चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ ऑगस्ट २०२१

Date : 27 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मेड इन इंडिया’ ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द :
  • भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून त्याची पहिली बॅच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड (MMHG) नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत. भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मालकीची असलेल्या कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे.

  • कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख MMHG च्या पहिल्या खेपीची गुणवत्ता तपासणी यशस्वी झाली असून ती लष्कराचा सोपवण्यात आली आहे.

  • यानिमित्त मंगळवारी ईईएलच्या दोन हजार एकर संरक्षण उत्पादन केंद्रावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एमएमएचजीचे ग्रेनेड ईईएलचे अध्यक्ष एस एन नुवाल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केले. या कार्यक्रमात भारतीय लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, लेफ्टनंट जनरल एके सामंत्र, डीजी इन्फंट्री आणि डॉ. जी सतीश रेड्डी, डीआरडीओचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अफगाणिस्तान संघर्ष : पंतप्रधान मोदींचं ‘ते’ वक्तव्य तालिबानला झोंबलं; भारताला दिला इशारा :
  • दहशतवादाच्या माध्यमातून स्थापन केलेली सत्ता ही कायम स्वरुपी नसते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य दहशतीच्या बळावर अफगाणिस्तानवर कब्जा मिळवणाऱ्या तालिबानला बोचलं आहे. तालिबानचा प्रमुख नेता शहाबुद्दीन दिलावरने मोदींचं हे वक्तव्य आव्हान म्हणून स्वीकारत आम्ही दहशतीच्या बळावर मिळालेली सत्ता टीकवून दाखवू असं म्हटलं आहे.

  • तालिबान अफगाणिस्तानमध्ये योग्य पद्धतीने प्रशासकीय कारभार चालवत असल्याचं लवकरच भारताला दिसून येईल असं मत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिलावरने व्यक्त केलंय. सोमनाथ मंदिर येथील काही प्रकल्पांचे आभासी उद्घाटन करताना मोदींनी दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून सत्तांतरण घडवण्यासंदर्भात तालिबानचा थेट उल्लेख न करता वक्तव्य केलं होतं.

  • “भगवान सोमनाथांचे मंदिर आज भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक विश्वासाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. हे मंदिर जोडणाऱ्या शक्तींचं प्रतिक आहे. विध्वंसक व दहशतवादी शक्ती दहशतवादाच्या माध्यमातून काही काळ साम्राज्ये निर्माण करू शकतात, पण ती कायम टिकू शकत नाही कारण मानवतेला फार काळ दडपणे शक्य नसते,” असं मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांचं हे वक्तव्य तालिबानने अफगाणिस्तानच्या ताबा घेतल्याच्या घटनेशी जोडून पाहिलं गेलं. सोमनाथ मंदिर अनेकदा नष्ट करण्यात आले होते असा संदर्भही मोदींनी यावेळी दिला होता.

केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची केंद्राची सूचना :
  • केरळमधील रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ नोंदवणाऱ्या महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली.

  • राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर तातडीने केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा राज्यांना पुरवल्या जातील, असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितले. तसेच, करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे, असेही केंद्र सरकारने राज्यांना स्पष्ट केले.

  • केरळमध्ये सलग दोन दिवस ३० हजारांहून जास्त रुग्णांची भर पडली असून, एक लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपकी ५१ टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रात १६ टक्के व अन्य तीन राज्यांमध्ये ४-५ टक्के उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दूरचित्रसंवादाद्वारे राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.

न्या. बी.व्ही. नागरत्न देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता :
  • तीन महिलांसह  नव्या नऊ न्यायमूर्तीची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. यापैकी बी.व्ही. नागरत्न या देशाच्या पहिला महिला सरन्यायाधीश होण्याची पुरेपूर शक्यता असून, सप्टेंबर २०२७ मध्ये त्या हे पद भूषवू शकतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली.

  • ३४ न्यायमूर्तीची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सध्या १० जागा रिक्त आहेत. लवकरच या नव्या न्यायमूर्तीनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केवळ एक जागा रिक्त राहील. या न्यायमूर्तीच्या नियुक्त्यांची घोषणा करणारी औपचारिक अधिसूचना कायदा मंत्रालयातर्फे लवकरच जारी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या आठवडय़ात आजवर प्रथमच ३ महिला न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी शिफारस केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या वरिष्ठ न्यायमूर्ती असलेल्या नागरत्न  यांच्यासह तेलंगण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयातील न्या. बेला त्रिवेदी यांचा या नावांत समावेश आहे.

  • यापैकी न्या. कोहली या १ सप्टेंबरला वयाची ६२ वर्षे पूर्ण करून निवृत्त होणार होत्या. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या बाबतीत ते ६५ वर्षे आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर :
  • अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. यंदा मुंबईतल्या नामाकिंत कॉलेजचा कट-ऑफ ९० टक्क्यांवर लागला आहे. मुंबई विभागात १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज प्राप्त झालं आहे. तर ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी ६१ टक्के विद्यार्थ्यांना आता कॉलेजेस प्राप्त झाली आहेत.

  • शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार, MMR (मुंबई महानगर प्रदेश) आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या अकरावी प्रवेशासाठीची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुरुवातीच्या फेरीसाठी FYJC मेरिट लिस्ट २०२१ ही आज जाहीर होत आहे. अकरावीच्या प्रवेशा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.

  • FYJC प्रवेश २०२१ साठी पहिली गुणवत्ता यादी किंवा कट ऑफ यादी अधिकृत वेबसाइट 11thadmission.org वर जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी सामान्य फेरीसाठी नोंदणी केली आहे ते गुणवत्ता यादी ऑनलाइन तपासू शकतात. महाराष्ट्र FYJC प्रवेश २०२१ साठी जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, अलॉटमेंट यादी जारी केली जाईल.

  • सोशल मीडियाचा आधार घेत वर्षा गायकवाड यांनी माहिती शेअर केली होती. त्यांनी हे देखील सांगितले होते की प्राप्त झालेल्या ३.७५ लाख अर्जांसाठी कट ऑफची पहिली यादी जाहीर केली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी; फक्त ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. गायकवाड यांनी शेअर केले की, ‘प्रवेशाच्या या फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केली जाईल. त्यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल.

अधिकाऱ्यांच्या वारसांनाही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या :
  • राज्य शासकीय सेवेत असताना एखाद्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबातील एका व्यक्तीस अनुकं पा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या शासकीय सेवेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या ( गट ‘क’ व ‘ड’) कर्मचाऱ्यांना अनुकं पा धोरण लागू आहे. हे धोरण आता शासकीय सेवेतील वर्ग एक व वर्ग दोन (गट अ व ब) अधिकाऱ्यांनाही लागू करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची गेल्या अनेक वर्षांची मागणी राज्य मंत्रिमंडळाने मान्य के ली. महासंघाचे संस्थापक ग. दि. कु लथे व अध्यक्ष विनोद देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

  • शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्धर आजार किंवा अपघाती मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबाचा आधारच नाहीसा होतो. अशा कु टुंबाला आधार मिळावा, यासाठी अनुकं पा तत्त्वावर त्याच्या कु टुंबातील पात्र व्यक्तीला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. शासकीय सेवेत असताना अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कु टुंबाचाही आधार नाहीसा होतो.

  • त्याचा विचार करून कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनाही अनुकं पा धोरण लागू करावे, अशी महासंघाची मागणी होती. राज्यात करोना साथरोगामुळे अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे अनुकं पा धोरणासाठी आग्रही मागणी होऊ लागली.  मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने  गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

‘भारतप्रेमी’ रमीज राजा होणार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष :
  • पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रमीज राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे अध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझच्या मते, रमीज राजा यांनी सोमवारी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली आणि पीसीबीच्या भविष्यासाठी त्यांच्या योजना स्पष्ट केल्या. त्या बैठकीला पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष एहसान मणी उपस्थित होते. त्यानंतर इम्रान खान यांनी राजा यांना हिरवा कंदील दिला.

  • क्रिकबझच्या मते, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीसीबी अध्यक्षांची भूमिका अधिकृतपणे रमीज राजा यांच्याकडे सोपवली जाईल. त्यांना पाकिस्तान क्रिकेटची स्थिती सुधारण्याची इच्छा आहे. राजा यांनी यूट्यूब चॅनेलवर याबद्दल बोलले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते गोष्टी कशा हाताळतील, हे पाहावे लागेल.

  • रमीज राजा सोमवारी म्हणाले, ”मी माझी योजना इम्रान खान यांना सांगितली आहे. ते ठरवतील. पाकिस्तान क्रिकेटला सर्वोत्तम पातळीवर नेणे हे ध्येय आहे.” रमीझ राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात प्रशासकीय भूमिका बजावण्याची ही पहिली वेळ नाही. १९९२च्या विश्वचषक विजेत्या राजा यांनी पीसीबीचे सीओओ म्हणूनही काम केले आहे. २००४मध्ये ते पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारीही होते.

२७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.