जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा संसर्ग देशभरात अद्यापही वाढतच आहे. मात्र, एकीकडे जरी ही परिस्थिती असली, तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसागणिक भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये देशभरात ३/४(तीन चतुर्थांश) पेक्षा अधिक रुग्णांनी करोनावर मात केली असून, १/४(एक चतुर्थांश) पेक्षाही कमी सध्या अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, “मागील पाच महिन्यात देशभरात ३/४(तीन चतुर्थांश) पेक्षा अधिक रुग्णांनी करोनावर मात केली असून, १/४(एक चतुर्थांश) पेक्षाही कमी सध्या अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट (Test-Track-Treat) या त्रिसुत्रीची प्रभावीपणे अमंलबाजवणीमुळे, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) अधिक व मृत्यू दर कमी आहे.”
देशात गुरुवारी करोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला. २४ तासांमध्ये ७५ हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या ३३ लाखांच्याही पुढे पोहचली आहे. देशात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे.
जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे. आजतकनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सध्या करोना विषाणूचा कोणताही उपाय सापडलेला नाही. अनेक देशांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीवरही संशोधन सुरू आहे. तक काही देशांनी लस तयार केल्याचाही दावा केला आहे. तर दुसरीकडे करोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीदेखील उपयोगी असल्याचं समोर आलं होतं. याचदरम्यान देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे. रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
पहिली लस.
“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात अशाप्रकारची पहिली लस विकसित करण्याचं काम सुरू आहे. ही लस पूर्णत: स्वदेशी आहे. हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.
भारताच्या क्षमतेला आणि जागतिक शांततेला चालना देणे आणि त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्था अधिक स्थिर ठेवण्यास मदत करणे हे आपल्या सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या संरक्षणविषयक एका चर्चासत्रात मोदी पुढे म्हणाले की, संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर झाल्यास भारत मैत्रीचे संबंध असलेल्या अनेक देशांचा संरक्षणविषयक पुरवठादार होईल आणि भारतीय महासागरात सुरक्षाविषयक पुरवठादार म्हणून भारताच्या स्थानाला अधिक चालना मिळेल.
संरक्षणविषयक अनेक उपकरणांच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा उद्देश केवळ आयात कमी करणे हा नाही तर देशांतर्गत उद्योगालाही त्यामुळे चालना मिळणार आहे. आयातीवरील निर्बंधांच्या यादीत कालांतराने अनेक घटकांचा समावेश केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
दीर्घकाळ भारत संरक्षण क्षेत्रात जगातील सर्वात मोठा आयातदार देश होता, देशांतर्गत उत्पादनाकडे यापूर्वी पुरेसे लक्ष देण्यात आले नाही, त्यामुळे आपले सरकार खासगी क्षेत्रांचा जास्तीत जास्त समावेश करून देशांतर्गत उत्पादन आणि नवे तंत्रज्ञान विकसित करण्याला चालना देत आहे, असेही मोदी म्हणाले.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या ‘नीट’ व ‘जेईई’ या परीक्षा घेण्यास आणखी उशीर करण्याची परिणती हे शैक्षणिक वर्ष निर्थक ठरण्यात (झिरो अकॅडमिक इयर) होईल, तसेच या महत्त्वाच्या परीक्षांना एखादा जलद पर्याय शोधण्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावून त्याचे व्यापक परिणाम होतील, असे मत अनेक भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या (आयआयटी) संचालकांनी व्यक्त केले आहे.
कोविड-१९ ची प्रकरणे वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी जोर धरत असतानाच, या परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन आयआयटीच्या संचालकांनी केले आहे.
‘करोना महासाथीने आधीच अनेक विद्यार्थी व संस्थांच्या शैक्षणिक योजना विस्कळीत झाल्या आहेत आणि हा विषाणू लवकर जाईल असे दिसत नाही. आम्ही हे शैक्षणिक वर्ष निष्फळ ठरू द्यायला नको, कारण त्याचा अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर परिणाम होऊ शकेल’, असे आयआयटी रुडकीचे संचालक अजित चतुर्वेदी म्हणाले. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.
करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. NEET व JEE परीक्षाही केंद्र सरकारनं पुढे ढकलली होती. अखरे ही परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले असल्याचं दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
१ सप्टेंबरपासून घेण्यात येणाऱ्या NEET व JEE परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. शिक्षणमंत्री म्हणाले, “नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांनी मला माहिती दिली आहे की, JEE परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या ८.५८ लाख विद्यार्थ्यांपैकी ७.५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. तर NEETसाठी अर्ज भरलेल्या १५.९७ लाख विद्यार्थ्यापैकी १० लाख विद्यार्थ्यांनीही प्रवेश ओळखपत्र डाऊनलोड केले आहेत. हे कार्ड २४ तासात डाउनलोड करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचीच अशी इच्छा आहे की, कोणत्याही किंमतीत परीक्षा घ्याच, असंच यातून दिसून येतंय,” असं पोखरियाल म्हणाले.
“JEE परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी केंद्रांची संख्या ५७० इतकी होती. ती आता ६६० इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर NEETच्या परीक्षा केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे. २ हजार ५४६ वरून NEET परीक्षा केंद्रांची संख्या ३ हजार ८४२ इतकी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची केंद्र देण्यात आली आहेत,” असंही पोखरियाल म्हणाले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.