चालू घडामोडी - ०१ ऑगस्ट २०१७

Date : 1 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘टीईटी’तील मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या २३० चुका :
  • शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुध्दलेखनाच्या विक्रमी २३० चुका झाल्याची बाब येथील विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आता परीक्षा झालेली आहे. 

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवार २२ जुलैला राज्यातील १ हजार ३६२ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली.

  • पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या ‘टीईटी’च्या मराठीच्या १५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शुध्दलेखनाच्या विक्रमी २३० चुका आढळून आल्या.

  • ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाचे नाव जेव्हा मीजात चोरली होती, असे छापले आहे, कैऱ्या ऐवजी कैन्या, त्याला ऐवजी ल्याला, पुढील ऐवजी पुदील, उताऱ्या ऐवजी उताण्या, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे नाव तखर्डकर असे छापले आहे. 

सुवर्ण कामगिरी करूनच निवृत्ती : बोल्ट
  • बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर जागतिक स्पर्धेत ११ विजेतेपदांची कमाई केली आहे. त्याने २००९च्या जागतिक स्पर्धेत १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याने २००८, २०१२ व २०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत सोनेरी कामगिरी केली आहे.

  • अ‍ॅथलेटिक्समधील स्पर्धात्मक कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी जागतिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचेच माझे ध्येय आहे व हे ध्येय साकारण्यासाठीच मी खूप तयारी केली आहे, असा निर्धार वेगाच्या दुनियेचा सम्राट उसेन बोल्टने केला आहे.

  • बोल्टने मोनॅको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटर धावण्याची शर्यत ९.९५ सेकंदांत पार केली होती. येथील स्पर्धेत तो २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार नाही.

प्रा. संजय खडसे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर :
  • बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांना सन २०१६-१७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • अकोला व बाळापुर येथे केलेल्या लोकाभिमुख कामाची व सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेतली असून महसूलदिनी ०१ ऑगस्टला अमरावती येथे विभागीय आयुक्त यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

  • तहसीलदार असताना त्यांना २०१२-१३ मध्ये देखील सर्वोत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाला होता, प्रा. संजय खड्से यानी मिशन दिलासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत केली. प्रशासनामध्ये संगणकाचा वापर करून प्रशासन गतिमान केले.

  • सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक अतिशय तत्परतेने करतात स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकात प्रा. खडसे लोकप्रिय आहेत.

पंतप्रधान मोदी आसामच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील पुराची पाहणी करण्यासाठी आसामला रवाना झाले असून सोमवारी मोदींनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना ०२ लाख रूपयांची मदत जाहीर केली.

  • आसाममधील पूरग्रस्त भागाची मोदी पाहणी करतील तसंच तेथील बचावकार्याचाही मोदींकडून आढावा घेतला जाणार आहे, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केलं आहे

  • पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुरामध्ये गंभीर जखमी झालेल्या लोकांना मोदींनी ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

आधार लिंक पॅनशी करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली :
  • आयटी रिटर्न फाईल करण्याची ३१ जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत ०५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे, यासोबतच पॅनशी आधार लिंक करण्यासाठीही ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • अर्थ मंत्रालयाच्या वेबसाईटवर (www.incometaxindiaefiling.gov.in) लॉग ऑन करुन पॅनशी आधार लिंक करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र आता हे सर्व अडथळे दूर करण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलं आहे. नावातील बदलांमुळे पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यात अडथळे येत आहेत.

  • आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?

  • आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

कामगार नेते नाना क्षीरसागर यांचे निधन : ३१ जुलै रोजी
  • ज्येष्ठ कामगार नेते नाना क्षीरसागर (वय ६२ वर्षे) यांचे ३१ जुलै रोजी निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र रिक्षा सेना, महाराष्ट्र हमाल सेना, हातगाडी पथारी संघटना, महाराष्ट्र टेम्पो सेना अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी काम उभे केले होते.

  • नाना यांचे पूर्ण नाव किशोर माधव क्षीरसागर असे होते. ते गुरुवार पेठेतील फुलवाला चौकामध्ये राहत होते.

  • नानांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते.

  • तसेच यासोबत डॉ. बाबा आढाव यांच्या बांधकाम कामगार पंचायतीचेही काही काळ काम केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र संघटना सुरु केल्या, विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संघटना त्यांनी सुरु केल्या.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी : भारत

  • राष्ट्र दिन : बेनिन, स्वित्झर्लंड

  • सैन्य दिन : अँगोला, चीन, लेबेनॉन

जन्म, वाढदिवस

  • अण्णाभाऊ साठे, मराठी लेखक व समाजसुधारक : ०१ ऑगस्ट १९२०

  • मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू : ०१ ऑगस्ट १९१०

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक : ०१ ऑगस्ट १९२०

  • निरद चौधरी, इंग्लिश लेखक : ०१ ऑगस्ट १९९९

ठळक घटना

  • मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला : ०१ ऑगस्ट १९९६

  • अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली : ०१ ऑगस्ट १९५७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.