चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० जून २०२०

Date : 30 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘आयसीसी’ एलिट पंचांच्या यादीत भारताचे नितीन मेनन :
  • भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे. मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत.

  • आगामी २०२०-२१ हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे. ३६ वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, २४ एकदिवसीय आणि १६ ट्वेन्टी-२० लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

  • ‘आयसीसी’च्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत. ‘‘आयसीसीच्या जगातील मुख्य पंच आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळवावे, हे सुरुवातीपासून स्वप्न होते. अजूनही विश्वास बसत नाही,’’ असे मेनन यांनी सांगितले.

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार; जुलैपासून मानवी चाचणीला होणार सुरूवात :
  • देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

  • भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.

  • जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.

सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर १२ तासांमध्येच अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ निर्णय :
  • देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आधारे भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे.

  • यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मात्र या संदर्भात अ‍ॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे.

  • “अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन टिकटॉक हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने काल ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असं सरकारने सांगितलं होतं,” असे ट्विट एएनआयने केलं आहे.

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा :
  • दक्षिण चीन महासागरापासून लडाखपर्यंत दादागिरी करत असलेल्या चीननं आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या ५८ व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचं म्हटलं. दरम्यानस भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचंही म्हटलं.

  • चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतंही सीमांकन झालेलं नाही. चीनच्या या कृतीचा भूतातनं कडाडून विरोध केला आहे, “साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे,” असं भूताननं स्पष्ट केलं आहे.

  • इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीननं या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा केला. चीनच्या या प्रकल्पावा केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिली आहे.

३० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.