चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ ऑक्टोबर २०२०

Date : 24 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल  जाहीर केला आहे.

  • यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.

  • वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट काही तांत्रिक कारणास्तव काम करत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in येथे निकाल पाहण्यास अडचणी येत असतील, ते यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल upsconline.nic.in वर जाऊन पीडीएफ डाउनलोड करून देखील जाणून घेऊ शकतात.

  • जे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.

नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा - भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत :
  • भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली. भारताच्या महिलांसमोर शनिवारी उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल.

  • भारताच्या महिला संघाने दोन डावांच्या या लढतीत किर्गिझिस्तानवर ४-० आणि नंतर ३.५-०.५ असा विजय मिळवला. आर. वैशालीने दमदार कामगिरी उपांत्यपूर्व फेरीतही कायम ठेवत दोन्ही लढतीत विजय मिळवला. तिने अलेक्झांड्रा समागानोवा नमवले. पद्मिनी राऊत आणि पी. व्ही. नंदिधा यांनीही दोन विजयांची नोंद केली. भक्ती कुलकर्णीला मात्र दुसऱ्या लढतीत बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारताला दोन्ही लढती ४-० या निर्भेळ यशाने जिंकता आल्या नाहीत.

  • भारताच्या पुरुष संघाला मात्र मंगोलियाविरुद्धच्या लढतीत विजयासाठी चुरस द्यावी लागली. निहाल सरिनला उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात पराभव स्वीकारावा लागला. मात्र दुसऱ्या डावात सरिनने सुमिया बिल्गुनविरुद्ध विजयाची नोंद केली. पहिल्या डावात भारताकडून एस. पी. सेतूरामन आणि शशीकिरण यांनी विजय मिळवले.

  • कर्णधार सूर्यशेखर गांगुलीला मात्र पहिल्या डावात बिल्गुनविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली होती. दुसऱ्या डावात बी. अधिबानने विजयाचे योगदान दिले. पहिल्या डावात विजय मिळवलेल्या शशीकिरणला मात्र दुसऱ्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. गांगुलीला दुसऱ्या डावात हार स्वीकारावी लागली.

महाराष्ट्रात २४ तासात ७ हजार ३४७ नवे करोना रुग्ण, १८४ मृत्यूंची नोंद :
  • महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे ७ हजार ३४७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १३ हजार २४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

  • आत्तापर्यंत १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रात सध्या १ लाख ४३ हजार २२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासात १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात करोनाची बाधा होऊन ४३ हजार १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १४ लाख ४५ हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट ८८.५२ इतका झाला आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या २४ लाख ३८ हजार २४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर १३ हजार ५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ४३ हजार ९२२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश, मद्याचाही समावेश :
  • केंद्र सरकारने देशभरातील चार हजार लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश दिला आहे. रॉयटर्नसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे परदेशी मद्यविक्रेत्या कंपनी नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • सर्व लष्कर कँटीनमध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक तसंच इतर वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात. लष्कराचे जवान, अधिकारी तसंच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुविधा उपलब्ध आहे. यामधून जवळपास २०० कोटी डॉलर्सची उलाढाल होते.

  • १९ ऑक्टोबरला संरक्षण मंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भविष्यात थेट आयात केलेल्या वस्तूंची खरेदी हाती केला जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

  • जुलै महिन्यात यासंबंधी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी चर्चा करण्यात आली होती याचा उल्लेखही आदेशात आहे. यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मोहिमेला पाठिंबा देण्याचा मुख्य उद्देश आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

२४ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.