चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ मार्च २०२१

Date : 25 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दुहेरी उत्परिवर्तनांच्या करोना विषाणूंचा भारतात आढळ :
  • दोन उत्परिवर्तने असलेला सार्स सीओव्ही २ विषाणू (करोना) भारतातील काही नमुन्यात आढळून आला असून इतर अनेक गंभीर स्वरूपाचे विषाणूही १८ राज्यांत सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकारांपैकी काही विषाणू प्रकार या आधी परदेशात सापडले होते.

  • भारतातील सार्स सीओव्ही २ कन्सॉर्टियम ऑन जिनॉमिक्स (इन्साकॉग) या संस्थेने देशाच्या विविध राज्यांतील विषाणू नमुन्यांच्या जनुकीय क्रमवारीचे काम केले असून त्यात दोन उत्परिवर्तने असलेले काही विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्याच्या परिस्थितीचे निरीक्षण जनुकीय क्रमवारी व साथरोगशास्त्रीय आधारावर केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने २५ डिसेंबर रोजी ‘इन्साकॉग’ ही संस्था परदेशातून येत असलेल्या विषाणूंवर तसेच येथील देशी विषाणूतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केली होती. यात दहा राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समावेश असून विषाणूंच्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी अभ्यासण्याचे काम त्या प्रयोगशाळा करीत आहेत.

  • ‘इन्साकॉग’ या संस्थेने आतापर्यंत चिंताजनक स्वरूपाचे ७७१ जनुकीय विषाणू प्रकार शोधले असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण १०,७८७ नमुने दिले होते. यातील ७३६ नमुने ब्रिटनमधील बी १.१.७ विषाणूच्या प्रकारचे असून ३४ नमुन्यात दक्षिण आफ्रिकेतील बी १.३५१ हा विषाणू आढळून आला आहे. एका नमुन्यात ब्राझीलचा विषाणू – पी १ सापडला आहे. या चिंताजनक विषाणूंचे प्रकार १८ राज्यांत सापडले आहेत. जनुकीय क्रमवारी व विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यावर आधारित आहे.

देशात आणखी ४७,२६२ नव्या करोनाबाधितांची नोंद :
  • गेल्या २४ तासांत देशात ४७,२६२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. या वर्षात आतापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी १७ लाख ३४ हजार ०५८ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

  • सलग चौदाव्या दिवशी करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ नोंदली गेली असून, ही संख्या ३,६८,४५७ म्हणजे एकूण संख्येच्या ३.१४ टक्के आहे. यासोबतच, बरे होण्याचे प्रमाणही आणखी घटून ९५.४९ टक्के झाले आहे.

  • करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात झालेली ही १३२ दिवसांतील सर्वाधिक वाढ आहे. याच वेळी, २७५ जण मृत्युमुखी पडल्यामुळे करोनामृत्यूंची संख्या वाढून १ लाख ६० हजार ४४१ इतकी झाली आहे. गेल्या ८३ दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला २४ तासांच्या कालावधीत नव्या बाधितांची संख्या ४७,९०५ इतकी नोंदवली गेली होती.

  • करोनातून बरे झालेल्यांची संख्या १,१२,२०५,१६० झाली असून, मृत्यू दर १.३७ टक्के इतका आहे.

ऑनलाइन स्वस्त धान्य वितरण सुरू :
  • ऑनलाईन स्वस्त धान्य वितरण प्रणालीद्वारे धान्य वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.  आवश्यकता भासल्यास एप्रिल महिन्यातील काही दिवस वितरण व्यवस्था सुरू करण्याचे जिल्हा पुरवठा विभागाने योजिले आहे.

  • राज्यात प्राधान्य व अंतोदय शिधापत्रिकाधारकांना रास्त दराने धान्य देण्याची वितरण प्रणाली व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी राज्यभरात प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रत्यक्षात धान्यपुरवठा स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोचला तरी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत त्याच्या नोंदी ई-पॉस मशीनवर येत नसल्याने प्रत्यक्षात लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरू करण्यात आली नव्हती.

  • ऑनलाइन पद्धतीमध्ये असलेल्या अडचणी दूर करण्यास काही अवधी लागला व अखेरीस २० मार्चच्या दुपारनंतर धान्य पुरवठा संबंधित दुकानदारांच्या वितरण व्यवस्थेमधील पॉस मशीन वर दिस दिसू लागला. त्यानंतर जिल्ह्यत सर्वत्र स्वस्त धान्य दुकानदारांनी वितरण सुरू केले आहे. हे वितरण होळीपर्यंत पूर्ण होईल असे विभागाला वाटत असला तरी काही कारणाने त्यात विलंब झाल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत उतरण करण्यासाठी अतिरिक्त परवानगी देण्यात येईल असे जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक :
  • यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने  10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

  • 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम मोडला. त्याच्या आधी सर्बियाच्या रास्तको जोकिकने 2019मध्ये ओसीजेक येथे 228.6 गुण मिळवत विक्रम रचला होता.

  • भारत तिसऱ्या स्थानी - नरवालशिवाय इराणच्या सारेह जवानमार्डीने 223.4 गुण मिळवले. तर, सिंगराजने 201.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. स्पर्धेच्या सहा दिवसानंतर युक्रेनने चार सुवर्ण, चार रौप्य व एक कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, यजमान संयुक्त अरब अमिरातीने (युएई) तीन सुवर्ण व एक रौप्यपदकासह दुसरे स्थान राखले आहे. भारत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकांसह पदकांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

२५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.