नवी दिल्ली : संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणार नाहीत. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी सरकार रोखे काढण्याबाबत सकारात्मक दिसत आहे.
सुरुवातीला या अर्थसंकल्पाद्वारे सरकार मध्यमवर्ग, शेतकरी, काही प्रमाणात व्यापारी यांना खुश करेल, असा अंदाज व्यक्त होत होता. पण शेतकरी व ग्रामीण भाग यांवरच सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे दिसत असून, अन्य वर्गांना फार काही देण्याच्या मनस्थितीत सरकार दिसत नाही.
डावोसमध्ये मोदी म्हणाले होते की, ‘या क्षणी तुम्ही सारे जण माझ्यावर खूश आहात असे दिसते, पण अर्थसंकल्प मांडल्यानंतर हे चित्र असेच असेल का तेही पाहुया!’ उद्योगक्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प कठोर असेल, असा इशाराच त्यांनी दिला होता.
सरकार अस्वस्थ - यंदा अर्थसंकल्पाबाबत मोदी अतिशय गंभीर आहेत. त्यांनी १ जानेवारीपासूनच अर्थमंत्री व अधिकाºयांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या. मोदी यांनी टीव्ही चॅनेल्सला दिलेल्या मुलाखती, डावोसमध्ये केलेले भाषण, अर्थमंत्री जेटली यांनी दिलेल्या मुलाखती आणि वक्तव्ये यातून अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकडे सरकारचा कल असेल, असे दिसते.
क्रूड आॅइलच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार अस्वस्थ असून, त्याचा येत्या वर्षभरात अर्थव्यवस्थेवर मोठा फटका बसण्याची भीती सरकारला आहे. परिणामी सर्वांना निष्कारण खुश करू नये, असा कल दिसत आहे.(source :Lokmat)
नवी दिल्ली - अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि देशातील कोट्यवधी मुलींचे प्रेरणास्थान असलेल्या कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन आहे. कल्पनाने न केवळ अंतराळ विश्वात यश मिळवलं होतं तर तिनं तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वप्न जगायला लावणं शिकवलं, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा दिली.
या अवकाशपरीने वयाच्या 41व्या वर्षी पहिली अंतराळ यात्रा केली आणि दुर्देवानं ती कल्पनासाठी अखेरची ठरली. 'मी अंतराळ विश्वासाठी जन्मले आहे. प्रत्येक क्षण मी या विश्वासाठीच घालवला आहे आणि या विश्वासाठीच मी मरणार', तिचे हे वाक्य अखेर खरे ठरले.
घरात सर्वात लहान होती कल्पना - हरियाणातील कर्नाल येथे 17 मार्च 1962 साली कल्पनाचा जन्म झाला. बनारसीलाल चावला आणि संज्योती हे तिचे आईवडील. चार भावंडांमध्ये कल्पना सर्वात लहान. घरातील सर्व मंडळी लाडाने तिला 'मॉन्टो' म्हणून हाक मारायचे. कल्पनाचे शालेय शिक्षण कर्नालमधील टागोर बाल निकेतन विद्यालयमध्ये झाले.
इयत्ता आठवीमध्ये असताना तिने आईवडिलांकडे इंजिनिअर बनण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कल्पनाने डॉक्टर किंवा शिक्षिका व्हावं, असे वडिलांना वाटायचे. लहानपणापासून कल्पनाला अंतराळयान आकाशात कसं झेपावते, स्थिरावते?, मी अंतराळयानातून उडू शकते का?, असे प्रश्न पडायचे. पण तिचे वडील हसून या गोष्टी टाळायचे, असे कल्पनाचे नातेवाईक सांगतात. (source : Lokmat)
वॉशिंग्टन- भारतासह जगभरातील देश रोजगारनिर्मिती कशी करायची या आव्हानाचा सामना करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्पयांनी मात्र आपण सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरात 24 लाख रोजगार निर्माण केल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या स्टेट ऑफ युनियन अॅड्रेस या भाषणात त्यांनी ही माहिती जाहीर केली.
डोनल्ड ट्रम्प यांच्या भाषणावेळेस काँग्रेसच्या आत आणि बाहेरही त्यांना मोठा विरोध होत होता. ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले, अमेरिकेचे स्वप्न सत्यात आणण्याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणतीही वेळ चांगली असू शकत नाही.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करसुधारणा, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, स्थलांतर नियमसुधारणा, राष्ट्रीय सुरक्षा अनेक विषयांवर मत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये सध्या अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.(source : Lokmat)
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प 2018मध्ये जेटलींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'कॅशलेस इंडिया' योजना वाढवण्याची जबाबदारी आहे. 2016मध्ये नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था वाढवायची असल्याचे अनेकदा सरकारकडून सांगण्यात आले.
मोदी सरकारकडून आतापर्यंत 30 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त कित्येक सोयीसुविधांना आधार कार्डसोबत जोडण्यात आले आहे आणि याद्वारे काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यासोबतच अर्थव्यवस्थाच कॅशलेस बनवण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, कॅशलेस प्रणालीत लागणा-या शुल्काच्या कारणामुळे लहान व मध्यम व्यावसायिक आणि शहरातील नागरिकांकडून योग्य असा प्रतिसाद मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर, कॅशलेस प्रणालीला चालना देण्यासाठी त्यावर लागणारे सरकारकडून शुल्क हटवण्यात येईल व कशलेस व्यवहारावर इन्सेन्टिव्हपण देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(source :Lokmat)
कानपूर- आपल्याकडील पैसे सुरक्षित रहावेत यासाठी आपण बँकेत पैसे ठेवत असतो. आपला पगार, इतर गुंतवणूक सर्वकाही बँकेच्या माध्यमातून केलं जातं. पण एक अशीही बँक आहे जिथे पैशांच्या ऐवजी अस्थी जमा केल्या जातात. गंगा नदी स्वच्छ करण्याचा विडा उचललेल्या काही लोकांनी ही बँक सुरू केली आहे.
या बँकेत अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नाही. ही बँक खास अस्थी ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. या बँकेतील लॉकरमध्ये अस्थी ठेवणारी व्यक्ती एका विशिष्ट काळासाठी त्या बँकेत मृतांच्या अस्थी ठेवू शकते. व त्यानंतर त्यांच्या सुविधेनुसार तेथून ते अस्थी घेऊन जाऊ शकतात व इच्छेनुसार अस्थींच विसर्जन करू शकता.
कानपूरच्या कोतवाली स्टेशन अंतर्गत बनलेल्या भैरव घाटमध्ये स्मशानभूमीच्या जवळच ही कलश बँक असून 2014मध्ये युग दधीची देहदान संस्थेचे संस्थापक मनोज सेंगर नावाची व्यक्ती या बँकेचं काम पाहते.
मनोज सेंगर यांनी म्हंटलं,'लोक आधी मृतदेहाला अग्नी देतात त्यांनी अर्धी जळालेली लाकडं, अर्धवट जळालेला मृतदेह गंगेत विसर्जित करतात ज्यामुळे गंगा अस्वच्छ होते. काही लोक अस्थी गोळा करतात पण त्याचं लगेच विसर्जन करत नाही. जास्त लोक अस्थी अलाहाबादच्या संगमात विसर्जित करण्याची इच्छा ठेवतात. अशा लोकांसाठी ही बँक तयार करण्यात आली आहे. यामुळे गंगाही स्वच्छ राहील व लोकांची इच्छाही पूर्ण होईल'.(source :Lokmat)
आगामी लोकसभा निवडणुकीच्यावेळी माझी राजकीय निवड काय असेल, हे येणारा काळच स्पष्ट करेल, असे वक्तव्य भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी सुरू केलेल्या ‘राष्ट्र मंचा’च्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपामध्ये माझे विचार मांडण्यासाठी कोणतेही व्यासपीठ नसल्यामुळे आपण ‘राष्ट्र मंचा’ची निवड केल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
यावेळी सिन्हा यांना प्रसारमाध्यमांनी, भाजपा तुम्हाला आगामी लोकसभेसाठी तिकीट देणार नाही हे खरे आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर सिन्हा यांनी तुम्ही अशी शंकाच का घेता, असा प्रतिप्रश्न केला. शत्रुघ्न सिन्हा सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आले आहेत.
त्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याविषयी बोलताना सिन्हा यांनी म्हटले की, मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळीही अशीच चर्चा सुरू होती. मात्र, शेवटच्या उमेदवारी यादीत माझे नाव जाहीर झाले. त्यामुळे आता भाजपा मला उमेदवारी देणार किंवा नाही, हा मुद्दाच उरलेला नाही.
त्यांनी मला उमेदवारी दिली नाही तरी त्यामागील कारणांचा विचार झाला पाहिजे. गेल्या निवडणुकीत मला मिळालेल्या मतांची टक्केवारी जास्त होती. दुसरा मुद्दा म्हणजे पक्षाने उमेदवारी दिली तरी मी ती स्वीकारेन की नाही किंवा मी दुसरीकडून निवडणूक लढवून शकेन. या सगळ्याची उत्तरे वेळ आल्यावरच मिळतील. सध्यातरी मला त्याची आजिबात चिंता नाही, भीती तर बिलकूलच नाही, असे सिन्हा यांनी सांगितले.(source :loksatta)
जागतिक दिवस
जागतिक बुरखा/ हिजाब दिन.
महत्वाच्या घटना
१६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.
२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
२०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
जन्म
१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१९१२: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
१९१७: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
१९२९: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
१९३१: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
१९७१: क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.
मृत्यू
१९७६: क्वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)
१९९५: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन. (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
२००३: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९६१)
२०१२: संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.