चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जानेवारी २०२०

Date : 27 January, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मदर ऑफ सीड’ राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री : 
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन कर्तबगार व्यक्तींचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • सुरेल गळ्यांनं गाण्यांमध्ये भाव भरणारे गायक सुरेश वाडकर ‘मदर ऑफ सीड्स’ अशी जगभरात ओळख मिळवणाऱ्या राहीबाई पोपेरे आणि आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

  • संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्स बँकमध्ये तब्बल ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. त्यांच्या या कार्याची बीबीसीनंही दखल घेतली आहे.

भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर वाईच्या भूमीत : 
  • भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईमध्ये केले. त्यांच्या या कार्यामुळे ज्ञाननिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाईचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले, अशी माहिती मराठी विश्वकोशाचे सहायक संपादक रवींद्र घोडराज आणि सरोजकुमार मिठारी यांनी दिली.

  • प्रागतिक इतिहास संस्था व किसन वीर महाविद्यालय यांच्यावतीने मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्यविश्वावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र २७ जानेवारीपासून वाई येथे होत आहे. यानिमित्ताने तर्कतीर्थानी निर्माण केलेल्या विविध साहित्यांचे संकलन करताना घोडराज आणि मिठारी यांना भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर वाईमध्येच झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा प्रश्न जेव्हा पुढे आला, तेव्हा ती जबाबदारी तर्कतीर्थावर सोपविण्यात आली होती. घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार त्यावेळी १४ भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. यामुळे घटनेचे संस्कृत भाषांतर करणे अनिवार्य होते. त्यासाठी तत्कालीन लोकसभा सभापतींनी संस्कृत भाषांतरासाठी समिती नियुक्ती केली. त्या समितीचे अध्यक्ष महामहोपाध्याय पां. वा. काणे होते. तर प्रमुख भाषांतरकार व समितीनिमंत्रक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची, तर सहभाषांतरकार म्हणून डॉ. मंगलदेवशास्त्री (बनारस) यांची नियुक्ती करण्यात आली.

  • समितीतील अन्य सदस्यांमध्ये डॉ. सुनीतीकुमार चतर्जी (कलकत्ता), के. बालसुब्रह्मण्यम अय्यर (मद्रास), महामहोपाध्याय गिरिधरशर्मा चतुर्वेदी (बनारस), डॉ. बाबूराम सक्सेना (अलाहाबाद), पंडित राहुल सांकृत्यायन (मसुरी), डॉ. रघुवीर (नागपूर), मुनी  जीनविजयजी (मुंबई ) व डॉ. कुन्हनराजा (मद्रास) या मान्यवर विद्वानांचा समावेश होता.

युरोपियन युनियनच्या संसदेत ‘सीएए’विरोधात ठराव; भारताने घेतला तीव्र आक्षेप : 
  • सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या विरोध आंदोलनांनंतर आता हे प्रकरण युरोपियन युनियनच्या संसदेत पोहोचले आहे. सीएएच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावावर युरोपियन युनियनच्या संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला असून हा आमचा देशांतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

  • भारताने यासंदर्भात म्हटले की, युरोपियन युनियनच्या संसदेला असे कृत्य करायला नको होते ज्यामुळे लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. जगभरातील अधिकाधिक देशांनी हे मान्य केलं आहे की, सीएए हा पूर्णतः भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. उलट युरोपच्या संसदेत हा ठराव आणणाऱ्यांनी आणि याचे समर्थन करणाऱ्यांनी याबाबतची तथ्थ्ये जाणून घेण्यासाठी भारताशी संपर्क साधावा.

  • या ठरावाद्वारे भारताला आवाहन करण्यात आले आहे की, भारताने सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांसोबत रचनात्मक चर्चा करावी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांना संपुष्टात आणण्यावर विचार करावा. सीएएमुळे भारतात नागरिकत्व निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये धोकादायकरित्या बदल होईल. भारत याला अंतर्गत बाब सांगत असला तरी अनेक देश या कायद्याला मानवाधिकारांशी जोडून पाहत असून प्रश्न उपस्थित करीत आहे.

  • परदेशी माध्यमंही यावर सातत्याने आक्रमक भुमिका घेत आहेत. यामुळे जगात मोठे संकट निर्माण होऊ शकते आणि हे मोठे कठीण काम होऊन बसेल. युरोपियन युनियनच्या संसदेत या ठरावावर बुधवारी चर्चा होणार असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी यावर मतदानही घेतले जाणार आहे.

२७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.