चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ ऑक्टोबर २०२०

Date : 26 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पोर्तुगीज ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत - हॅमिल्टनचे विक्रमी ९२वे जेतेपद :
  • पोर्टिमाओ : ब्रिटनचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन याने फॉम्र्युला-वनच्या इतिहासात रविवारी नव्या अध्यायाची नोंद केली. पोर्तुगीज ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावत हॅमिल्टनने फॉम्र्युला-वनमध्ये ९२ जेतेपदे मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने मायकेल शूमाकर याचा विक्रम मोडीत काढला.

  • हॅमिल्टनने मर्सिडिझ संघातील सहकारी वाल्टेरी बोट्टास याला २५.६ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सहजपणे जेतेपद पटकावले. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसरे स्थान प्राप्त केले. हॅमिल्टनचे हे यंदाच्या मोसमातील आठवे जेतेपद ठरले.

  • हॅमिल्टनने २००७मध्ये फॉम्र्युला-वनमधील पहिली शर्यत जिंकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने जगज्जेतेपदाला गवसणी घातली. २०१३मध्ये शूमाकर निवृत्त झाल्यानंतर त्याची मर्सिडिझ संघातील जागा हॅमिल्टनने घेतली. त्यानंतर मर्सिडिझचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅमिल्टनने पाच जगज्जेतेपदे मिळवली. आता शूमाकरच्या सात जगज्जेतपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी यंदा हॅमिल्टनकडे आहे.

कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे हरिश साळवे दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर :
  • केंद्र सरकारचे माजी महाधिवक्ता आणि पाकिस्तानमध्ये कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढणार प्रसिद्ध वकील हरिश साळवे दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. वयाच्या ६५ वर्षी साळवे बोहल्यावर चढणार आहेत. ३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. त्यानंतर ते आता दुसरा विवाह करत आहेत.

  • हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मीनाक्षी असून त्यांना दोन मुलीही आहेत. हरीश साळवे २८ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये त्यांची मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न करणार आहेत. या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. हरिश साळवे यांनीही धर्म परिवर्तन केलं असून, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.

  • हरिश साळवे यांचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलीन यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. उत्तर लंडनमधील चर्चमध्ये ते नियमितपणे जात असत. साळवे आणि कॅरोलिन या दोघांचं हे दुसरं लग्न असून, या दोघांनाही मुले आहेत. ५६ वर्षीय कॅरोलिन या व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिनशी भेट झाली होती. त्यानंतर या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली.

अजित डोवाल यांचं ‘ते’ भाष्य चीन प्रकरणावर नव्हतं; सरकारी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण :
  • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी ऋषीकेश येथे गंगा पूजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी चीनसह इतर शस्त्रू राष्ट्रांना कडक इशारा दिला होता. मात्र, आता डोवाल यांनी ते विधान चीनबाबत केले नव्हते असे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. डोवाल यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

  • अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे विधान माध्यमांनी तोडून-मोडून दाखवले. त्यांनी हे विधान आध्यात्मासंदर्भात केलं होतं. ते चीन किंवा चीनसोबतच्या सुरु असलेल्या पूर्व लडाखमधील वादाबाबतही नव्हते.”

  • माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डोवाल ऋषीकेश येते बोलाताना म्हणाले होते की, भारताने यापूर्वी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. मात्र, हा नवा भारत आहे, त्यामुळे जर आता देशावर संकट आलं असेल तर आम्ही सीमापार जाऊन युद्धही करु शकतो.

‘त्या’ नऊ पत्रकारांना ‘इंडिगो’कडून १५ दिवसांसाठी विमान प्रवासाला बंदी :
  • खासगी क्षेत्रातली विमान कंपनी ‘इंडिगो’ने नऊ पत्रकारांवर प्रवास बंदी घातली आहे. कंगना रणौत उपस्थित असलेल्या विमानात घुसून या पत्रकारांनी गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या पत्रकारांना इंडिगोने १५ दिवसांसाठी प्रवासबंदी केली आहे.

  • डीजीसीएनं म्हटलं होतं कारवाई करा - डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) इंडिगोला ९ सप्टेंबरच्या घटनेसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. डीजीसीएचं म्हणणं होतं की, चंदीगड-मुंबईच्या फ्लाईटमध्ये गोंधळ घालणाऱ्या लोकांविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी. कंगना या विमानात पहिल्या रांगेत बसली होती. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर उतरलं टीव्ही रिपोर्टर्स आणि छायाचित्रकारांनी तिचे फोटो घेण्यासाठी थेट विमानात घुसले होते.

  • डीजीसीएला प्रसिद्ध कराव्या लागल्या होत्या नव्या गाईडलाइन्स - या घटनेनंतर डीजीसीएने नियमांमध्ये थोडा बदल केला. त्यामुळे आता विमानात विनापरवानगी कोणीही फोटो काढू शकणार नाही. विमानाचं उड्डाण, लँडिंग आणि सुरक्षित ठिकाणी उभं राहिल्यानंतर फोटो काढण्याची परवानगी नाही. तसेच विमान प्रवासादरम्यान रेकॉर्डिंगचं कोणतंही उपकरण वापरण्यास परवानगी असणार नाही.

मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन :
  • सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहुरंगी बनविले आहे. तंबोरे, सतारीच्या या नव्या रूपाला देश-परदेशातील कलाकारांचीही पसंती मिळत आहे.

  • लाखेऐवजी आता ‘मेटॅलिक’ रंगाचा वापर करून मिरजेची सतार बहुरंगी बनवत असताना तिच्यातील स्वरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षताही घेतली आहे.

  • मिरज शहर दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून परदेशातही तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. येथे बनवलेल्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. 

  • पारंपरिक पद्धतीमध्ये मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतुवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जांभळा यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. गेली अनेक वर्षे  स्पिरीटमिश्रित रंगांतील वापर तंतुवाद्यांसाठी होत होता.

२६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.