वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानं भारतानं ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-०नं आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं ५० षटकात ४ गडी गमावून २५१ धावांपर्यंत मजल मारली. धोनीनं अर्धशतक झळकावत नाबाद ७८ धावा केल्या तर रहाणेनं ७२ धावा केल्या.
२५२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १५८ धावावर गारद झाला.
फिरकीपटू कुलदीप यादव आणि आर अश्विननं यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते, माजी आमदार पाशा पटेल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली.
शेतमालाचा उत्पादन खर्च काढणे, त्या संदर्भात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारशी करण्याचे काम राज्य आयोग करीत असतो.
राज्य शेतमाल समिती आतापर्यंत राज्यात अस्तित्वात होती. आयोगाची स्थापना पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
शरद जोशी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार राहिलेले पाशा पटेल हे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने आग्रही राहिले आहेत.
तसेच या मागणीसाठी २०११ मध्ये त्यांनी लातूर ते नागपूर अशी २४ दिवसांची पदयात्रा काढली होती. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे.
३० जून रोजी मध्यरात्री बरोबर १२ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
तसेच त्या बरोबरीने मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) द्रविडची भारत 'अ' व १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेटला महत्त्व देताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भारताचा माजी कर्णधार 'द वॉल' राहुल द्रविड याने देशाला अधिक महत्त्व देताना भारताच्या 'अ' आणि अंडर-१९ संघ प्रशिक्षकपदासाठी आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाच्या प्रशिक्षक पदावरुन राजीनामा दिला.
तसेच याआधी २०१५ मध्ये द्रविडला या दोन्ही संघांच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी मायदेशात व विदेशामध्ये चमकदार कामगिरी केली होती.
पुढील दोन वर्षांपर्यंत द्रविड भारत 'अ' आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत राहिल.
स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी करसुधारणा मानली जाणारी, देशातील असंख्य करांना एकत्रित करणारी वस्तू व सेवा करप्रणाली (जीएसटी) शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली.
एका नवव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत. हे यश कोण्या एका पक्षाचे किंवा सरकारचे नाही, तर हा आपल्या सामुदायिक प्रयत्नांचा परिपाक आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले. या करप्रणालीमुळे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला फायदा तसेच अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था प्राप्त होणार असल्याचा दावा सरकार करत आहे.
मध्यरात्री जीएसटीच्या लोकार्पणावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, अर्थमंत्री अरूण जेटली आणि इतर कॅबिनेट मंत्री, संसद सदस्य उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावल्यामुळे विरोधकांमध्ये फुट पडल्याचे दिसून आले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने बहिष्कार टाकला होता.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जर अडथळ्याविना आणि कार्यक्षमपणे जीएसटी संपूर्ण देशात लागू झाला तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल.
अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या CanSat २०१७ या जागतिक स्पर्धेत उत्तराखंडमधील पेट्रोलियम आणि ऊर्जा अध्ययन विद्यापीठातील (UPES) विद्यार्थ्यांच्या चमूने अव्वल स्थान मिळवले आहे.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी उत्तुंग कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही जागतिक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जगभरातील विद्यार्थ्यांचे ३९ चमू सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकत भारतीय विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.
अमेरिकन अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी (AAS) आणि अमेरिकन इन्स्टिट्युट ऑफ एअरोनॉटिक्स अॅण्ड अॅस्ट्रोनॉटिक्स (AIAA)तर्फे घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्राध्यापक उगर गुवेन आणि जोजिमस लबाना यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक दिवस
महाराष्ट्र कृषी दिन.
प्रजासत्ताक दिन : घाना.
जन्म, वाढदिवस
कल्पना चावला, अंतराळवीर : ०१ जुलै १९६१
वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री : ०१ जुलै १९१३
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार : ०१ जुलै १९९४
सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता : ०१ जुलै १९७१
ठळक घटना
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना : ०१ जुलै १९६१
पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली : ०१ जुलै १९५५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.