चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जून २०२०

Date : 29 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सहीत ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी :
  • पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता.

  • त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

  • काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता.

“नरेंद्र मोदी हे पेट्रोल डिझेलच्या किंमतीपेक्षा कमी वय असणारे पहिलेच पंतप्रधान” :
  • देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती मागील काही दिवसांपासून नवा वाढत आहे. करोना संकटात होत असलेल्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा मोदींना निशाणा बनवले आहे.

  • “नरेंद्र मोदी हे पेट्रोल डिझेलच्या किंमतीपेक्षा कमी वय असणारे पहिले पंतप्रधान बनले आहे”, असा उपहासात्मक टोला काँग्रेसनं लगावला आहे.

  • देशात करोनाचं संकट अजून थांबलेलं नाही. करोनाचा सामना करत असताना सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीलाही तोंड द्यावं लागत आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून दररोज टीका केली जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलवाढ परत घ्यावी, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केली होती. तसेच आज काँग्रेसनं सरकारविरोधात ठिकाणी आंदोलन केलं.

चीन-पाकिस्तानची चिंता वाढणारी बातमी, २७ जुलैला राफेलची पहिली तुकडी भारतात होणार दाखल :
  • कुठल्याही युद्धामध्ये गेमचेंजर ठरु शकणारी राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. हरणाच्या अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली तुकडी तैनात होईल. प्राथमिक माहितीनुसार, फ्रान्सच्या इस्ट्रेसवरुन चार ते सहा राफेल विमाने भारतात दाखल होतील. राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल.

  • सध्या चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची घडामोड आहे. राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश होणे, चीनसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण चीन-पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही फायटर विमान नाहीय. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

  • दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन भारतीय वैमानिकच हरयाणाच्या अंबाला बेसवर राफेल फायटर विमाने घेऊन येतील. फ्रान्स ते भारत प्रवासात फक्त यूएईमधील अल धाफ्रा एअर बेसवर ही विमाने काही वेळासाठी थांबतील.

२९ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.