चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 मे 2023

Date : 26 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती
  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे होत आहे. समृद्धी महामार्गाचा हा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानिबदू ठरेल, असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याचा सुखद अनुभव सर्वाना मिळाला. आता या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी अडीचला शिर्डीजवळील कोकमठाण इंटरचेंज येथे होत आहे.
  • या मार्गामुळे गती मिळेल असे सांगून मंत्री विखे म्हणाले, की पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झाली. आता समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचीही होत असलेली सुरुवात ही जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरेल.
  • दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह मोठय़ा भागास होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची पुण्या-मुंबईकडील वाहतूकही अतिशय कमी वेळात होईल. यामुळे कृषी उद्योगासह इतर उद्योग, व्यवसायांनाही चालना मिळून रोजगारवृद्धीच्या दृष्टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात लवकरच या भागात लॉजेस्टिक पार्क, आयटी पार्क आणि शेतीपूरक उद्योगाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठीसुद्धा समृद्धी महामार्गाचे मोठे सहकार्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निकाल, गुणवंतांमध्ये घट; राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के, पुन्हा कोकण विभाग अव्वल
  • Maharashtra Board 12th Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी घटला. राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला. निकाल घटण्याबरोबरच राज्यातील गुणवंतही घटले आहेत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी २ हजार ३५१ ने कमी झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के लागला.
  • यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. २०२१मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल ९९.६३ टक्के लागला होता. तर गेल्या वर्षीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त, कमी केलेला अभ्यासक्रम अशा सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०२१च्या तुलनेत गेल्या वर्षी २०२२मध्ये निकाल घटला. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा, गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर नियोजन आदी उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाली.
  • करोना प्रादुर्भावापूर्वी २०२०मध्ये नियमित पद्धतीने परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे २०२०च्या परीक्षेशी तुलना करता यंदाचा निकाल ०.६९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा एकूण निकाल घटण्याबरोबर गुणवंतांची संख्याही घटली आहे. गेल्या वर्षी राज्यातील १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते, तर यंदा राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. त्यामुळे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार ३५१ने कमी झाले आहेत. 
  • राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळ मिळण्यासाठी वेळापत्रकात एका दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. ३८३ समुपदेशकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या, त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, विविध विभागांनी सहकार्य केले. २७१ भरारी पथके कार्यरत होती. गैरप्रकारांबाबत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले, असे गोसावी यांनी सांगितले.
करोनापेक्षा भयंकर रोग येतोय? ‘डिसीज एक्स’बद्दल WHO च्या इशाऱ्याने टेन्शन वाढवलं
  • गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण जगाने करोनासारख्या साथीच्या रोगाची लाट पाहिली. या रोगापासून बचावासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लोकांना स्वतःचं घर सोडून कुठेही जाता येत नव्हतं. त्याचबरोबर या रोगाने लाखो लोकांचा जीव घेतला. लाखो कुटुंबं रस्त्यावर आली. २०१९ पासून सुरू झालेला हा रोग आता कुठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु हे शक्य झालं कारण संशोधक या रोगावर लस तयार करू शकले म्हणून. परंतु तुम्हाला वाटतं का, आता सगळं सुरळीत झालं आहे. किंवा इथून पुढे कधी असा रोग येणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की, आता जगाची अशा रोगापासून सुटका झाली आहे तर तुम्ही चूक करताय.
  • करोनाची लाट ओसरल्यानतंतर आणि यावर लस तयार झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी वैज्ञानिक पुढच्या संकटामुळे चिंतेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी अलिकडेच केलेलं एक वक्तव्य जगाच्या चिंता वाढवणारं आहे, तसेच वैज्ञानिकांना अधिक सतर्क करणारं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी जगाला येणाऱ्या साथरोगासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. त्यांच्या मते हा रोग करोनापेक्षा महाभयंकर आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रायोरिटी डिसीज नावाने एक रोगांची यादी आहे. यामध्ये प्राणघातक साधीच्या रोगांचा समावेश आहे. या यादीत इबोला, सार्स आणि झिका यांसारख्या आपल्याला परिचित असलेल्या रोगांची नावं आहेत. त्यात आता डिसीज एक्स हे नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.
  • सध्या या आजाराची ओळख पटलेली नाही, म्हणून आरोग्य संघटनेनं या आजाराला एक्स असं नाव दिलं आहे. याची ओळख पटली नसली तरी यामुळे मानवांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका आहे. डिसीज एक्स हा ज्या प्रकारचा रोग आहे ज्यावर लसी किंवा उपचारांचा अभाव दिसून येतो.
डेहराडून-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू
  • अनेक आव्हाने असतानाही भारताने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे त्याचे जग कौतुक करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्ली- डेहराडून वंदे भारत एक्स्प्रेसचे दूरसंवादाद्वारे उद्घाटन करताना सांगितले.  उत्तराखंडमधील रेल्वेमार्गाच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचेही पंतप्रधानांनी या वेळी उद्घाटन केले. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली उत्तराखंडसाठीची अशा प्रकारच्या या पहिल्या गाडीमुळे डेहराडून आणि राष्ट्रीय राजधानीदरम्यानचा प्रवास साडेचार तासांमध्ये करता येणार आहे.

  • सध्या शताब्दी एक्स्प्रेस हे अंतर सहा तास व दहा मिनिटांमध्ये कापते. ‘जागतिक पर्यटक हा देश पाहण्यासाठी व समजून घेण्यासाठी भारताला भेट देतात. उत्तराखंडसाठी ही फार मोठी संधी आहे,’ असे पंतप्रधान उद्घाटनप्रसंगी म्हणाले. मी आत्ताच तीन देशांच्या दौऱ्यावरून परतलो असून, जग भारताकडे मोठय़ा आशेने पाहते, असे मी सांगू शकतो, असे या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले.

धामी यांची पंतप्रधान, रेल्वेमंत्र्यांबद्दल कृतज्ञता

  • डेहराडून : देवभूमी उत्तराखंडला वंदे भारत एक्स्प्रेस दिल्याबद्दल आणि राज्यातील सर्व रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील नागरिकांच्या वतीने पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष प्रेमामुळे डेहराडून ते दिल्ली प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण होईल, असे धामी म्हणाले.  ‘उत्तराखंडच्या पहाडांवर रेल्वे नेण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे,’ या शब्दांमध्ये त्यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसभेत हिरवे आणि राज्यसभेत लाल कारपेट, असे का असते?
  • भारताच्या नव्या संसदेवरून गदारोळ निर्माण झाला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनाकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण न मिळाल्याने देशातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नव्या संसद भवनावरून राजकीय वाद निर्माण झालेला असातना संसदेच्या नव्या रुपाबाबतही जोरदार चर्चा होत आहे. नव्या भवनाचे समोर आलेल्या फोटोंनुसार हे भवन भव्य आणि षटकोनी असल्याचं दिसतंय. तसंच, राज्यसभेच्या हॉलमध्ये लाल रंगाचे कारपेट तर, लोकसभेच्या सभागृहात हिरव्या रंगाचे कारपेट अंथरल्याचेही स्पष्ट दिसतंय.
  • कारपेटची ही व्यवस्था संसदेत नवी नाही. जुन्या संसदेतही अशीच कारपेट रचना होती. जुन्या संसद भवनातील लोकसभा सभागृहातही हिरव्या रंगाचे कारपेट तर, राज्यसभा सभागृहात लाल रंगाचे कारपेट होते. ही रचना नव्या संसद भवनातही बदलण्यात आलेली नाही. नव्या संसदेत बरेच बदल करण्यात आले आहेत. परंतु, कारपेटबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण या रंगांमागची गोष्ट तुम्हाला माहितेय का? हे रंग बदलले का जात नाहीत? याविषयी आज जाणून घेणार आहोत.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांचे वेगवेगळे महत्त्व आहेत. दोन्ही सभागृहात निवडून जाण्यासाठी निवड प्रक्रियाही वेगवेगळी असते. लोकसभेचे सदस्य थेट जनतेतून निवडले जातात. तर, राज्यसभेचे सदस्य लोकप्रतिनिधींकडून निवडले जातात. लोकसभेचे सदस्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे जमिनीशी जोडले गेल्याचे प्रतिक म्हणून लोकसभेत हिरव्या रंगाचे कारपेट अंथरले जाते. जमिनीला म्हणजेच कृषीला या रंगाशी जोडलं गेलं आहे.
  • राज्यसभेतील खासदार हे इतर लोकप्रतिनिधींमार्फत निवडले जातात. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी वेगळी निवड प्रक्रिया राबवली जाते. लाल रंग हे शाही अभिमानाचे प्रतिक आहे. राज्यसभेतील सदस्यांना स्पेशल सदस्य मानले जाते. त्यामुळे राज्यसभेत लाल रंगाचे कारपेट अंथरलेले असते.
पंतप्रधान मोदींचा नियोजित अमेरिका दौरा, बायडेन प्रशासनाचे दीर्घकालीन फायद्याचे धोरण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या शासकीय दौऱ्याचे आमंत्रण देऊन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दीर्घकालीन फायद्याचे धोरण राबवले आहे असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फस्र्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिकेच्या सरकारी दौऱ्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच २२ जून रोजी पंतप्रधान मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये शासकीय भोजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
  • गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय संबंधांमध्ये अडथळे आले आहेत. विशेषत: भारताने रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेला अपेक्षित कठोर भूमिका घेतलेली नाही. अमेरिकी नागरिकांना ही बाब फारशी पसंत नसली तरी, बायडेन प्रशासनाने त्याला फार महत्त्व न देता दीर्घकालीन फायद्याचे धोरण राबवण्यास प्राधान्य दिले आहे, असे निरीक्षण सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज येथील यूएस-इंडिया पॉलिसी स्टडीज केंद्राचे वरिष्ठ सल्लागार आणि प्रमुख रिक रॉसो यांनी नोंदवले.
  • भारताबरोबर व्यापारी संबंध दृढ करणे अमेरिकेसाठीही महत्त्वाचे आहे याची बायडेन प्रशासनाला जाणीव आहे. त्यातच चीनच्या आक्रमकपणाची अमेरिकेलाही चिंता वाटते. त्यामुळे काही आव्हाने कायम असली आणि वेळप्रसंगी भूमिकेत बदल झाले असले तरी दोन्ही देश पुढे जाण्यास इच्छुक आहेत, असे रॉसो यांनी नमूद केले.
  • ते पुढे म्हणाले की, द्विपक्षीय संबंधांचा विचार करता दोन बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. भारतामध्ये व्हिसा मुलाखतीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. दुसरे म्हणजे व्यावसायिक आघाडीवरील काही आव्हाने कायम आहेत. दोघांपैकी एक देश व्यापाराभिमुख किंवा गुंतवणूकस्नेही भूमिका घेतो तेव्हा दुसरा देश त्याला हवा तसा प्रतिसाद देत नाही. व्यापार आणि व्यावसायिक आघाडीवर बरेच नुकसान झाले आहे, यामध्ये सुधारणा व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि सुरक्षिततेचा विचार केला तर भारताचे वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यासाठी अमेरिका महत्त्वाचा भागीदार आहे. हीच बाब अमेरिकेलाही लागू होते. हे केवळ एकतर्फी संबंध नाहीत.

 

‘वंदे मातरम्’ला जन गण मनसारखा समान दर्जा द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका :
  • वंदे मातरम् या गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून वकील आणि भाजपा नेते आहेत.

  • याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी वंदे मातरम् या गीताला जन गण मन या राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा अशी जनहित याचिकेद्वारे मागणी केली आहे. “भारत देश एक संघराज्य आहे. देशात सर्वांचे राष्ट्रीयत्व एकच आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीताचा आदर करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे,” असे अश्विनी कुमार उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.

  • तसेच, “देशाला एकसंध ठेवण्यासाठी जन गण मन आणि वंदे मातरम् या गीताचा प्रसार आणि प्रचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे दोन्ही गीत संविधान निर्मात्यांनी ठरविलेले आहेत. त्यामुळे या गीतामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नाही,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

  • “जन गण मन या राष्ट्रगीतामध्ये देशाला समोर ठेवून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे वंदे मातरम् या गीतात राष्ट्राचे चारित्र्य आमि विशेषता याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीतालादेखील समान सन्मान मिळायला हवा. काही वेळा अनुमती नसलेल्या परिस्थितीत वंदे मातरम् हे गीत गायले जाते. या गीताचा आदर राखने हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

चेसेबल मास्टर्स  बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदची अंतिम फेरीत धडक; जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील गिरीला पराभवाचा धक्का; जेतेपदासाठी लिरेनचे आव्हान :
  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. प्रज्ञानंदने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीला ३.५-२.५ असा पराभवाचा धक्का दिला. उपांत्य फेरीत चार डावांअंती दोन्ही खेळाडूंमध्ये २-२ अशी बरोबरी होती.

  • मग बरोबरीची कोंडी सोडवण्यासाठी झालेल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदने बाजी मारत अंतिम फेरीतील स्थान सुनिश्चित केले. या फेरीत त्याच्यापुढे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या िडग लिरेनचे आव्हान असेल. लिरेनने उपांत्य फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना पाच वेळा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर २.५-१.५ अशी मात केली.

  • बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात १६ वर्षीय प्रज्ञानंदविरुद्ध जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या गिरीचे पारडे जड मानले जात होते. परंतु, पहिल्या डावापासून प्रज्ञानंदने गिरीला उत्तम झुंज दिली. पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात विजयाची नोंद केली.

  • तिसऱ्या डावात सुरुवातीच्या चालींमध्ये गिरीने वर्चस्व गाजवले. मात्र, प्रज्ञानंदने दमदार पुनरागमन करताना हा डाव बरोबरीत सोडवला आणि एकूण लढतीत २-१ अशी आघाडी मिळवली. परंतु, गिरीने आपला अनुभव पणाला लावताना चौथा डाव जिंकल्याने लढतीत २-२ अशी बरोबरी झाली.

  • विजेता ठरवण्यासाठी झालेल्या टायब्रेकरच्या पहिल्या अतिजलद (ब्लिट्झ) डावात गिरीला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. त्याने ३३ चालींअंती या डावात हार पत्करली. त्यामुळे आपले आव्हान कायम राखण्यासाठी टायब्रेकरच्या दुसऱ्या डावात गिरीला विजय अनिवार्य होता. मात्र, प्रज्ञानंदने त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. हा डाव बरोबरीत सुटल्यामुळे प्रज्ञानंदने अंतिम फेरीत प्रवेश केला.

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये - राज्यपाल :
  • शिक्षणाचे वैश्वीकरण होत असताना विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. संपूर्ण जगात परिवर्तन घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या कौशल्याचा वापर करून रोजगाराच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत, आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.

  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यपाल या सोहळयात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे उपस्थित होते.

  • राज्यपाल म्हणाले, संपूर्ण जगातच बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेत. पण, त्यातून मार्ग काढून परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्ये आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपण सहजपणे समाजाने मला काय दिले, असा प्रश्न विचारतो, पण त्यापेक्षा आपण समाजाला काय दिले, याचा विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांना संत-महापुरूषांची नावे दिली आहेत, कारण त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. या संतांनी समाजासाठी त्यागभावनेतून जे काही केले, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, हा विचार त्यामागे आहे.

  • नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व सांगताना राज्यपाल म्हणाले, नव्या शिक्षण व्यवस्थेत आपण कोणत्याही शाखेचे ज्ञान मिळवू शकणार आहोत. अमेरिकेसारखा देशही त्यांच्या देशातील महाविद्यालयांमधून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. अनेक पीएचडी झालेले युवक, कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षित पदवीधर स्वत: शेती करून कृषी विकासात आपले योगदान देत आहेत. हॉर्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात परतलेली हरियाणातील एक युवती गावची सरपंच बनली आणि तिने ग्रामविकासासाठी आपले योगदान दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत.

श्रीलंकेच्या अर्थखात्याची धुरा रानिल विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर :
  • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी बुधवारी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केल्याचे एका अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले.  ७३ वर्षांचे विक्रमसिंघे यांना वित्त, आर्थिक स्थैर्य व राष्ट्रीय धोरण मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व आर्थिक संकटातून ओढवलेल्या राजकीय सर्कशीनंतर, पाच वेळा पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना १२ मे रोजी पुन्हा या पदावर स्थापित करण्यात आले होते.

  •  आर्थिक संकट हाताळण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्याबाबत आपले बंधू गोताबया यांच्या योजनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामी दिलेले महिंदू राजपक्षे यांची त्यांनी जागा घेतली.  दोन आठवडय़ांच्या कालावधीत विक्रमसिंघे यांनी देशाचे परराष्ट्र संबंध पुनस्र्थापित केले, एकविसाव्या घटनादुरुस्तीचा मसुदा तयार करून घटनात्मक सुधारणेसाठी पावले उचलली, इंधनपुरवठा सुनिश्चित केला आणि अंतरिम अर्थसंकल्पासाठी ते प्रयत्न करत आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.

  • आपल्याला या वर्षी आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याचे सांगून, एप्रिलच्या मध्यात श्रीलंकेने दिवाळखोरी घोषित केली होती. राजपक्षे प्रशासन ज्याकडे दुर्लक्ष करत होते, ती आर्थिक मदत (बेलआऊट) मिळवण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी नुकत्याच वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी :
  • वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.

  • शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी - मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात विश्व वैदिक सनातन संघाने याचिका दाखल केली होती. या याचिकेत हिंदूंना मशिदीच्या संकुलात कथितपणे सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागितली होती.

  • विश्व वैदिक सनातन संघाच्या मागण्या - विश्व वैदिक सनातन संघाने काही मागण्या केल्या आहेत. ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ मुस्लिमांना प्रतिबंध करण्यात यावा. ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदूंकडे सोपवण्यात यावा आणि त्या जागी सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा तीन मागण्या करण्यात आल्या आहेत.

२६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.