चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ ऑगस्ट २०२०

Date : 25 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वाहनधारकांना नितीन गडकरींकडून दिलासा, करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ निर्णय :
  • करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

  • जर मोटार वाहनाशी संबंधित तुमचे कोणतेही कागदपत्र कालबाह्य झाले असतील किंवा होणार असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण या निर्णयामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकणार आहात. 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य होणाऱ्या किंवा आतापासून 31 डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणाऱ्या मोटार वाहन कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

  • ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

०१ सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध कायम, मुख्यमंत्र्याचे संकेत :
  • जून महिन्यापासून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु करुन लॉकडाउनचे नियम टप्प्या टप्यानं शिथिल करण्यात येत आहेत. काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत केले आहेत. असे असले तरीही महाराष्ट्र सरकार कोणतही घाई करणार नाही. त्यामुळे एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत.

  • ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली. आपण यापूर्वी बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र उर्वरित काही गोष्टी सुरू करता येणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एक सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध आणखी काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले.

  • यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. परंतु त्याने हुरळून गेलो तर संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल आणि कौतुकाने हुरळून जाऊन गाफील राहता येणार नाही. त्यामुळे अन्य राज्यांनी काही गोष्टी घाईगडबडीने केल्या असल्या तरी मात्र महाराष्ट्र तसे करणार नाही. जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत काही निर्बंध शिथिल करता येणार नाहीत.

  • जगभरात काही देशांनी काही गोष्टी घाईगडबडीने सुरु केल्या. पण महाराष्ट्रत तशी गडबड केली जाणार आहे. कारण आपण ज्या गोष्टी सरु केल्या आहेत. त्या पुन्हा बंद होणार नाहीत याी दक्षता घेऊन सुरु केल्या आहेत. पण ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल. याची खात्री नाही त्या सुरु केल्या नाहीत.

IPL 2020 - सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती :
  • बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले.

  • २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. पण स्पर्धेचं वेळापत्रक मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे BCCI किंवा IPL गव्हर्निंग काऊन्सिल अजूनही स्पर्धेबाबत साशंक आहे का अशी चर्चा रंगत असतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • IPL 2020 स्पर्धेतील वेळापत्रकाबाबत टीओआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यांचे वेळापत्रक हे कधीही बदलता येईल अशा स्वरूपाचे असायला हवे असा विचार BCCI करत असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. BCCIने मागच्या वर्षी अर्धे वेळापत्रक हंगामाच्या मध्यात पुनर्नियोजित केलं होतं. पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.

  • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धतेचा विचार करून वेळापत्रक बदल करण्याजोगे (flexible) अशा स्वरूपाचे ठेवण्यात आले आहे, कारण या दोन संघांचे खेळाडू स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यापासून संघांमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या तीन-चार दिवसात जे संघ या दोन संघांतील खेळाडूंवर फारसे अवलंबून नाहीत अशा संघांमध्ये सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

२५ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.