अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट २०२१ या यादीत २५ वे मानांकन जाहीर झाले आहे. रिटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव आहे.
फोर्ब्जतर्फे ही यादी तयार केली जाताना संबंधित नामवंतांची नक्त मत्ता (नेटवर्थ), कार्यक्षेत्रातील त्यांचे महत्त्व व योगदान, गेल्या वर्षभरातील प्रगती व कामगिरी, रोजगार निर्मितीवर घडवलेला परिणाम, सामाजिक परिणाम व इतर कंपनी सामाजिक जबाबदारी उपक्रम यांचा विचार केला जातो.
डॉ. दातार यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच गेल्या वर्षात सामाजिक बांधीलकीचे स्तुत्य प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, फोर्ब्ज मिडल इस्टने माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रतिष्ठित यादीत मानांकन दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरंतर गेले वर्ष करोना साथीमुळे सर्वांसाठीच खडतर ठरले आणि उद्योग क्षेत्राच्या वाटचालीवरही विपरीत परिणाम झाला. माझ्या अल अदील कंपनीने हे आव्हान पेलताना सामाजिक बांधीलकीचाही विसर पडू दिला नाही. या प्रयत्नांत माझे कुटूंबीय, कर्मचारी व ग्राहक यांची मोलाची साथ मला लाभली. परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीय बांधवांना घरी सुखरुप परतता यावे यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली. लॉकडाऊन काळात रोजगारवंचित व निर्धन भारतीयांना खाद्यपदार्थांचे व औषधांचे हजारो संच मोफत पुरवणे, गरजूंच्या कोविड आरोग्य तपासणीचा व परतीच्या विमान तिकीटाचा खर्च उचलणे या मार्गांनी आम्ही ५००० हून अधिक भारतीयांना मायदेशी पोचवले.
असहाय्य स्थितीत अनवधानाने स्थानिक कायद्याचे पालन न झाल्याने तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही स्वयंसक्रियतेने पाठपुरावा केला व त्याला यश आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यात ७ जणांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो आबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो आबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो आबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.
याचबरोबर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जपानच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंजो आबे यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात विश्वासू मित्र असल्याचे मत व्यक्त केले होते. "मोदी अत्यंत विश्वासू मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. त्यांचे जपानमध्ये स्वागत करणे, हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे', असे शिंजो आबे यांनी म्हटले होते.
जागतिक स्तरावर आरामदायी वाहन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या 'टेस्ला' या कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता.
Elon Musk यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीकडून अंतराळात एकाच वेळी १४३ उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या या विक्रमाला मागे टाकत स्पेसएक्स यांनी तब्बल १४३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यामुळे स्पेस एक्सने नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
सर्व १४३ उपग्रह 'फाल्कन ९'मधून प्रक्षेपित करण्यात आले. फ्लोरिडा येथील कॅप केनेवरल येथून भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ०८ वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात हे उपग्रह सोडण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. Elon Musk यांची कंपनी उपग्रह सोडण्यासाठी तब्बल १० लाख डॉलर घेते, अशी माहिती मिळाली आहे.
अंतराळात उपग्रह सोडण्याचे स्वप्न घेऊन Elon Musk वयाच्या ३० व्या वर्षी रशियात पोहोचले. मात्र, दोनवेळा प्रयत्न करूनही रशियाने उपग्रह देण्यास नकार दिला. यानंतर Elon Musk यांनी स्वतःच उपग्रह निर्मितीचा चंग बांधला आणि स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली. या प्रवासात Elon Musk यांनी अनेक आव्हाने, संकटे आणि अडचणींचा सामना केला. मात्र, अखेर Elon Musk यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले, असे सांगितले जाते. आताच्या घडीला Elon Musk जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर आहेत.
एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा (World Test Championship) सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण ICCने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
ICCच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. IPL 2021 चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे BCCIच्या विनंतीला मान देत ICCने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.
नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच IPL स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ICCने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.
शौर्य, संशोधन, कला, ज्ञानार्जन, क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारावर राज्यातील मुलांनी मोहोर उमटवली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने देशभरातील ३२ मुलांना हा पुरस्कार जाहीर केला असून त्यातील पाच मुले राज्यातील आहेत.
‘महाराष्ट्राची माती ही गुणांची खाण आहे हेच या मुलांनी सिद्ध केले आहे. लढवय्येपणा, शौर्य यात महाराष्ट्र मागे हटत नाही. क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राने कायमच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संशोधन, नवनिर्माण यांतही नवी पिढी उमेदीने पुढे जात आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुक केले आहे.
नागपूर येथील बाल नवसंशोधक श्रीनभ अग्रवाल याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शेतात ‘येलो मोजॅक विषाणू’ने पिकांचे मोठे नुकसान होते.‘येलो मोजॅक विषाणू’चा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.