चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मे २०२०

Date : 30 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“अपरिमित यातना सोसल्या”, मोदींनी देशवासियांना संबोधून लिहिलेल्या पत्रात स्थलांतरितांचा उल्लेख :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत असून आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पत्र लिहिलं आहे. या पत्रात नरेंद्र मोदींनी गेल्या एक वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून वेगाने विकास करत असल्याचं सांगताना स्थलांतरित मजूर, कामगारांचाही उल्लेख केला आहे.

  • करोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. सोबतच मोदींनी यावेळी भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था सुरळीत करुन जगासमोर एक उदाहरण ठेवत ज्याप्रमाणे करोनाशी लढा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं तसंच पुन्हा एकदा करणार असल्याचंही सांगितलं आहे.

  • “संकटाच्या या काळात कोणालाही त्रास झाला नाही असा दावा करणं चुकीचं ठरेल. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटय़ा-छोटय़ा उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकाऱ्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत,” असं नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे.

उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अंतिम परीक्षांचा निर्णय दोन दिवसांत :
  • उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत (वैद्यकीय शिक्षण वगळून) विद्यार्थ्यांचे आरोग्य व करिअर या दोन्हींचा विचार करून राज्य सरकार येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करेल, याबाबत विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, ताण घेऊ नये, त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, विद्यार्थी हिताचाच निर्णय होईल, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केली.

  • राज्यमंत्री तनपुरे यांनी आज, शुक्रवारी नगरमध्ये  ही माहिती दिली. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काय शिफारसी केल्या आहेत, याची माहिती घेतली जाईल, त्यावर चर्चा करून दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने अहवाल दिला आहे, या अहवालात काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत, त्याबाबत दिशा ठरवून निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक अशा सर्वाशी चर्चा करणार आहे, त्याचा अहवाल आज प्राप्त होण्याची शक्यता आहे, ऑनलाइन परीक्षा घेऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे, कारण ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी, यंत्रणा नसते, त्यातून विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, अशी त्यामागची भावना आहे,से राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.

आणखी दोन आठवडे :
  • टाळेबंदीच्या संभाव्य मुदतवाढीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

  • टाळेबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. या कालावधीत देशभर विविध आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली. टाळेबंदीच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात कोणत्या व्यवहारांना मुभा द्यायची यावर केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे.

  • देशभरात २४ मार्च, १५ एप्रिल, ३ मे आणि १७ मे अशी चार वेळा टाळेबंदी जाहीर केली गेली. या काळात करोनासंदर्भातील सर्व निर्णय राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत घेण्यात आले. टाळेबंदीच्या संभाव्य पाचव्या टप्प्यात या कायद्याची अंमलबजावणी कायम ठेवायची की, राज्यांना अधिकार द्यायचे यावर केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने हा कायदा लागू न केल्यास करोनासंदर्भातील सर्व निर्णय राज्यांना घ्यावे लागतील.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दूरध्वनीद्वारे सर्व मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेतली. महाराष्ट्राने जूनमध्येही टाळेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटक सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली असली तरी, अन्य राज्यांतील प्रवाशांना येण्यास मनाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाने दिल्लीची सीमा बंद केली आहे.

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन :
  • छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अजित जोगी ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ९ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  • मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. काही दिवसांनी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर ते कोमात गेले होते. आज त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ANI ला दिली आहे.

  • कोण होते अजित जोगी - राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.

अर्थबुडी :
  • करोना आणि टाळेबंदीच्या आरंभीच्या कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेचा निराशाजनक प्रवास मावळत्या वर्षांपूर्वीच सुरू झाल्याचे शुक्रवारच्या सरकारच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट झाले.

  • गेले वित्त वर्ष, २०१९-२० मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ४.२ टक्के  असे गेल्या तब्बल ११ वर्षांच्या तळातील नोंदले गेले आहे, तर आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत देशाचा विकास दर घसरून ३.१ टक्के  राहिला.  करोनाबाधितांची वाढती संख्या समोर येत असताना मार्चच्या शेवटी देशात टाळेबंदीचा पहिला टप्पा लागू झाला. चौथ्यांदा वाढविण्यात आलेला टाळेबंदीचा टप्पा आणखी वाढण्याची भीती आहे.

  • चालू आर्थिक वर्षांच्या विकासदराबाबत अर्थतज्ज्ञांमध्ये भिन्न मते असली तरी गुंतवणूक आणि वस्तू व सेवेसाठीची ग्राहकांची मागणी रोडावल्याचे शेवटच्या तिमाही तसेच एकू णच गेल्या आर्थिक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीमध्ये देशाचा विकास दर ५.७ टक्के, तर २०१८-१९ आर्थिक वर्षांत ६.१ टक्के होता. यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेने २००८-०९ मध्ये ३.१ टक्के  अशी किमान अर्थ हालचाल नोंद केली होती. विशेष म्हणजे हा अमेरिके तील सब प्राइमरूपी जागतिक मंदीचा कालावधी होता.

३० मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.