चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ नोव्हेंबर २०२०

Date : 26 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर आठ वर्षांनंतर मान्यता :
  • भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) अखेर आठ वर्षांनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबरोबरच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये (एनएसएफ) झाला आहे.

  • ‘एएआय’च्या नवीन पदाधिकाऱ्यांची या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच १८ जानेवारीला निवडणूक झाली होती. मात्र क्रीडा मंत्रालयाची संघटनेला मान्यता नसल्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदांवर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. मात्र आता अधिकृत मान्यता मिळाल्याने अर्जुन मुंडा अध्यक्षपदी, तसेच प्रमोद चांदूरकर (महासचिव) आणि राजेंद्र सिंग तोमार (खजिनदार) यांची निवड ग्राह्य़ धरण्यात आली आहे.

  • राष्ट्रीय क्रीडा धोरणाप्रमाणे (२०११) उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव यांच्या नेमणुका झाल्या नसल्याचा ठपका ठेवत क्रीडा मंत्रालयाने त्यांना मान्यता दिलेली नाही. त्या नेमणुकांसाठी नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश ‘एएआय’ला देण्यात आले आहेत.

  • केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे  नियमांचे पालन करण्यात आले नाही तर पुन्हा ही मान्यता काढून घेण्यात येईल, असेही क्रीडा मंत्रालयाने  चार पानांच्या पत्रात स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या ‘एएआय’च्या निवडणुकांना जागतिक तिरंदाजी संघटनेसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेने याआधीच मान्यता दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही राष्ट्रीय क्रीडा धोरण २०११ प्रमाणे निवडणुका न घेण्याचा ठपका ‘एएआय’वर ७ डिसेंबर २०१२ मध्ये ठेवण्यात आला होता.

‘ती’ महिला अखेर पाकिस्तानातून भारतात :
  • पाकिस्तानात तब्बल १० महिने अडकलेली हिंदू महिला अखेर भारतात परतली. पाकिस्तानातील मिरपूर-खास येथे आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी ती गेली होती.

  • फेब्रुवारीत ही महिला व्हिसा घेऊन पती व मुलांसह पाकिस्तानात गेली होती, पण टाळेबंदीमुळे पाकिस्तानात अडकून पडली. तिचा पती व मुले भारतीय नागरिक असून ते जुलैत भारतात परत आले. या महिलेला भारतात जाणाऱ्या रेल्वेत बसू देण्यापासून रोखण्यात आले. तिच्याकडे ‘एनओआरआय’ व्हिसा होता, पण टाळेबंदीकाळात त्याची ६० दिवसांची मुदत संपली होती.

  • ‘एनओआरआय व्हिसा’ची मुदत संपल्यामुळे ४१० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी अडकून पडले असल्याची माहिती गृह मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाला दिली होती. हे शरणार्थी दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहात होते व काही काळासाठी टाळेबंदीपूर्वी पाकिस्तानात गेले होते. त्यांना भारतात परतण्यास हरकत नसलेला एनओआरआय म्हणजे ‘नो ऑब्जेक्शन फॉर रिटर्न टू इंडिया’ व्हिसा देण्यात आला होता.

  • न्यायमित्र सज्जन सिंह यांनी या स्थलांतरितांची कैफियत न्यायालयासमोर मांडली. या स्थलांतरितांना व्हिसाची मुदत वाढवून मायदेशी आणले जाईल, असे आश्वासन गृहमंत्रालयाने त्यावर दिले होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर या स्थलांतरितांना दोन शटल गाडय़ांनी भारतात आणण्याची योजना आखण्यात आली. जुलै महिन्यात तशी व्यवस्था करण्यात आली. मात्र व्हिसाची मुदत संपल्याने ४१० जणांना परत भारतात येता आले नाही.

२६/११ मुंबई हल्ला - इस्रायलमध्ये उभारले जाणार विशेष स्मारक :
  • मुंबईवर २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. इस्रायलमधील ऐलात शहरामध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांच्या स्मरणार्थ विशेष स्मारक उभारले जाणार आहे.

  • मुंबईवर २००८ साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये यहुदीच्या चाबडा हाऊसवरही हल्ला केला होता. यामध्ये सहा यहुदी समाजातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० जणांचा मृत्यू झालेला. याच व्यक्तींच्या स्मरणार्थ ऐलातमध्ये एका चौकामध्ये विशेष स्मारक उभारलं जाणार आहे.

  • ऐलात शहरातील सितार ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात ऐलातचे महापौर मीर इत्जाक हा लेवी यांच्याशी या स्मारकासंदर्भात चर्चा झाली आहे. शहरामध्ये स्मारक उभारण्यासंदर्भात परवानगी देणाऱ्या समितीमध्ये मीर यांचा समावेश आहे.

  • या शहरामध्ये भारत इस्रायलमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या थीमवर आधारित इंडिया-इस्रायल फ्रेण्डीशीप स्वेअर किंवा महात्मा गांधी स्वेअर उभारण्यासंदर्भातही विचार केला जात आहे.  २००८ च्या मुंबई हल्ल्यांमध्ये यहुंदींचे प्रार्थनास्थळ असणाऱ्या चबाड हाऊसवर हल्ला करण्यात आला. लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या या हल्ल्यामध्ये जवळजवळ ६० तास चकमक सुरु होती. या हल्ल्यात ३०० हून अधिकजण जखमी झाले होते.

‘उद्या धमाका,’ संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो :
  • राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे, ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे.

  • संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिषं आणि भाकितं वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं दिसत असून असं बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

  • “आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.

२६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.