करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अर्थात येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात”.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं”.
शूरपारख ते नाशिक व शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.
पुरातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.
देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहे. इसवीसन १८०५ मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत.
कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच शेकडो वर्षांनंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्त्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात. यातील अनेकजण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आज, २५डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास खुला ठेवला आहे.
देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या. परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहजप्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रणकलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. करोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
भारताच्या क्रिकेट संघात अद्यापही भेदभावाला स्थान आहे. त्यामुळेच प्रमुख खेळाडूंच्या सोयीनुसार नियमांत बदल केले जातात, असे परखड मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या भेदभावामुळे संघ व्यवस्थापन काय दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतावर दारुण पराभवाची नामुष्की ओढवली. त्यातच कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतल्याने भारताची अवस्था अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे २६ डिसेंबरपासून रंगणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी विविध खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेले विविध नियम संघासाठी कसे घातक ठरत आहे, हे एका इंग्रजी संकेतस्थळासाठी लिहिलेल्या स्तंभात स्पष्ट केले.
गावस्कर यांनी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि नुकताच आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला प्रारंभ करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन यांना कशा प्रकारे संघ व्यवस्थापनाच्या भेदभावाचा फटका बसला आहे, याचा उलगडा केला. ‘‘गेल्या १० वर्षांत अश्विन हा भारताला लाभलेला सर्वोत्तम फिरकीपटू आहे. परंतु स्पष्टवक्तेपणामुळे त्याच्याकडे नेहमी कानाडोळा करण्यात आला आहे. संघाच्या बैठकीत बहुतांश खेळाडू शांत राहण्यास प्राधान्य देतात, परंतु अश्विन नेहमी रोखठोकपणे त्याचे मत मांडतो,’’ असे गावस्कर म्हणाले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.