देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या या वादावर पडदा पडला. निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. या खटल्याचा निकाल देणारे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.
देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला होता. त्यानंतर दीर्घकाळ चाललेल्या या वादावर पडदा पडला. निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीलाही सुरूवात झाली आहे. या खटल्याचा निकाल देणारे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रथमच यावर भाष्य केलं आहे.
माला दीक्षित लिखित ‘अयोध्या से अदालत तक भगवान श्रीराम’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन समारंभाला व्हिडीओच्या माध्यमातून अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मनोगत व्यक्त केलं. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले,”४० दिवस ज्येष्ठ आणि वरिष्ठ वकिलांच्या पीठानं या खटल्या मोठं सहकार्य केलं आणि हा खटला अभूतपूर्व असाच होता.
सर्वकष मुद्यांवर ठोस पुरावे आणि ऐतिहासिक नोंदीवर हा निकाल देण्यात आला. अंतिम निकाला देण्याचं काम अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होतं. या खटल्यात प्रत्येक मुद्यांवर टोकाचा युक्तीवाद झाला आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पूर्ण ताकदीनं व इच्छाशक्तीनं आपले मुद्दे मांडले होते,” असं रंजन गोगोई म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी ११ वाजता, ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचा हा ६८ वा भाग होता. या भागात मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं.
“पोषण (न्यूट्रिशन) याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहोत, किती खात आहोत, किती वेळा खात आहोत. पोषण याचा खरा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे हा असतो. आपल्यात एक म्हण आहे ‘यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी आज, ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं? त्याची nutrition value किती? याची सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय मोदी यांनी आपल्या संबोधनात, लहान मुलांसाठी तयार करण्यात येणारी खेळणी जास्तीत जास्त प्रमाणावर स्वदेशी बनावटीची असावीत असं मत व्यक्त केलं. तसे झाल्यास भविष्यात भारत देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) एप्रिल ते जून या तिमाहीचे सोमवारी जाहीर होणारे आकडे भारताची वाटचाल मंदीकडे सुरू असल्याचे निदर्शक ठरण्याची शक्यता आहे. सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपी आक्रसला आहे. हीच परिस्थिती जुलै – सप्टेंबर या तिमाहीतही कायम राहण्याची शक्यता आहे.
स्थानिक पातळीवरी लागोपाठचे टाळेबंदीचे टप्पे आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचा जोरदार फटका बसल्याने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांत आर्थिक व्यवहारांना फार मोठय़ा प्रमाणावर खीळ बसली. त्यामुळे पहिल्या तिमाहीसाठी ‘जीडीपी’ सरासरी २० टक्के आक्रसत असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
एप्रिल ते जून या कालावधीसाठीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) सोमवारी जाहीर करणार आहे. भारताने १९९६ साली तिमाही आकडेवारी जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासूनचे हे सर्वात धक्कादायक आकडे असू शकतात.
जगातील सर्वात मोठय़ा २० अर्थव्यवस्थांपैकी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत, जूनला संपलेल्या तिमाहीत सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली. आर्थिक वाढीत २१.७ टक्क्य़ांची वार्षिक घट हे त्या देशातील सर्वात मोठय़ा मंदीचे निदर्शक आहे.
चीनचे समुद्रातील धाडस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलासाठी ६ पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या ५५ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
अत्याधुनिक लष्करी साधनसामुग्री देशातच तयार करून त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विदेशातील बडय़ा संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास देशी कंपन्यांना परवानगी देणाऱ्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत या पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे. ‘
पी-७५’ असे नाव ठेवण्यात आलेल्या या महाप्रकल्पाकरिता, या पाणबुडय़ांच्या तपशिलासारखी प्राथमिक कामे आणि प्रस्तावाबाबतची विनंती जारी करण्यासाठीची औपचारिकता संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्या वेगवेगळ्या चमूंनी पूर्ण केली आहे. आरपीएफ ऑक्टोबपर्यंत जारी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि. या २ भारतीय शिपयार्ड व ५ विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.
बुद्धिबळ विश्वात जगज्जेतेखालोखाल सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाड स्पध्रेत भारताने रविवारी रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद पटकावले. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद, जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवाबरोबरच, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन अशा युवा बुद्धिबळपटूंच्या असीम ऊर्जेला मिळालेली विदिथ गुजरातीच्या नेतृत्वाची साथ ही भारताच्या कामगिरीची निसंशय वैशिष्टय़े ठरली.
अंतिम लढतीत भारताचा मुकाबला बलाढय़ रशियाशी होता. पहिला सामना ३-३ असा बरोबरीत सुटल्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. या सामन्यात कोनेरु हम्पीचा पराभव झाला, परंतु दिव्या देशमुख जेतेपदाच्या मार्गावर होती. मात्र दिव्या देशमुख तसेच निहाल सरीनची इंटरनेट जोडणी अचानक खंडित झाली आणि वेळेवर चाली पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जाहीर झाले. दुसऱ्या सामन्यात अशा प्रकारे भारत १.५-४.५ पराभूत झाला होता. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडे (फिडे) याविषयी अपील केले. ते ग्राह्य़ धरले गेले आणि फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांनी भारत व रशियाला सहविजेते घोषित केले.
भारताचे हे पहिले ऑलिम्पियाड अजिंक्यपद. या स्पध्रेत भारताने गतविजेत्या चीनवर ४-२ अशी मात केली होती. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरलेल्या विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व समर्थपणे केले. विश्वनाथन आनंद, पेंटाल्या हरिकृष्ण असे मातब्बर संघात असूनही हा मान विदिथला मिळाला होता.
यंदा कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑनलाइन खेळवले गेले. त्यामुळे खुला गट व महिला गट अशी स्वतंत्र विभागणी नव्हती. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला. भारतात अनेक युवा बुद्धिबळपटू उदयाला येत असून या बदलाचा फायदा त्यामुळे भारताला झाला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.