :
  • भारतातील फक्त दोन डॉक्‍टर या ग्रंथासाठी निमंत्रित लेखक होते. 'मूत्रपिंडाचे कर्करोग आणि अंडाशयाचे आजार' या दोन विषयांवर त्यांचे प्रबंध आहेत.

  • वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सेचा जागतिक दर्जाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या 'सर्जरी कोअर प्रिन्सिपल अँड प्रॅक्‍टिस' या दोन खंडातील ग्रंथात येथील प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांच्या दोन अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश झाला आहे.

  • अमेरिकेतील जेपी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे जॉन कॉर्सन आणि रॉबीन विल्यम्सन संपादक आहेत.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • विल्यम एस. नौल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ : ०१ जून १९१७

  • जस्टिन हेनिन-हार्डिन, बेल्जियमची टेनिस खेळाडू : ०१ जून १९८२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • नीलम संजीव रेड्डी, भारतीय राष्ट्रपती : ०१ जून १९९६

  • गो.नी. दांडेकर, मराठी कादंबरीकार : ०१ जून १९९८

ठळक घटना

  • ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ या संस्थेचा प्रारंभ. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना : ०१ जून १९४५

  • “स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” लोकमान्य टिळकांची अहमदनगर येथे घोषणा : ०१ जून १९४६

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.