चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० डिसेंबर २०२०

Date : 30 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हरिकृष्णचे प्राथमिक फेरीतच आव्हान संपुष्टात :
  • प्राथमिक फे रीत नवव्या क्र मांकावर समाधान मानावे लागल्यामुळे चॅम्पियन्स बुद्धिबळ टूर एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेतील भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृ ष्णचे आव्हान संपुष्टात आले आहे.

  • हरिकृ ष्णने १० सामने बरोबरीत सोडवले, तर एक हार पत्करली. त्यामुळे त्याच्या खात्यावर फक्त पाच गुण जमा होते. मॅक्सिम व्हॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रोन्स) आणि डॅनिल दुबोव्ह (रशिया) यांच्या खात्यावरही तितके च गुण जमा होते. परंतु एकाही विजयाची नोंद न करता आल्यामुळे तो आगेकू च करण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेतील अव्वल आठ जणांनी बाद फे री गाठली.

  • भारताचा द्वितीय क्रमांकावरील बुद्धिबळपटू हरिकृष्णने नवव्या, १०व्या आणि ११व्या डावात अनुक्र मे लेव्ह अरोनियन, वेस्ले सो आणि टिमॉर रॅडजाबोव्हशी बरोबरी साधली. त्याने या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखून लक्ष वेधले होते.

फॅशन अवलिया पिअरे कारदँ कालवश :
  • फ्रेंच फॅशन डिझायनर पिअरे कारदँ यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स या संस्थेने प्रसारित केली आहे.

  • पिअरे कारदँ यांनी अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या लक्षवेधी संरचना सादर केल्या होत्या. त्यामुळे विसाव्या शतकातील ते सर्वात लोकप्रिय संरचनाकार तसेच फॅशन डिझायनर ठरले. कारदँ यांचे नाव आपल्याला मनगटी घडय़ाळांपासून बेडशीटपर्यंत अनेक वस्तूंवर दिसते. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही मोठी होती. १९७०-८० च्या दशकात त्यांच्या उत्पादनांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले.

  • १९९२ मध्ये त्यांना फाइन आर्ट्स अ‍ॅकॅडमीत स्थान मिळाले होते. संरचनाकार म्हणून त्यांचा उद्योग जगातही दबदबा होता. साठ वर्षांच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या वस्तूंच्या संरचना केल्या.

  • फॅशन, वेगवेगळ्या वस्तूंचे सुटे भाग, दागिने, सुवासिक द्रव्ये, फर्निचर, रंगभूषा अशा अनेक क्षेत्रात त्यांच्या रचनांची छाप दिसते. वेगवेगळ्या वस्तूंच्या संरचनात त्यांनी प्रयोगशीलता दाखवली.

चीनकडून क्षेपणास्त्र तैनात; पण भारतही सज्ज :
  • पूर्व लडाख क्षेत्रात चीनच्या हवाई दलाने क्षेपणास्त्रे आणि रडार यंत्रणा मोठय़ा प्रमाणावर तैनात केली आहे, मात्र भारताने कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत, असे हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

  • राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि हवाई सामथ्र्य यावर विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

  • चीनच्या लष्कराच्या सहकार्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने मोठय़ा प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि रडार यंत्रणा तैनात केली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

  • भारतानेही याचा मुकाबला करण्यासाठी तयारी केली आहे, लडाखमध्ये राफेल आणि मिग-२९ही सज्ज आहेत. चीनकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही दु:साहसाला उत्तर देण्यास भारत सज्ज आहे, असेही भदौरिया यांनी यावेळी सांगितले.

भारत-चीन सीमा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही - संरक्षणमंत्री :

 

  • देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनबरोबरच्या वादासंदर्भात एक महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चीनबरोबर लडाखमध्ये सुरू असलेल्या वादावर अद्याप काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे आहे तशीच परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे.

  • यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, चीनबरोबर चर्चा सुरू आहे. लवकरच आणखी एक सैन्यस्तरीय चर्चा होणार आहे. आतापर्यंत ज्या चर्चा पार पडल्या, त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. आता आहे तीच परिस्थिती कायम आहे, मात्र ती फारशी चांगली नाही. जर एखादा देश विस्तारवादाचे धोरण अवलंबवत असेल, तर भारताकडेही एवढी क्षमता आहे की, आपल्या जमिनीवर घुसण्यापासून त्या देशाला रोखू शकेल.

  • तसेच, भारत-चीनमध्ये प्रदीर्घ काळापासून सीमावाद सुरू आहे. चांगलं झालं असत हे वाद अगोदरच संपले असते. जर हे वाद संपुष्टात आले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमेवर सातत्याने आपल्याबाजूने पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र भारत देखील आपले सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. आम्ही कुणावर आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या सुविधांसाठी असं करत आहोत. असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय :
  • दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या श्रीलंकेला चार जणांना झालेल्या दुखापतींच्या मालिकेने हादरवले.

  • सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. श्रीलंकेने २ बाद ६५ धावसंख्येवर मंगळवारी डावाला सुरुवात केली. परंतु ४६.१ षटकांत १८० धावसंख्येवर त्यांचा डाव आटोपला.

  • अष्टपैलू धनंजय डीसिल्व्हा फलंदाजीला उतरू शकला नाही. श्रीलंकेकडून कुशल परेरा (६४) आणि वनिंदू हरंगा (५९) यांनी झुंजार फलंदाजी केली. लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, विआन मुल्डर आणि लुथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

३० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.