चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जून २०२१

Date : 30 June, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश :
  • एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. स्थलांतरित मजुरांना कोविड १९ स्थिती कायम असेपर्यंत कोरडा शिधा स्वस्त धान्य दुकानांमार्फत उपलब्ध करावा, असा आदेशही केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

  • न्या. अशोक भूषण व न्या. एम.आर शहा यांनी तीन कार्यकर्त्यांच्या विनंतीवर हे आदेश जारी केले असून त्यात केंद्र व राज्य सरकारांना अन्न सुरक्षा, रोख हस्तांतर व इतर कल्याणकारी योजना लागू करण्यास सांगितले आहे. संचारबंदी व टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांचे रोजगार गेले आहेत. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एक देश एक शिधापत्रिका योजना गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी असून त्यांना त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी शिधा उपलब्ध करून द्यावा. तिथे त्यांची शिधापत्रिका  कुठे नोदली गेली आहे याचा विचार करू नये.

  • न्यायालयाने केंद्राला असा आदेश  दिला की, नॅशनल इनफॉर्मेटिक सेंटरने असंघटिक कामगारांना लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात मदत करावी. सर्व कल्याणकारी योजना ३१ जुलैपासून लागू करण्यात याव्यात.  राज्ये व केंद्रशासित प्रदेश  यांनी स्थलांतरित कामगारांसाठी कोविड साथ सुरू असेपर्यंत सामूहिक स्वयंपाक योजना राबवावी , कामगारांना शिधा देण्यासाठी केंद्राने पुरवठा करावा. ३१ जुलैपर्यंत शिधासह सर्व योजना लागू करण्यात याव्यात. आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठीचे कंत्राटदार व आस्थापनांची रोजगार व सेवा नियम कायदा १९७९ अन्वये नोंदणी करण्यात यावी. 

‘स्पेलिंग बी’च्या अंतिम फेरीत ११ पैकी ९ भारतीय वंशाचे विद्यार्थी :
  • अमेरिकेच्या स्पेलिंग बी स्पर्धेत यंदा भारतीय अमेरिकी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून एकूण ११ स्पर्धकात नऊ जण हे भारतीय अमेरिकी विद्यार्थी आहेत. गेली काही दशके ही स्पर्धा घेतली जात असून भारतीय वंशाच्या मुलांनी नेहमीच या स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी केली आहे.

  • २०२१ मधील स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेची अंतिम फेरी ८ जुलैला होत असून ११ जण अंतिम फेरीत आहेत. त्यातील नऊ भारतीय अमेरिकी आहेत. व्यक्तिगत अंतिम फेरीत मुलांना अत्यंत अवघड शब्दांचे स्पेलिंग विचारले जातात.

  • या स्पर्धेचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल दुर्निल यांनी सांगितले की, २०२१ स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेल्या उमेदवारांचे आपण स्वागत करतो. अत्यंत कठीण परिश्रम करून ते या फेरीत पोहोचले आहेत. देशपातळीवर आधीच्या फेऱ्यात २०९ जण राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरले होते. त्यांनी अनेक वर्षे कष्ट करून हे आव्हान स्वीकारले होते.

कौतुकास्पद: आशा वर्कर ५७ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण :
  • स्वप्न साकारण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर ध्येयाला गवसनी घालने फार अवघड नाही. हे संगळ सातत्याने केलं तर यश हमखास पदरात पळतं, हे सिद्ध केलं आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं. या महिलेच्या कौतुकास्पद कामगिरीने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५७ वर्षीय आशा वर्कर ‘स्वर्णलता पती’ यांची कामगिरीने पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

  • खरं तर, बर्‍याच वेळा असे घडते की, काही लोक जीवनात अपयशी ठरल्यानंतर हार मानतात, परंतु सतत अपयशी ठरल्यानंतरही स्वर्णलता यांनी आपल्या परिश्रमांनी ध्येयाला गवसनी घातली. ज्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत. स्वर्णलता यांनी अनेकवेळा दहावीची परीक्षा दिली. त्या नापास होत होत्या. मात्र त्यांनी जीद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा परीक्षा दिली.

  • अखेल त्यांना यात यश मिळाले. भद्रकच्या भंडारीपोखरी ब्लॉकमधील कांती खेड्यातील रहिवासी असलेल्या स्वर्णलता यांचे हे यश गावातील इतर महिलांसाठी एक उदाहरण बनले आहे. घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे स्वर्णलता यांची शिकण्याची इच्छा असतांना ती अर्धवट राहिली होती.

ठरलं तर..! यंदाचा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ‘या’ देशात होणार :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल.

  • १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.

  • ‘या’ चार स्टेडियममध्ये होणार सर्व सामने - आयसीसीच्या म्हणण्यानुसार टी-२० वर्ल्डकपचे सर्व सामने यूएई आणि ओमानमधील ४ स्टेडियमवर होणार आहेत. यामध्ये दुबई, अबुधाबीचे शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान यांचा समावेश आहे.

३० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.