चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ नोव्हेंबर २०२०

Date : 25 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘या’ चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून RT-PCR चाचणी बंधनकारक :

 

  • देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर तसेच करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आता महाराष्ट्र आणि मुंबईत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक पावलं उचलण्यात येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांमधून विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आजपासून RT-PCR चाचणी (२५ नोव्हेंबर) बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी दादर रेल्वे स्थानकावर नागरिकांची गर्दी झाली आहे.

  • यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी यापूर्वीच विमान, रेल्वे आणि रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर केलं आहे. त्याचबरोबर सोमवारी नव्या प्रवास नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. हा अहवाल त्यांना विमानतळांवर तसेच रेल्वे स्थानकांवर दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी विमान प्रवाशांना तीन दिवस आधी ही चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार नाही.

  • तसेच जे प्रवाशी कोविडच्या निगेटिव्ह चाचणीसह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चाने विमानतळांवर RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक असणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे. तसेच ज्या रेल्वे प्रवाशांजवळ कोविड चाचणीचा रिपोर्ट नसेल त्यांची रेल्वे स्थानकांवर अँन्टिजन चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव कुमार यांनी दिली.

देशात करोना चाचणीच्या समान दरासाठी याचिका, केंद्राला नोटीस :
  • कोविड १९ चाचणीचे कमाल  दर भारतात सर्वत्र समान असायला हवेत अशी मागणी करणाऱ्या लोकहिताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंगळवारी नोटीस जारी केली असून म्हणणे लेखी सादर करण्यास सांगितले आहे.

  • सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. ए.एस.बोपण्णा व न्या. व्ही रामसुब्रमणियन यांनी आरोग्य मंत्रालयाला नोटीस जारी केली असून अजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या लोकहिताच्या याचिकेवर आता दोन आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दूरसंवादाच्या माध्यमातून सुनावणी करताना सांगितले की, याबाबत इतर याचिका प्रलंबित असून त्याबरोबरच यायाचिकेची सुनावणी केली जाईल.

  • अग्रवाल यांनी असे म्हटले होते की, या याचिकेवर तातडीने सुनावणी गरजेची आहे. आरटी-पीसीआर चाचणीचा कमाल दर सगळ्या देशात सारखा म्हणजे ४०० रुपये असण्याची गरज आहे. हा दर सध्या ९०० पासून २८०० रुपयांपर्यंत कितीही आकारला जात आहे. विविध राज्य सरकारांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत.

  • प्रयोगशाळा मोठी लूट करीत असून त्यांनी कोटय़वधी रुपये मिळवण्याचा सपाटा चालवला आहे. यात जास्तीत जास्त नफा उकळला जात आहे. आरटी-पीसीआर संच हे सध्या २०० रुपयांपेक्षा कमी किमतीला असून प्रयोगशाळांमध्ये या चाचणीची यंत्रे आधीपासून आहेत कारण ते मोठय़ा प्रमाणात चाचण्या करीत आहेत. त्यामुळे इतर वेगळा खर्च यात नसतो, असा दावा याचिकेत केला आहे.

चंद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना :
  • चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे. चीनच्या चँग इ -५ या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे. हे यान लाँग मार्च ५ या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.३० वाजता अवकाशात झेपावले.

  • चँग इ- ५ ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

  • अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर :
  • टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे. जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

  • एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते. आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

  • बिल गेट्स हे यांच्या श्रीमंताच्या यादीतील दुसरा क्रमांक हा दुसऱ्यांदा दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर नोंदवला गेला आहे. बिल गेट्स खरंतर अनेक वर्षांपासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांनी २०१७ मध्ये पहिला क्रमांक मिळवला. यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आले. आता हा दुसरा क्रमांक एलन मस्क यांनी मिळवला आहे.

२५ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.