कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून आपण जगाला हे सांगत असतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे. इत:पर हिचे पांग आम्ही फेडू शकत नाही. एक जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा, आधुनिकीकरणाचा वसा आम्ही टाकून दिला आहे.
भाषा दिन साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील गोष्टी आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण बोलून दाखवत नाही. कारण तसे करणे औचित्याला धरून नाही. किंवा पोपट मेला हे सांगण्याचे धर्य आपणापाशी नाही. त्यापेक्षा एखादा दिवस मराठीच्या (न करायच्या) विकासासाठी एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपल्या उत्सवप्रियतेला व दांभिकपणाला शोभणारे आहे.
मराठीसंबंधी असे कटू पण स्पष्ट बोलणे अनेकांना आवडणार नाही. पण ते काम कोणीतरी केलेच पाहिजे. अन्यथा, इतिहास आपल्याला माफ करणार नाही. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत. यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे.
स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. यापुढे जे लोक त्याचे पालन करतील त्यांना पश्चात्ताप करावा लागेल. रांगेचा फायदा सर्वाना होतो. पण कधी? सर्वानी रांगेत उभे राहण्याच्या नियमाचे पालन केले तर. भाषेचेही तसेच आहे. भाषेचा विकास ही सर्वानी मिळून सातत्याने करायची गोष्ट आहे. चार-दोन लोकांनी, कधीतरी करायची गोष्ट नाही.
बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता २७१५ झाली आहे. मंगळवारी आणखी ५२ जणांचा मृत्यू झाला. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ७८०६४ झाली असून हुबेई प्रांतासह सर्वच ठिकाणी संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, हुबेई प्रांतात मंगळवारी ५२ जणांचा मृत्यू झाला असून ४०६ नवीन रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या २७१५ तर निश्चित रुग्णांची संख्या ७८०६४ झाली आहे. देशभरात एकू ण ४३९ नवीन रुग्ण असून मंगळवारी गंभीर रुग्णांची संख्या ३७४ ने कमी होऊन ती ८७५२ झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या आता २४९१ आहे. २९७४५ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवले जाणार आहे. ६.४७ लाख निकटचे संपर्क सापडले असून ७९००० लोक अजून निरीक्षणाखाली आहे. मंगळवार अखेरीस एकूण ८५ निश्चित रुग्णांसह २ मृत्यू अशी हाँगकाँगची स्थिती होती.
मकावमध्ये १० रुग्ण असून तैवान मध्ये ३१ रुग्ण व एक मृत्यू अशी स्थिती आहे. वुहान आणि हुबेईतील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे ही क्विंगहुआ यांनी सांगितले.
अलिबाग – रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अलिबाग येथील कर्वे न्युज एजन्सीचे मालक संजय कर्वे यांचे आज बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.
संजय कर्वे यांनी आपले वडिल मुकूंद पुरुषोत्तम तथा राजाभाऊ कर्वे यांनी आठ दशकांपूर्वी सुरु केलेल्या वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय आपल्या बंधूंच्या सहकार्याने प्रंचड मेहनत घेऊन यशोशिखरावर नेला. संपूर्ण रायगड जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेते म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायात देखील त्यांनी चांगला जम बसविला होता. लायन्स क्लबच्या माध्यमातून संजय कर्वे यांनी समाजकार्यात देखील मोठा हातभार लावला.
अलिबाग लायन्स क्लब तसेच लायन्स क्लबच्या रिजनल कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या कार्यकाळात अलिबाग परिसरात मोठया प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबविले गेले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अलिबागमधील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन अंतीमदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्दय़ावरून ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, दिल्ली पोलिसांनी परिस्थिती व्यावसायिक पद्धतीने हाताळली नाही, अशा शब्दात ताशेरे ओढले आहेत. या हिंसाचारात वीस ठार तर आणखी अनेक जण जखमी झाले आहेत.
पोलिसांसह कायदा अंमलबजावणी संस्थांवर ताशेरे ओढताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, पोलिसांनी हिंसक जमावाला मोकळे रान दिले. त्यांनी कुणाच्या परवानगीची वाट न पाहता कारवाई करायला पाहिजे होती. जर कुणी प्रक्षोभक भाषण करीत असेल तर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. हिंसाचाराबाबतच्या याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायालयाने सांगितले की, शाहीन बाग निदर्शनांच्या मुद्दय़ावर सुनावणी करण्यासाठी अनुकूल स्थिती असली पाहिजे.
न्या.एस.ए. कौल व न्या. के.एम. जोसेफ यांनी सांगितले की, शाहीनबाग प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांची व्याप्ती वाढवून त्यात हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी केली जाणार नाही.
जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला २५ रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने १ एप्रिल २०२० पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.
याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर ६५० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत ५०० रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास २५० रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत २५० रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.
अॅक्सिस बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून १५ ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला ७५ रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता १०० रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी ६० रुपये घेतले जात होते.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.