चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ एप्रिल २०२०

Date : 27 April, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
IITs, IIITs कडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण :
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या केंद्रीय शैक्षणिक संस्था २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कुठल्याही अभ्यासक्रमासाठी ट्युशन फी वाढवणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी रविवारी दिली.

  • पोखरियाल म्हणाले, “आयआयटी परिषदेच्या स्थायी समितीचे चेअरमन आणि आयआयटीजच्या सर्व संचालकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला की, या शैक्षणिक संस्था २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी कुठल्याही कोर्ससाठीची ट्युशन फी वाढवणार नाहीत.”

  • तर आयआयआयटीज संदर्भात सांगताना ते म्हणाले, “ज्या केंद्रीय अनुदानित संस्था आहेत. ज्यांमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेससाठी नेहमी १० टक्के शुल्कवाढ केली जाते ती या वर्षी केली जाणार नाही. त्याचबरोबर इतर कोर्ससाठी देखील त्यांनी फी वाढ करु नये अशी विनंती मी त्यांना केली आहे.”

लॉकडाउन - उरले फक्त ६ दिवस; आज पंतप्रधान करणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा :
  • लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आता केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच संपूर्म परिस्थितीचा आढावादेखील घेणार आहेत.

  • यापूर्वी अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं २० आणि २५ एप्रिल रोजी काहीशा प्रमणात सशर्त सुट दिली होती. कोणत्या ठिकाणी दुकानं सुरू ठेवावी किंवा बंद याचा निर्णय राज्य सरकारांकडे सोपवण्यात आला होता.

  • यापूर्वी २० मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्याचं आवाहन केलं होतं. याव्यतिरिक्त त्या बैठकीत करोनाचा सामना करण्यासाठी राज्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, यावर चर्चाही केली होती.

जगभरातील करोनाग्रस्तांचा आकडा २९ लाखांवर, २ लाखांपेक्षा अधिक मृत्यू :
  • सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा हा २७ हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

  • तर मृतांची संख्यांही ८०० च्या वर गेली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना प्रतिबंधासाठी जी लस विकसित केली आहे, त्याचे उत्पादन पुढील दोन ते तीन आठवड्यात आम्ही सुरू करू , मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे.

स्पॅनिश फ्लूनंतर अर्थव्यवस्था कशी सावरली याचा अभ्यास करावा :
  • नवी दिल्ली : भारताने १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ कशी हाताळली होती व त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय उपाय करण्यात आले होते याचे संशोधन विद्यापीठांनी करावे, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या शिफारशीत म्हटले आहे की, विद्यापीठांनी कोविड १९ बाबत ग्रामीण भागात किती जागरूकता आहे याचीही तपासणी संशोधनाच्या माध्यमातून करावी.

  • मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, १९१८ मध्ये जी साथ आली होती ती स्पॅनिश फ्लूची होती त्यावेळी नेमके कोणते उपाय करण्यात आले होते व त्यावेळी अर्थव्यवस्था कशी सावरण्यात आली याचे संशोधन करण्यात यावे अशी अपेक्षा मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

  • मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, करोना विषाणूशी लढण्यात शैक्षणिक संस्थांनी संशोधनाच्या माध्यमातून मदत करावी. त्यात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात करोनाबाबत किती जागरूकता आहे, यावरही संशोधन करून शोधनिबंध सादर करावेत. विद्यापीठे व इतर संस्थांनी आजूबाजूची ५-६ खेडी निवडून हा अभ्यास करावा. कोविड १९ मुळे निर्माण झालेली आव्हाने लोकांनी कशाप्रकारे पेलली यावरही संशोधनातून प्रकाश पडला तर त्याचा फायदा नियोजनात होईल.

महाराष्ट्रात ४४० नवे करोना रुग्ण, १८ मृत्यू, संख्या ८ हजारांच्या पुढे :
  • महाराष्ट्रात आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६८ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९ पैकी १२ मृत्यू मुंबईत, पुण्यात ३, जळगावात २, सोलापूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ११८८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

  • राज्यात आज 440 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8068 अशी झाली आहे. यापैकी 1188 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले

  • आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

२७ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.