चालू घडामोडी आणि दिनविशेष - 26 जुलै 2023

Date : 26 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

Income Tax: Phone Pe च्या मदतीने भरता येणार इन्कम टॅक्स, लॉन्च केले ‘हे’ फिचर
  • तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसेल, तर ते लवकरच भरा. कारण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. प्रत्येक वर्षातील हा काळ असा असतो की जेव्हा सर्व करदाते आपले आयटीआर रिटर्न्स (ITR) भरण्यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे आणि पैशांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त असतात. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. ३१ जुलैच्या पुढे ही मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. टॅक्स भरण्यासाठी भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी Phone Pe ने त्यांच्या App वर ‘Income Tax Payment’ हे फिचर लॉन्च केले आहे.
  • फोन पे ने लॉन्च केलेले हे फिचर करदात्यांना आणि व्यावसायिकांना थेट फोन पे मधून self-assessment आणि अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरता येणार आहे. फोन पे ने सांगितल्याप्रमाणे या फीचरमुळे करदात्यांना सोपे होणार आहे. यामुळे टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज निर्माण होणार नाही. हे फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे ने PayMate, डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता सह भागीदारी केली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
  • फोन पे ने सोमवारी आपले नवीन फिचर लॉन्च केले. ज्यामुळे वापरकर्ता आपल्या क्रेडिट कार्ड किंवा UPI चा वापर करून सोप्या पद्धतीने आपला टॅक्स भरू शकतात. ही सुविधा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी अतिरिक्त फायद्यांसह येते. कारण यामध्ये वापरकर्ते ४५ दिवसांच्या व्याज मुक्त कालावधीचा आनंद घेऊ शकतात. तसेच त्यांच्या संबंधित बँकाच्या आधारे त्यांच्या कर पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकतात.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे फोन पे च्या फीचरद्वारे करदाते फक्त कर भरू शकतात. मात्र ते फाईल करू शकत नाहीत. त्यामुळे आयटीआर फाईल करण्यासाठी वापरकर्त्यांना दिलेल्या तपशिलाचे पालन करावे लागेल.
Money Mantra: मोबाईल बँकिंग आणि UPIचे फायदे
  • एके काळी मोबाइल लॉंच करताना रिलायन्सच्या अंबानींनी एक नारा दिला होता … कर लो दुनिया मुठ्ठीमे…. आणि आज मोबाईल बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे तो नारा सत्यात उतरला आहे.
  • मोबाईल बँकिंग ही एक आर्थिक सेवा आहे ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या मोबाईल उपकरणांद्वारे सहजपणे बँकिंग संबंधित व्यवहार करू शकतात. ही एक आधुनिक तांत्रिक सुविधा आहे जी लोकांना बँक खात्याशी संबंधित सेवांचा लाभ अतिशय सुलभतेने घेण्यास मदत करते. ही सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या बँकेचे मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यांचे बँक खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. त्यानंतर, ते त्यांचे वापरकर्तानाव आणि पासवर्डसह लॉग इन करू शकतात आणि मोबाइल बँकिंगचा वापर करु शकतात.

मोबाइल बँकिंगद्वारे काय काय करता येतं?

  • खाते माहिती केव्हाही मिळवणे : ग्राहक त्यांचे खाते तपशील, शिल्लक, व्यवहार इतिहास इत्यादी त्यांच्या मोबाईल बँकिंग द्वारे तपासू शकतात.
  • आर्थिक व्यवहार: ग्राहक मोबाईलद्वारे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात आणि खात्यातून काढू पण शकतात, वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवू शकतात, चेक / डीडी पाठवण्याची ऑर्डर देऊ शकतात.
  • चलन योजना पेमेंट: ग्राहक त्यांचे वीज बिल, गॅस बिल, मोबाईल बिल किंवा इतर उपलब्ध सेवा यांची चलने मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतात.
Money Mantra: ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स-भविष्यातील प्रगतीचे इंजिन
  • आजच्या या लेखातून नव्या भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या एका क्षेत्राचा आढावा घेऊया. जसजशी व्यापार, उद्योग, व्यवसाय यांची पुरवठा साखळी बदलते आहे म्हणजेच भारताचा या पुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणून विचार होताना दिसत आहे. अशावेळी ‘ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्स’ या क्षेत्राचे भविष्य उजळणार आहे यात शंकाच नाही.
  • पूर्वीच्या काळापासून रेल्वे आणि रेल्वेचे सुटे भाग बनवणाऱ्या निवडक कंपन्या एवढाच काय तो या क्षेत्रातील कंपन्यांचा शेअर बाजारात बोलबाला असायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अवजड वाहतुकीसाठी आवश्यक असणारी वाहने, ट्रक, ट्रेलर्स, जहाज, टँकर, जहाजाचे सुटे भाग बनवणाऱ्या, कंपन्या बंदरात माल उतरल्यानंतर विविध ठिकाणी नेण्यासाठी २४ तास कार्यरत असलेली पुरवठा साखळी; अर्थातच त्यातील महत्त्वाचा भाग भारतीय रेल्वे, अलीकडील काळात प्रवासी विमान वाहतुकीचे वाढलेले क्षेत्र, ई-कॉमर्स, कार्गो सेवा, बंदर आणि रेल्वे यांना जोडणाऱ्या मालवाहू रेल्वे गाड्यांतील माल ठेवण्यासाठी असलेली वेअर हाऊस म्हणजेच विशाल गोदामे एवढा मोठा व्यवसाय या क्षेत्रात सामावलेला आहे.
जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत, प्रणॉय उप-उपांत्यपूर्व फेरीत
  • भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. महिला एकेरीत आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.पुरुष एकेरीत श्रीकांतने चायनीज तैपईच्या चोऊ तिएन शेनचे आव्हान २१-१३, २१-१३ असे सहज संपुष्टात आणले.
  • आठव्या मानांकित प्रणॉयने देखील पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करताना चीनच्या ली शी फेंगचे आव्हान २१-१७, २१-१३ असे परतवून लावले. यंदाच्या हंगामात श्रीकांत, प्रणॉय यांचा प्रवास अडखळत सुरू होता. प्रणॉयने एक विजेतेपद मिळवले आहे.
  • श्रीकांतला मात्र अभावानेच बाद फेरीपुढे जाण्यात यश आले आहे. आता श्रीकांत, प्रणॉय यांच्यातच उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.महिला एकेरीत आकर्षीला अनुभवी अकाने यामागुचीचे आव्हान पेलवले नाही. यामागुचीने २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत मात्र ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने जपानच्या सायाका होबारा-सुईझु जोडीवर ११-२१, २१-१५, २१-१४ असा विजय मिळवला.
रशियात लिंगबदल शस्त्रक्रिया, ट्रान्सजेंडर विवाहांवर बंदी, संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून कायदा संमत
  • रशियामध्ये लिंगबदल शस्त्रक्रियांवर बंदी घालणाऱ्या कायद्यावर अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वाक्षरी केली आहे. या कायद्यामुळे आता रशियात कोणतीही व्यक्ती लिंग बदलण्याच्या उद्देशाने कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. अध्यक्ष पुतिन यांचा हा निर्णय रशियातील एलजीबीटीक्यू+ समुदायासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दी गार्डियनच्या रिपोर्टनुसार रशियातील संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सर्वानुमते हा अधिनियम पारित केला आहे.
  • या नव्या कायद्यामुळे आता रशियात कुठलीही व्यक्ती लिंगबदलाची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. तसेच ज्या जोडप्यांनी लिंग बदलून लग्नं केली आहेत, ती लग्नंदेखील आता रद्द होतील. यासह ट्रान्सजेंडर पालक मुलं दत्तक घेऊ शकणार नाहीत.
  • लिंगबदलाबाबत रशियात आता कडक कायदा केला असला तरी यात एक अपवाद आहे. ज्या मुलांमध्ये लिंगाबाबत जन्मजात विसंगती आढळेल, किंवा ज्या अर्भकांना काही वैद्यकीय उपचारांची गरज असेल अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेस परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, रशियन सरकारच्या या नव्या कायद्याचा बचाव करताना संसदेने म्हटलं आहे की, कुटुंबांबत पाश्चिमात्य विचारसरणीच्या विरोधात हे रशियाचं योग्य पाऊल आहे. बऱ्याचदा समाजाला अशा प्रकारच्या उपायांना सामोरं जावं लागतं. ही काही त्याची पहिली वेळ नाही.
  • हा कायदा जरी आज पारित झाला असला तरी याची सुरुवात एक दशकापूर्वी झाली होती. दशकभरापूर्वी रशियन पुराणमतवादी चर्चने पारंपरिक कौटुबिक मुल्यांवर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या प्रकरणाला सुरुवात झाली होती.

 

मक्लॉक्लनमुळे अमेरिकेच्या महिला रिले संघाला सुवर्ण :
  • सिडनी मक्लॉक्लनच्या दमदार कामगिरीमुळे जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत अमेरिकेने सुवर्णपदक कमावले. जागतिक स्पर्धेतील अमेरिकेचे हे विक्रमी ३३वे पदक ठरले.

  • मक्लॉक्लन, तलिथा डिग्ज, अ‍ॅबी स्टेनर आणि ब्रिटन विल्सन या चौकडीने ३ मिनिटे आणि १७.७९ सेकंद अशी वेळ नोंदवत महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक आपल्या नावे केले. मक्लॉक्लनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. तिने ०.७३ सेकंदांची आघाडी निर्णायक टप्प्यात २.९३ सेकंदांनी वाढवत अमेरिकेचे सोनेरी यश सुनिश्चित केले.

  • पुरुषांच्या ४ बाय ४०० रिले शर्यतीत अमेरिकेच्या एलिया गॉडविन, ब्राइस डेडमन, मायकल नॉर्मन आणि चॅम्पियन अ‍ॅलिसन या चौकडीने २ मिनिटे ५६.१७ सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक; १ ऑगस्टपासून राज्यात मोहिमेस सुरुवात :
  • आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून यासंबंधी मोहिम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने जर आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे.

  • भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली मोहिमेस सुरुवात - भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली या मोहीमेस सुरुवात होणार आहे. आधार कार्डची माहि मती आयडेंटिटी कार्डच्या माहितीशी लिंक केल्याने मतदारांची खासगी माहिती वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल. त्यानंतर मतदारांवर मर्यादा येतील. म्हणजेच, मतदारांना आता त्यांचे संबंधित आधार तपशील सादर करून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर आपली ओळख प्रस्तापित करावी लागेल. मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • एकाच व्यक्तीच्या नावे असलेली जास्तीची मतदार ओळखपत्रे काढून टाकण्यात येणार - या मोहिमेअंतर्गत एकाच व्यक्तीच्या नावे असलेली जास्तीची मतदार ओळखपत्रे काढून टाकण्यात येणार आहेत. ही मोहिम केंद्र सरकारच्या निवडणूक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. सुधारित कायद्यानुसार, निवडणूक नोंदणी अधिकारी कोणत्याही व्यक्तीकडून त्याचा आधार क्रमांक मागू शकतात. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही घेण्यात आली होती. त्यावेळी आधार कार्ड किंवा क्रमांक हे केवळ व्यक्तीची ओळख सिद्ध करणारी कागदपत्र असून ही कागदपत्रे नागरिकत्वाचा आधार नसल्याचे न्यायालयाने म्हणले होते.

भारतात गरिबांचीही स्वप्ने साकार होतात! ; राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार :
  • राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक यश नाही, तर देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे यश आहे. भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाही, तर ती पूर्णही करू शकतो. राष्ट्रपतीपदी माझी झालेली निवड हा त्याचा पुरावा आहे, असे उद्गार शपथ ग्रहण सोहळय़ानंतर संसदेच्या सदस्यांसमोर केलेल्या पहिल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले.

  • देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शपथ ग्रहण केली. संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये झालेल्या ऐतिहासिक सोहळय़ात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसण्याची संधी दिल्याबद्दल मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सदनांमधील आणि राज्यांच्या विधिमंडळातील सदस्यांचे आभार मानले.

  • गरीब घरातील, दुर्गम आदिवासी भागातून आलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते, ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे, असेही मुर्मू म्हणाल्या.

  • वर्षांनुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या गरीब, दलित, मागास, आदिवासींना माझ्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले आहे. माझ्या निवडणुकीला देशातील गरिबांचा आशीर्वाद लाभला आहे. माझा विजय देशातील कोटय़वधी महिला-मुलींची स्वप्ने आणि क्षमता प्रतििबबित करतो. तरुण आणि महिलांच्या हिताला मी सर्वाधिक प्राधान्य देईन, अशी ग्वाही मुर्मू यांनी दिली. मी आदिवासी समाजातील आहे. नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदापर्यंत विविध घटनात्मक पदे सांभाळण्याची संधी मला मिळाली, हे लोकशाहीची जननी असलेल्या भारताचे मोठेपण आहे. महिलांनी अधिकाधिक सक्षम व्हावे आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात विकासातील आपले योगदान वाढवत राहावे, असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

देशाला मिळाल्या नव्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी घडवला इतिहास :
  • द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली.

  • त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

  • देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती.

९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला होणार प्रसिद्ध :
  • औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

  • भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या, या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

  • प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.

  • हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

26 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.