भारताच्या आकाश सांगवान (६७ किलो) आणि शिवा थापा (६३.५ किलो) यांनी एआयबीए जागतिक पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पदार्पणवीर रोहित मोरलाही विजयी सलामी देण्यात यश आले.
राष्ट्रीय स्पर्धेतील गतविजेत्या आकाशने पहिल्या फेरीत तुर्कीच्या फुर्कान अदेमचा ५-० असा धुव्वा उडवला. त्याची पुढील फेरीत जर्मनीच्या डॅनियल क्रोटेरशी लढत होईल. तसेच थापाने केनियाच्या व्हिक्टर न्यादेरालाही ५-० अशी धूळ चारली.
दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे जॉन ब्राऊनचे आव्हान असेल. त्याआधी, ५७ किलो वजनी गटात रोहितने इक्वेडोरच्या जीन कैसेडोचा पराभव करत भारताला विजयी सुरुवात करून दिली. याव्यतिरिक्त दीपक भोरियाने ५१ किलो वजनी गटात किर्गीस्तानच्या अजत उसेनालिएव्हचा ५-० असा फडशा पाडून पुढील फेरीतील स्थान सुनिश्चित केले.
भारताच्या सचिन कुमार (८० किलो) आणि आशियाई विजेता संजीत (९२ किलो) यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. सचिनची पहिली लढत ३० ऑक्टोबरला, तर संजीतची पहिली लढत २९ ऑक्टोबरला होईल. ५१ किलो वजनी गटात दीपक कुमार पहिल्या फेरीत अझात उसेनालीव्हविरुद्ध लढेल.
उत्तर प्रदेशातील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,” असं ते म्हणाले आहेत.
“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे.
पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार, राजकीय नेते व इतर महत्त्वाच्या व्यक्तींवर सरकारने पाळत ठेवल्याच्या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय बुधवारच्या सुनावणीत निकाल देणार आहे.
या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या असून त्या मागणीवर बुधवारी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
यापूर्वी १३ सप्टेंबरला न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यावेळी न्यायालय म्हणाले होते की, सरकारने पेगॅसस स्पायवेअर वापरले की नाही, ते अयोग्य किंवा बेकायदेशीरपणे वापरले का, एवढेच आम्हाला सरकारकडून जाणून घ्यायचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, या प्रकरणी चौकशीसाठी एक तंत्रज्ञ समिती नेमण्यात येत असून त्यानंतर स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यायचे की नाही हे ठरवण्यात येईल.
नासाच्या ‘चंंद्रा’ या अवकाश दुर्बिणी मार्फत अवकाशाची निरीक्षणे १९९९ पासून सुरु आहेत. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत ही दुर्बिण भ्रमण करत आहे. भारतीय वंशाचे, नोबेल पुरस्कार सन्मानित, अमेरिकेतील प्रसिद्ध खगोल-भौतिक शास्त्रज्ञ एस सुब्रम्हण्यम यांच्या नावावरुन दुर्बिणीला ‘चंद्रा’ हे नाव नासाने दिलं आहे. अनंत अशा अवकाशातील एक्स रे – क्ष किरण स्त्रोतांचा म्हणजेच न्युट्रॉन तारे आणि कृष्णविवर यांचा अभ्यास या अवकाश दुर्बिणीमार्फत केला जातो.
नुकतंच या दुर्बिणीमार्फत ‘Messier 51’ या दिर्घिकेच्या काही भागाची निरिक्षणे सुरु होती. चंद्राने टिपलेल्या माहितीचे विश्लेषण सुरु असतांना नव्या ग्रहाचे अस्तित्व सापडल्याचा दावा अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. याबाबत एक अहवाल ‘नेचर’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. Messier 51 या दिर्घिकेत क्ष किरणे उत्सर्जित करणाऱ्या ‘M-51-ULS-1’ असं नाव असलेल्या एका स्त्रोताचा अभ्यास सुरु होता.
M-51-ULS-1 हा न्युट्रॉन तारा आहे की कृष्णविवर याबाबत चंद्रा दुर्बिणीने पाठवलेली निरिक्षणे अभ्यासली जात होती. तेव्हा M-51-ULS-1 या स्त्रोतातून येणारे क्ष किरण हे काही काळ क्षीण झाल्याची नोंद झाल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.
म्हणजेच या स्त्रोताच्या समोरुन एखादी ग्रह सदृश्य गोष्ट गेली असावी असा अंदाज संशोधकांनी लावला. ही निरिक्षणे पुन्हा पुन्हा पडताळून झाल्यावर संशोधकांची खात्री पटली की M-51-ULS-1 या स्त्रोताच्या भोवती शनीच्या आकाराचा एखादा ग्रह असावा. तेव्हा खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर दुसऱ्या एखाद्या दिर्घिकेत ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली. सध्या शेतकऱ्यांना शासनाचे व्याजदर परतावा धोरणानुसार तीन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहीत मुदतीत केल्यास तीन लाखांच्या मर्यादेत अल्पमुदत पीककर्जे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे.
परंतु ३ लाखांच्या पुढील पीककर्जे शेतकऱ्यांना बँकेच्या प्रचलित १० टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने आज बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत यावर चर्चा होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्वभांडवलातून देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.