चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ एप्रिल २०२१

Date : 28 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रशियाची लस मेअखेरीस भारतात :
  • रशियाची स्पुटनिक लस भारतात आयातीच्या मार्गाने मे महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल, असे ही लस आयात व उत्पादन करण्याचा परवाना मिळालेल्या रेड्डी लॅबोरेटरीज या हैदराबादच्या कंपनीने म्हटले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्याकडून ही लस आयात केली जात आहे. सप्टेंबर २०२० मध्ये रेड्डीज व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात स्पुटनिक व्ही लशीच्या चाचण्या करण्याबाबत करार झाला होता.

  • गमालेया नॅशनल रीसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी  या संस्थेने ही लस तयार केली असून डॉ. रेड्डीज कंपनीने त्यांच्याकडून या लशीच्या १० कोटी मात्रा वितरित करण्याचा  परवाना घेतला आहे.

  • नंतर हे प्रमाण १२.५० कोटी करण्यात आले आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पहिल्या तिमाहीतच या लशीची आयात केली जाणार आहे.

ICAI CA परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय :

 

  • राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजीत परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता इन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या २१ मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीएआयकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे.

  • करोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरेक्षाचा विचार करता, सीए फायनल आणि इंटरमिजीएटची २१ आणि २२ मे पासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाठी २५ दिवसांचा वेळ मिळेल, अशा पद्धतीने परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असं आयसीएआयच्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

  • नुकतच एमबीबीएस प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या ज्या परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा - नेपोमनियाचीला जेतेपद :
  • रशियाच्या इयान नेपोमनियाची याने १३व्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्हविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.

  • एक फेरी शिल्लक राखत नेपोमनियाचीने ८.५ गुणांसह अग्रस्थान पटकावले. आता दुबई येथे वर्षअखेरीस होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत तो नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा आव्हानवीर असेल.

  • नेपोमनियाचीने वचिएर-लॅग्रेव्हविरुद्ध बरोबरी पत्करल्यानंतर नेदरलँड्सच्या अनिश गिरी याला रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशुककडून पराभूत व्हावे लागल्याने नेपोमनियाचीचे जेतेपद निश्चित झाले. नेपोमनियाचीने ८.५ गुण मिळवत अग्रस्थान पटकावले तर गिरीला ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या अनिश गिरीला सोमवारी चांगली कामगिरी करता आली नाही. २००२मध्ये १० वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनला मागे टाकून नेपोमनियाचीने विजेतेपद मिळवले होते. आता दोन दशकानंतर जगज्जेतेपदाचा मुकुट कार्लसनकडून हिरावून घेण्याची संधी नेपोमनियाचीला मिळणार आहे.

भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर :
  • आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले.

  • भारताला आपत्कालीन मदतीशिवाय साधनसामुग्रीही पुरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी व अध्यक्ष बायडेन यांच्यात सोमवारी दूरध्वनी संभाषण झाले होते. करोनाच्या दुसऱ्या साथीत भारत अडचणीत असताना अमेरिका संथ प्रतिसाद देत असल्याची टीका बायडेन प्रशासनावर झाली होती त्यानंतर अमेरिकेने भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली असून लशीसाठी लागणारे घटक किंवा कच्चा माल पुरवण्याचेही मान्य केले आहे. अमेरिकेची गरज भागल्यानंतरच भारताचा विचार करण्यात येईल अशी भूमिका बायडेन प्रशासनाने या आधी घेतली होती.

  • ‘अ‍ॅस्ट्राझेनेका लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिकेकडून जगासाठी उपलब्ध’ सध्या जगात अनेक देशांत करोनाची साथ वाढत असताना त्यावर अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड यांनी तयार केलेल्या लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिका जगाला उपलब्ध करून देईल, असे अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती यांनी म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस ही जगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असली तरी तिला अजून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेली नाही.

रेल्वेकडून राज्यांसाठी ४ हजार कोविड केअर कोच निर्मिती :
  • भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालं आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत. परिणामी आरोग्यंत्रणा कोलमडत आहेत. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिविर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून भारत सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्याचे दिसत आहे.

  • रेल्वे मंत्रालयाने ६४ हजार बेडसह जवळपास ४ हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. सध्या १६९ कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले आहेत. अशा माहिती देण्यात आली आहे.

  • राज्यांच्या मागणीनुसार रेल्वेने नागपूर, भोपाळ, इंदौर जवळील तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्यात ११ कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे. अशी देखील माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

२८ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.