चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ जुलै २०२१

Date : 31 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत-चीन यांच्यात आज चर्चेची १२ वी फेरी :
  • भारत आणि चीन यांच्यात आज, शनिवारी लष्करी पातळीवरील चर्चेची बारावी फेरी होणार आहे.  चर्चेला सकाळी साडेदहा वाजता चीनकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोल्दो या ठिकाणी सुरुवात होईल.

  • चर्चेत हॉट स्प्रिंग आणि गोगरा येथे असलेल्या चिनी सैनिकांच्या छावण्या हा प्रमुख विषय असेल. तेथून चीनने माघार घेतलेली नाही.

  • चीनने अलीकडेच पूर्व लडाखमध्ये काही ठिकाणी घुसखोरी केल्यामुळे या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमेवरील अनेक संघर्ष बिंदूवर चीनने अतिक्रमण करून तेथे कुमक वाढवली आहे.

‘एच १ बी’ व्हिसासाठी दुसरी सोडत :
  • अमेरिकेत वास्तव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एच १ बी या व्हिसासाठी दुसरी  सोडत काढण्यात येणार आहे. अशा प्रकारे दुसरी सोडत काढण्याची ही दुर्मीळ घटना आहे. एच १ बी व्हिसा हा माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यात लोकप्रिय आहे.

  • सोडत पद्धतीने  या व्हिसासाठी आलेले अर्ज मंजूर केले जात असतात. आता दुसरी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने ज्यांना पहिल्या सोडतीत संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या सोडतीत संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे, की एच १ बी व्हिसासाठी संगणकाच्या मदतीने पहिली सोडत यादृच्छिक पद्धतीने काढण्यात आली होती, पण त्यात एच १ बी व्हिसा पुरेशा संख्येने दिले गेले नाहीत त्यामुळे एच १ बी व्हिसा आणखी काही प्रमाणात देण्यासाठी त्यातीलच उर्वरित अर्जातून दुसरी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या भारत व इतर देशातील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात.

मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार :
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाल्याची माहिती कु लगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात येणार आहे.

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी केली आहे. यात सोलापूर ही जन्मभूमी व कर्मभूमी असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊ न त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी चितमपल्ली ठरले आहेत. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • रविवारी (१ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता विद्यपीठाच्या मुख्य सभागृहात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.  या कार्यœमास भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम यांची ऑनलाइन माध्यमातून प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार :
  • वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांना राज्यपालांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

  • मुंबईच्या राजभवनात आयोजित एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. बोरले यांनी स्वीकारला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील निवडक डॉक्टरांचा या समारंभात गौरव झाला.

  • डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया व क्लाउड फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिल्या जातात. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर एका छोटेखानी समारंभात हा पुरस्कार वितरन सोहळा घेण्यात आला होता. आयोजक संस्थेचे डॉ. गिरिष कामत व डॉ. देवेंद्र हंबरडीकर यांनी प्रास्ताविकातून पुस्काराची भूमिका मांडली. तर राज्यपाल कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात महाराष्ट्राने आदर्श प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

  • सोहळ्यात डॉ. बोरले यांना तसेच डॉ. डी.जे. आरवाडे, वैद्य गोपालकृष्ण अंधनकर व डॉ. राजाराम जगताप यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. बोरले हे गत चाळीस वर्षापासून दंत चिकित्सा विषयात सेवा देत आहेत. सेवाग्रामच्या रूग्णालयात सेवेची सुरूवात झाल्यानंतर त्यांनी सावंगीच्या रूग्णालयात पदभार सांभाळला.

  • दोन तपाहून अधिक काळ कार्य केल्यानंतर त्यांना व्यवस्थापनाने कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविली. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रावर विविध पुस्तके लिहली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रहीय वैद्यकीय मासिकात त्यांचे संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहे. विद्यापिठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी डॉ. बोरले यांचे अभिनंदन करतांना विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा हा यथोचित सन्मान असल्याचे नमूद केले.

CBSE - बारावीच्या निकालात मुलींची बाजी; ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपर्यत गुण :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं.

  • यावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण, यावर्षी टॉपर्सची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. यावेळी एकूण १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय विद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

  • यावेळीच्या १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५० हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७० हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २०२० मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

  • Cbseresults.nic.in, cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. या व्यतिरिक्त, विद्यार्थी digilocker.gov.in, UMANG App आणि SMS द्वारे सीबीएसई १२ वीचा निकाल पाहू शकतात.

३१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.